मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format, Example & PDF | Informal & Formal Letter in Marathi
या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी सादर करीत आहो मराठी पत्र लेखन (Marathi Letter Writing) आणि पत्र लेखांचे नमुने.
या आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी पत्र लेखन शिकायला मिडेल ज्या मध्ये अनोपचारिक पत्र लेखन (Informal Letter Writing in Marathi) आणि ओपचारिक पत्र लेखन (Formal Letter Writing in Marathi) दोघांचे नमुने पण तुम्हाला बघायला मिडेल.
पत्रलेखनाचे प्रकार
अनौपचारिक पत्रे | Informal Letters In Marathi
आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली मोबाईल व इंटरनेट यांमुळे अनौपचारिक पत्र लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली आढळत नाही.
अनौपचारिक पत्राचा नमुना | Informal Letter in Marathi
1. तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र.
२३२, गांधी नगर,
मुंबई
प्रिय मित्र रमेश
सप्रेम नमस्कार,
अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा
आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
कळावे,
तुझाच मित्र
औपचारिक पत्रे | Formal Letters In Marathi
औपचारिक वा व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे असते. अशा पत्रांच्या प्रारंभी वरच्या उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिताना प्रथम आपले संपूर्ण नाव लिहावे. पत्रातील मजकूर विषयाला धरून, पण मुद्देसूद असावा. पाल्हाळ नंसावे. या पत्राची भाषा ओपचारिक असली, तरी वाचणार््याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे, अशी आकर्षक व भारदस्त असावी.
औपचारिक पत्राचा आराखडा | Formal Letter Format in Marathi
____________x_____________
[ पत्रलेखकाचे स्वतःचे नाव
पत्रलेखकाचा स्वतःचा
पत्ता व
नंबर.]
दिनांक: __________
प्रति,
[ स्वीकार करणाऱ्याचे नाव,
पदाचे नाव, संस्तेचा पत्ता
इत्यादी
तपशील येथे लिहावी.]
विषय : [पत्राचा विषय कमीत कमी शब्दात स्पष्ट करा.]
संदर्भ : [ पात्राला
आधीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ असल्यास विषय च्या खाली संदर्भ लिहा.]
महोदय/महोदया,
[ येथे पात्राच्या मजकुराला सुरुवात होते. प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद करावा. या मजकुरात पाल्हाद, अलंकारिक्त,वैयक्तिक भावभावनांचे दर्शन नसावे.तक्रार सुद्धा सौम्य भाषेत असावी.]
[___________________________________________________________________________________________________________________________________________]
आपला/आपली,
सही
सोबत:
- [ काही वेडा पत्रासोबत अन्य कागदपत्रे जोडाव्या लागतात. ]
- [ अशी कागतपत्रांची यादी या ठिकाणी लिहावी.]
प्रत माहितीसाठी :
- [ काही पत्रे वेग्वेगड्या टप्यांवरील कार्यवाहीसाठी वेग्वेगड्या ठिकाणी पाठवल्या जातात. ]
- [ जी पत्रे वेग्वेगड्या ठिकाणी पाठवली जातात, त्या पात्रांमध्ये त्या व्यक्ती ची यादी या जागी लिहावी. ]
ओपचारिक पत्रांचे स्थूलमानाने काही उपप्रकार मानले जातात. ते पुढीलप्रमाणे आहेत :
- मागणीपत्र
- बिनंतिपत्र
- तक्रारपत्र
1. मागणीपत्र | Magni Patra In Marathi
- एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र.
- मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते.
- पैशाच्या बदल्यात वस्तू-सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार. त्यात भावनेचा अंश कमी असतो.
- सार्वजनिक जीवनात सोजन्याने वागण्याचे संकेत. म्हणून विनंतीची भाषा. मात्र, पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते. (Magni Patra in Marathi)
मागणीपत्राच्या विषयाची कक्षा :
- शालेय वस्तूंची मागणी करणे. (वह्या, पुस्तके, स्टेशनरी, तक्ते, नकाशे, उपकरणांचे सुटे भाग, प्रयोगशाळेतील वस्तू, विषय-प्रयोगशाळांसाठी वस्तू वगैरे.)
- घरासाठी आवश्यक वस्तूंची मागणी करणे.
- कॅटरर्सकडे अल्पोपाहाराची मागणी नोंदवणे.
- वाढदिवसासाठी भेटवस्तू मागवणे.
- शाळेसाठी नियतकालिकांची मागणी नोंदवणे.
- माहितीपत्रके (वस्तू, वास्तू, परिसर, परिवहन, सहल आयोजन, निवास व्यवस्था वगैरे) .
मांगणीपत्राचा नमुना
1. वनमहोत्सवात वृक्षरोपण करण्यासाठी रोपे मागवणारे पत्र.
रजनी जाधव
विद्यार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्यालय,
पुणे-४११
११५.
