स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी निबंध | Swami Tinhi Jagacha Aai Vina Bhikari Nibandh Marathi

या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी आणला आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मराठी निबंध. या पूर्वी जर तुम्ही माझी आई मराठी निबंध वाचला असेल तर हा निबंध पण तुम्हाला नक्की आवडेल आणि हा निबंध पण आई वरच आहे.  

Swami Tinhi Jagacha Aai Vina Bhikari Nibandh Marathi

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मराठी निबंध

कवी यशवंतांनी आईची थोरवी गाताना म्हटले आहे, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !' अगदी खरे आहे ते! मातेचे प्रेम अतुलनीय आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता हे सारे या जन्मदेपुढे कःपदार्थ आहेत. म्हणून तर कुणापढेही न वाकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत असे. महाराष्ट्राचे स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज हेही श्रेष्ठ मातृभक्त होते. 

मातेच्या वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वत: उपाशी राहते; पण आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरवते. प्रसंगी अपत्याच्या वात्सल्यापोटी माता आपल्या प्राणांचीही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज !

माता आपल्या लेकरासाठी काय करीत नाही? ती त्याला जन्म देते. एवढेच नव्हे, तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती डोळ्यांचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते. ती त्याचे संगोपन करते, त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगून ती त्याचे कुसुमकोमल मन फुलवते. त्यावर सुसंस्कार घडवते. शिवबा, विनोबा, बापजी यांसारख्या थोर व्यक्‍तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक माता ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे.''

मातेचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करणे , हो काही अंशाने त्या क्रणांची फेड म्हणता येईल. खरे तर तो आपल्या कर्तव्याचाच एक भाग असतो. काही कृतध्न करंटे ही फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावण्यासाठी आसुसलेले असतात. तसे झाल्यास ते त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटते.

मातेचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत को , शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असामान्य आहे. ते आपल्यावर सदैव कृपाप्रसादाची खैरात करीत असते. ऱम्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रा स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. म्हणूनच कवी म्हणतो, ' आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही. 

तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रां सोबत हा आर्टिकल share करा धन्यवाद



Read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

झाडाचे महत्त्व मराठी निबंध

माझे आवडते शिक्षक निबंध

पावसाळा मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post