आजचा विद्यार्थी मराठी निबंध | Aajcha vidyarthi Essay in Marathi 

या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी आणला आहे आजचा विद्यार्थी मराठी निबंध (Aajcha Vidyarthi Marathi Nibandh). या निबंध मध्ये आजच्या विद्यार्थी बद्दल सांगितलं आहे कि तो ज्ञानार्थी आहे कि परीक्षार्थी आहे. आणि आजच्या विद्यार्थी साठी काय महत्वाचे आहे अभ्यास किंवा अंक हे पण या मध्ये सांगितले आहे.

Aajcha vidyarthi Essay in Marathi

आशा करतो आजचा विद्यार्थी मराठी निबंध तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्ही आजचा आदर्श विद्यार्थी निबंध नाही वाचला असेल तर तो पण नक्की वाचा. 

आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी कि परीक्षार्थी मराठी निबंध

परीक्षेच्या काळात मला वर्गमित्र खूप सतावतात. परीक्षा चालू असताना उत्तरे विचारतात, माझी उत्तरपत्रिका मागतात. स्वत:जवळच्या चिठ्ठ्याचपाट्या दुसऱ्यांकडे पोहोचत्या करण्यासाठी मदत मागतात. मदत केली नाही, तर चिडतात. मग भांडणे होतात. हे असे का होते ? कारण अगदी स्पष्ट आहे. कोणालाही अभ्यास करायला नको. गुणपत्रिकेत गुण वाढले म्हणजे झाले. ते खोटे असले, तरी कोणाला दु:ख होत नाही. म्हणजे, आजचा विद्याथी परीक्षार्थी बनला आहे. कोणालाही ज्ञानार्थी बनावे असे वाटत नाही. वर्गात शिकवताना कोण लक्ष देत नाही. गृहपाठ करताना सगळेजण दुसर्‍यांच्या वह्या उतरवून काढतात.

हे असे का होते ? याला जबाबदार कोण ? खरे तर आम्हांला घडवले गेले आहे, ते तसेच. मला आठवते तेव्हापासून परिस्थिती तशीच आहे. पाठ समजून घ्यायला कोणी शिकवलेच नाही. प्रश्‍नांची उत्तरे पाठ्यपुस्तकात खुणा करून नोंदवायची आणि तीच पाठ करायची! ती चूक की बरोबर, हे तपासायचे नाही. एखादे उत्तर पाठ्यपुस्तकात चुकीचे असले, तरी उत्तरपत्रिकेत तेच लिहायचे. माझ्या कित्येक मित्रांचे आईबाबा एका एका गुणासाठी शिक्षकांशी येऊन भांडले आहेत ! मला हे पाहून खूप वाईट वाटायचे. मी माझ्या आईबाबांना गुणांसाठी शाळेत यायला विरोध करायचो. तर्कशुद्ध विचार करून उत्तर तयार कसे करायचे, हे शिकवले जात नसे. मराठीच्या उत्तरपत्रिकेतही पाठ्यपुस्तकातीलच शब्द जसेच्या तसे लिहायचा आदेश असे. मग विचार कोण करणार ? स्वतःची भाषा कशी घडवणार ?

आज लहान मुलांच्या जीवनातील आनंद ओरबाडून घेणारी कोणती बाब असेल , तर ती म्हणजे परीक्षा' होय. एखाद्या नावाजलेल्या शाळेतील पूर्व-प्राथमिक शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी अडीच-तीन वर्षांच्या बाळालाही परीक्षेला तोंड ल्यावे लागते. खरे पाहता, लहान मुले घरातल्यांना निरागसपणे कितीतरी प्रश्‍न विचारत असतात, तेव्हा ती खऱ्या अर्थाने 'ज्ञानार्थी' असतात; पण मोठी माणसे त्यांना “परीक्षार्थी' बनवत असतात.

शाळांतील, महाविद्यालयांतील मुले परीक्षांत जास्तीत जांस्त गुण मिळवण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे मूलभूत झानाशी त्यांची फारकत होते. आजकाल मोठ्या सुट्टीतही खास वर्गांचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांवर लादले जातात. मग त्यांनी स्वतःला आवडेल ते वाचावे केव्हा? ज्ञान संपादन करून बहुश्रुत व्हावे कसे? ही सर्व जीवघेणी धडपड परीक्षेत गुण मिळवण्यासाठी असते. पण खूप गुण मिळाले म्हणजे नोकरीची शाश्‍वती असतेच असे नाही. आमच्या शेजारचा नितीन ७०% गुण मिळवून बी.कॉम. झाला आहे. पण नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेला की नापास होतो. अठरा-वीस वर्षे सतत क्रमिक अभ्यासक्रम पार पाडण्याच्या धडपडीतून जीवनव्यवहाराचे ज्ञान संपादन होत नाही आणि मग वाट्याला केवळ वैफल्य येते.

माझे काही मित्र मोबाईल वापरण्यात वाकबगार आहेत. फेसबुक, ट्वीटर, व्हॉटऑँप्स, यु-ट्यूब, माय स्पेस अशा अनेक साईट्स मुक्‍तपणे वापरतात. संगणकात सराईतपणे वावरतात. आता सांगा, तिथे बुद्धिमत्ता लागत नाही का ? ते त्यांना न शिकवता समजते, पण वर्गात शिकवलेले समजत नाही , हे कसे काय? याचे मुख्य कारण हे की, आजचे शिक्षण पुस्तको बनले आहे. प्रत्यक्ष जीवनाशी, व्यवहारातील कृतींशी या ज्ञानाचा संबंधच राहिलेला नाही. शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेला विद्यार्थी आत्मविश्‍वासाने व्यवहारात वावरू शकत नाही; तो बावरलेला असतो. त्यामुळे शिक्षणावरचा विद्यार्थ्यांचा वा समाजाचा विश्‍वास उडाला आहे. शिक्षणाविषयीची आस्था वा आदर नष्ट झाला आहे. म्हणून परीक्षेत कॉपी करणे, पैसे घेऊन प्रश्‍नपत्रिका फोडणे, पेसे चारून पदव्या मिळवणे या गोष्टींबद्दल कोणालाही खेद-खंत , लाज-शरम काहीच वाटत नाही.

हो स्थिती बदलली पाहिजे. शिक्षण व्यवसायाभिमुख बनवले पाहिजे. शिक्षण घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीशी सामना करावा लागला को, विद्यार्थी ज्ञानाकडे गंभीरपणे बघू लागतील; त्यांना शिकण्याची उत्सुकता वाटेल. ते सचोटीने ज्ञान प्राप्त करू; लागतील. साहजिकच ज्ञानाचा दर्जा उंचावेल आणि विद्यार्थीही श्ञानार्थी बनतील.

तुम्हाला हा आजचा विद्यार्थी निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून सांगा आणि हा निबंध आपल्या मित्रां सोबत share जरूर करा. 

Read 

लोकमान्य टिळक मराठी भाषण

माझे बालपण निबंध 

माझी आई निबंध मराठी मधे

Post a Comment

Previous Post Next Post