दि. २५ जुलै २०२१
प्रति,
मा. वन-अधिकारी,
वन विभाग,
पुणे-४११००५.
विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी.
महोदय,
पुढील महिन्यात येणारा वनमहोत्सव आमच्याही शाळेत साजरा केला जाणार आहे. या महोत्सवासाठी शाळांना आपल्या खात्याकडून वृक्षांची रोपे विनामूल्य पुरवली जाणार आहेत, असे कळले. आमच्या शाळेलाही अशी रोपे हवी आहेत; त्यासाठी हे पत्र लिहीत आहे.
आमच्या शाळेला सुमारे दोनशे रोपे हवी आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वृक्षांची रोपे आम्ही निवडू हेपत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे. तसदीबद्दल क्षमस्व.
आपली कृपाभिलाषी
रजनी जाधव
विद्यार्थी प्रतिनिधी
2. शाळेच्या कार्यालयाकरिता स्टेशनरी सामानाची मागणी करणारे पत्र.(शालेय वस्तू मागणी पत्र)
प्रति,
मे. भरत स्टेशनरी मार्ट,
जोगेश्वरी चौक,
पुणे-४११ ००२.
विषय : स्टेशनरी सामानाची मागणी.
महोदय,
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या शाळेसाठी आवश्यक असलेल्या स्टेशनरी मालाची पुढील यादीनुसार मागणी या पत्रादवारे करीत आहे. कृपया सर्व साहित्य त्वरित पाठवावे, म्हणजे शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ते आमच्या हाती येईल व गैरसोय होणार नाही.
मालाचे बिलही सोबत पाठवावे, म्हणजे रक्कम त्वरित पाठवून देता येईल.
कळावे, लोभ असावा.
स्टेशनरी मालाची यादी
SR | ब्स्तू | संख्या |
---|---|---|
1 | आखीव कागद | २ रीम |
2 | कोरे कागद | १ रीम |
3 | शिसपेन्सिली | ४ डझन |
4 | रंगीत पेन्सिली | १ डझन |
5 | पिन्स | १ डझन पाकिटे |
6 | शाईचे खोडरबर | ४ डझन |
आपला कृपाभिलाषी,
आणखी मांगणीपत्र नमुना बघण्या साठी क्लिक करा.
2. विनंतिपत्र | Vinanti Patra In Marathi
- एखाद्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून आर्थिक मदतीची विनंती करण्याकरिता लिहिलेले पत्र.
- एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या ज्ञानाचा, व्यासंगाचा, अनुभवाचा लाभ व्हावा म्हणून त्या व्यक्तीला लिहिलेले पत्र.
- मदत करणे हे त्या संबंधित व्यक्तीच्या पूर्णपणे इच्छेवर अवलंबून असते. म्हणून संबंधित व्यक्तीला विनंतीच करावी लागते. (vinanti patra in marathi)
- मुख्य विषयाबरोबर विनंतीची भावनाही केंद्रस्थानी आहे. म्हणून हे विनंतिपत्र होय.
- निमंत्रणे देणे, देणगी मागणे, स्थळभेटीसाठी परवानगी घेणे, अग्निशमनदलासारख्या संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावणे, 'शालेय समिती'मध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेवक किंवा सरपंच यांना आमंत्रित करणे, विदयार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकांना आवाहन करणे यांसारख्या प्रसंगांत विनंतिपत्रे लिहिली जातात.
विनंतिपत्राच्या विषयाची कक्षा :
- विविध सभा-समारंभांसाठी आमंत्रण देणे.
- देणगी, भेटवस्तू मिळवणे.
- स्थळभेट, सहल इत्यादींसाठी परवानगी मिळवणे.
- शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देणे.
- विद्यार्थ्यांचे आरोग्य, ताणतणाव, पोगंडावस्थेतील समस्या इत्यादींबाबतच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करणे.
- आधुनिक जीवनशैलीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रण देणे.
- अग्निशमन दलासारख्या संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावणे.
विनंती पत्राचा नमुना
3. तक्रारपत्र | Complaint Letter In Marathi
- कशाबद्दल तरी, कोणाविरुद्ध तरी तक्रार केलेली असते.
- तक्रारीची कारणे - फसवणूक, नुकसान, अन्याय, समाजविघातक गोष्टी, मानवी जीवनाला घातक बाबी इत्यादींबाबत संबंधित व्यक्ती, संस्था किंवा शासन यांच्याकडे तक्रार. (complaint letter in marathi)
- तक्रारपत्रात तक्रारनिवारणाची विनंती केलेली असते. तरीही हे विनंतिपत्र नव्हे. पत्राच्या गाभ्यामध्ये तक्रारच असते.
तक्रारपत्राच्या विषयाची कक्षा :
- फसवणूक
- नुकसान
- अन्याय
- हक्क हिरावून घेतला जाणे
- समाजधारणेला घातक बाबी |
- मानवी जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या बाबी (उदा., वृक्षतोड) ति इत्यादी प्रकारांविरुद्ध तक्रार नोंदवणे.
