आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh Vidyarthi Essay in Marathi

आज या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी आणला आहे आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध (Adarsh Vidyarthi Essay in Marathi). हा निबंध आजच्या विद्यार्थ्यानं वर आहे आणि आजचे विद्यार्थी कसे आहे किंवा आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे का? हे पण या निबंध निबंध मध्ये सांगितलं आहे.

Adarsh Vidyarthi Essay in Marathi

जर तुम्ही आजचा विद्यार्थी निबंध नाही वाचला असेल तर तो पण वाचा आणि. आशा करतो तुम्हाला हा (ideal student essay in marathi) निबंध नक्की आवडेल.

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

मागच्या पिढीतील लोकांना आजच्या विद्यार्थ्यांचे सगळेच वागणे गैर वाटते. त्यांना त्यांचे आधुनिक कपडे आवडत नाहीत, त्यांची आधुनिक पद्धतीची केशरचना आवडत नाही; त्यांचे चित्रपटांचे वेड आवडत नाही, पुरुषी पोशाख करण्याची मुलींची फॅशन त्यांना रुचत नाही, मुलामुलींचे परस्परांशी मोकळे वागणे त्यांना बिलकूल पसंत नाही. एकूण आजचा विद्यार्थी हा फार बेशिस्त आहे, पार बिघडून गेला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

हा विद्यार्थी जेव्हा आंदोलन उभारतो, तेव्हा तर त्याच्या बेशिस्तपणाचा कळसच होतो, असे या टीकाकारांना वाटते. पण कोणी असा विचार कधीच करीत नाही की, विद्यार्थी शिस्त का मोडतात? त्याला काही अंशी विद्यार्थ्यांशी संबंधित अशी ही मोठी माणसेच जबाबदार नाहीत का? काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांचा एक मोर्चा निघाला होता. कशासाठी ? काय मागणी होती त्यांची ? तर ' आमच्या परीक्षा वेळेवर घ्या.' आता सांगा, अशी मागणी करणारे विद्यार्थी बेशिस्त कसे?

महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण दिले जाते का? कित्येकदा चार-चार महिने लोटले, तरी परीक्षांचे निकाल लागत नाहीत. मग विद्याथी अस्वस्थ होतात. अशा वेळी त्यांच्यावर बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवला, तर ते त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे नाही का? परीक्षा म्हटली म्हणजे पेपर फुटण्याचा धोका संभवतो. एके वर्षी एका परीक्षेतील एकच पेपर दोन वेळा फुटला ! अशा प्रसंगी विद्यार्थ्यांनी संयमाने कसे वागावे? कित्येक वेळा परीक्षेचा रिझल्ट जाहीर करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडबड केलेली आढळते.

आजचा विद्यार्थी हा अधिक प्रगल्भ आहे, . कर्तबगार आहे , विचारवंत आहे, महत्त्वाकांक्षी आहे. आप्ज्र्य़ा ह॑क्‍कांविषयी तो फार जागरूक आहे. तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चे, घेराव, संप हे मार्ग अनुसरतो. खरे पाहता, आजचा विद्यार्थी बेशिस्त नाही. बेशिस्त आहे तो आजचा समाज ! वडीलधाऱ्या माणसांनी त्यांच्यापुढे चांगले ध्येय ठेवले आहे का? स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीपुढे स्वातंत्र्य-संपादनाचे निश्‍चित ध्येय होते. त्यांच्यासमोर एकाहून एक त्यागी ध्येयनिष्ठ| आदर्श होते. असे उदात्त कार्य जर या आजच्या विद्यार्थ्यांपुढे ठेवले गेले, तर ही युवा पिढी अफाट कर्तृत्व गाजवू शकेल.

अनेक संकटप्रसंगी त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे. देशावर नैसर्गिक संकट ओढवो वा परकीय आक्रमण येवो; अशा प्रसंगी हे विद्यार्थी आघाडीवर असतात. श्रमदान, रक्‍तदान करतात. जिवाची बाजी लावून अडचणींचे डोंगर पार करतात; तेव्हा तर त्यांच्या शिस्तबद्ध वर्तनाला तोड नसते. मात्र आपल्या गुणांचे, कष्टांचे चीज होत नाही, असे पाहिल्यावर हे विद्यार्थी प्रक्षुब्ध होतात. याला जबाबदार अर्थातच आपला सारा समाजच आहे. म्हणजेच बेशिस्त कोण असेल, तर तो आजचा समाज ! आजचे विद्यार्थी नव्हेत ! आजचे विद्यार्थी हे आदर्श विद्यार्थी आहेत. ते उद्याचे जागरूक नागरिक आहेत.

तुम्हाला हा आदर्श विद्यार्थी चा निबंध (Adarsh vidyarthi marathi nibandh) कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून सांगा आणि हा निबंध आपल्या मित्रां सोबत share जरूर करा. 

Read 

अंधश्रद्धा मराठी निबंध

पाणी वाचवा मराठी निबंध

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी निबंध

झाडाची आत्मकथा निबंध मराठी

Post a Comment

Previous Post Next Post