तक्रार पत्राचा नमुना
1. शाळेच्या भोवताली फेरीवाल्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत असल्याचा तक्रार अर्ज तयार करा.
प्रति,
माननीय पोलीस अधीक्षक,
कोथरूड पोलीस स्टेशन,
कोथरूड, पुणे
- ४११ ०३९.
विषय : शाळेभोवती होणारी फेरीवाल्यांची गर्दी हटवणे.
महोदय,
स.न. वि. वि.
मी-आर्या आमरे शारदा विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस हे पत्र लिहीत आहे.
कोथरूडच्या शिवाजी चौकात आमची प्रशाला आहे. आमच्या या शाळेजवळ नेहमीच फेरीवाल्यांची गर्दी असते. विशेषत: सकाळी शाळा भरण्यापूर्वी, शाळा सुटण्याच्या वेळी आणि मधल्या सुट्टीत फेरीवाल्यांची गर्दी वाढते. त्यामुळे शाळेत प्रवेश करताना, बाहेर पडताना त्रास होतो. रस्ता ओलांडताना अपघात होण्याचा धोका वाढला आहे. इतरही वेळी ते विक्रीसाठी आरडाओरडा करतात. कधी कधी त्यांची आपापसात भांडणेही होतात. यांमुळे वर्गात अध्ययन-अध्यापनात खूप अडथळे येतात.
कृपया आपण यांत लक्ष घालून शाळेला होणारा त्रास दूर करावा, ही विनंती. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे.
तसदीबद्दल क्षमस्व.
2. रस्त्यावरील कचरापेटीची दुर्दशा महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना पत्र लिहून कळवत आहे.
प्रति,
माननीय आरोग्याधिकारी,
आरोग्य विभाग,
पुणे
महानगरपालिका,
पुणे -४११९ ०१०.
विषय : शहरातील अस्वच्छतेबाबत तक्रार.
महोदय,
स. न. वि. वि.
मी पेरू गेट येथील मातृसदनमध्ये राहतो. आमच्या घरासमोर कचऱ्यासाठी एक पेटी ठेवलेली आहे. दुर्देव असे की, या विभागातील सर्व लोक सुशिक्षित असूनही कचरा टाकताना तो कचरापेटीत पडेल याबाबत काळजी घेत नाहीत. त्यामुळे बराचसा कचरा पेटीबाहेर पडलेला असतो. कागद गोळा करणारी मुले तो आणखीनच पसरवतात. रात्री-अपरात्री कुत्री तेथे गोळा होऊन भुंकत असतात.
दुसरी बाब अशी की, कचरा उचलणारी गाडी येथे दररोज येत नाही. त्यामुळे येथे भयंकर दुर्गंधी सुटलेली असते. अशा परिस्थितीत या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी चिंता वाटते.
आपण याबाबतीत लक्ष घालून चौकशी करावी आणि दररोज किंवा एक दिवसाआड कचरागाडी येथे येईल अशी व्यवस्था व्हावी, ही विनंती.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला कृपाभिलाषी,
समीर वागळे
Marathi Letter Writing PDF
मराठी पत्र लेखन pdf ला डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर लीक करा.
तर हे होतं संपूर्ण मराठी पत्र लेखन (Letter Writing in Marathi) ची विस्तृत माहिती सोबत तुम्ही मराठी पत्र लेखन pdf पण डाउनलोड करून ठेऊ शकता. तुम्हाला हे आर्टिकल कसा वाटलं आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत सहारे करा.
Read
मराठी अंक १ ते १०० | Number Names In Marathi 1 To 100
Marathi Months Name | मराठी महिने व नाव मराठी आणि इंग्रजी
Days Of The Week In Marathi And English | आठवड्याचे वार इंग्रजीत
Marathi Alphabets With PDF | मराठी मुळाक्षरे | Marathi Varnamala
nice format all types latter are covered
ReplyDelete❣️💜💕💞😉😘
DeleteNice 👍🏻
DeleteNice
DeleteBest format
ReplyDeleteNOT AT ALL!
Deletenice
ReplyDeleteNice👍
ReplyDeleteGood
ReplyDeleteGreat
ReplyDeleteI want in 2022 format
ReplyDeletejust write all the things in left side.
DeleteNice
ReplyDeleteYes
DeleteSuper
ReplyDeleteinformation
about
Marathi
letter
Nice
ReplyDeleteMast
Deletesundhar margdarshan
ReplyDeleteI want 2023 letter format of Marathi,Hindi,English
ReplyDeleteWrite a letter to andrew tate asking him " What colour is your Bugatti ? "
ReplyDeleteJust asked this question and he answerd "i sold my bugatti because of this question"
Deletenice
ReplyDeleteNice very usefull for school students
DeleteVery nice blog.
ReplyDeleteQuite informative and helpful.....
Post a Comment