शिक्षक आपल्या जीवनात खुपच महत्वाचे असते आज या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी माझे आवडते शिक्षक निबंध (My Favourite Teacher Essay in Marathi ) आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल.

My Favourite Teacher Essay in Marathi

तुम्ही माझे आवडते शिक्षक निबंध pdf पण डाउनलोड करू शकता. 


माझे आवडते शिक्षक निबंध

आवडते शिक्षक म्हणताच मला आठवतात ते आमचे जाधव सर. जाधव सर हेच आमचे आवडते शिक्षक आहेत. केवळ आवडतेच नव्हेत; तर प्रातःस्मरणीय आणि वंदनीय आहेत. केवळ माझेच नव्हे; तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विद्यार्थी शिकून गेले त्या सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे जाधव सर! किंबहुना या शाळेतील विद्यार्थी कोठेही, केव्हाही एकमेकांना भेटले कौ, ते जाधव सरांच्या हटकून आठवणी काढतात.

जाधव सरांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार आहे. उंच शरीरयष्टी, गव्हाळ वर्ण आणि प्रसन्न चेहरा. सरांचा पोशाख अगदी साधा, पण स्वच्छ. कधी कधी ते खादीचा लांब सदरा घालतात; तेव्हा तर ते एकदम रुबाबदार दिसतात. त्यांनी कधी भडक रंगाचे कपडे घातलेले मला आठवतच नाही. सिनेमातल्या ढंगाचे फॅशनेबल कपडे त्यांच्या अंगावर कधी दिसले नाहीत. त्यांच्या या स्वच्छ व साध्या पोशाखावरूनही पाहणाऱ्याला सरांच्या स्वच्छ व निर्मळ अंतःकरणाची आणि निष्कलंक चारित्र्याची लगेच साक्ष पटावी.

जाधव सर आम्हांला विज्ञान व गणित विषय शिकवतात. या विषयांत त्यांचा हातखंडाच होता. विज्ञान विषय कठीण व कंटाळवाणा आणि गणित तर भीतिदायक ! पण जाधव सरांचे कौशल्य असे कौ, हे विषय आम्हांला कधी कंटाळवाणे वाटले नाहीत वा त्यांची भीतीही वाटली नाही. ते अनेकदा वर्गात लॅपटॉप आणतात. त्यातून बरीच नवनवीन माहिती सांगतात. लॅपटॉप व प्रोजेक्टर यांच्या साहाय्याने अणुमधील इलेक्‍्ट्रॉन्सचे भ्रमण दाखवले होते. सूक्ष्मजीवांची निर्मिती ब वाढ कशी होते, हे त्यांनी असेच दाखवले होते. त्यांनी घडवलेल्या सूर्यमालेच्या दर्शनाने तर आम्ही थक्क झालो होतो.

त्यांची शिकवण्याची पद्धतही न्यारी होती. घरगुती प्रसंगांतील उदाहरणे घेत घेत ते सहज अभ्यासाकडे वळत. एकदा विज्ञानाच्या तासिकेच्या वेळी ते ' दही लावण्या 'चे प्रकार सांगू लागले. दही आंबट न होता ते मधुर व मलईसारखे होण्यासाठी विरजण कसे लावतात, हे सांगता सांगता बॅक्टेरिया म्हणजे काय, त्यांचे स्वरूप कसे असते, त्यांचे प्रकार किती वगैरे पाठ्यपुस्तकातील माहितीकडे ते केव्हा वळले, कळलेच नाही. एकदा घरातील फ्युज गेल्यावर त्यांना वितळतार मिळेना , तेव्हा वायरमधील साधी तार लावून वीजप्रवाह कसा सुरू केला, हे त्यांनी आम्हांला वर्गात सांगितले. पण त्यानंतर लागलीच काही क्षणांतच वितळतार आणली आणि साध्या तारेच्या जागी ती बसवली. हे आपण का केले, नाही तर कोणता धोका होता, हे समजावून सांगता सांगता त्यांनी विजेचे वहन, त्याचे परिणाम इत्यादी बाबी अलगद आमच्या डोक्यात घातल्या. अनेकदा ते शास्त्रज्ञांच्या आयुष्यातले धडपडीचे प्रसंग रंगवून सांगत आणि त्यायोगे अनेक सिद्धांत गप्पांच्या स्वरूपात शिकवत. जाधव सर गणितातील अनेक प्रमेये शिकवताना गणिततज्ञांच्या रंजक आठवणी सांगत. त्यामुळे प्रमेये आम्हांला कधी किचकट कटलीच नाहीत.

विज्ञान प्रदर्शन हा तर जाधव सरांचा जिव्ह्याळ्याचा विषय. आम्हां विद्यार्थ्यांचे गट करून ते सगळ्यांना प्रदर्शनात भाग घ्यायला लावत. आम्हांला ते विषय नेमून देत. आम्हांला विचार करायला लावत; उपक्रम शोधायला लावत. या प्रयत्नांत त्यांचे मार्गदर्शनही असे. त्यामुळे आम्ही मोठ्या शास्त्रज्ञांच्या ऐटीत विज्ञानातील उपक्रम सादर करीत असू.

आता दहावीचे वर्ष संपत आले आहे. माझ्या मनात सारखे येत आहे को, विज्ञान-गणिताची गोडी लावणारे जाधव सरांसारखे शिक्षक यानंतर मला भेटतील का ? ... माहीत नाही. मात्र मला मनापासून वाटते की, यापुढे कदाचित असे सर मिळतील , न मिळतील; पण जाधव सर आम्हांला मिळाले, हे आमचे केवढे भाग्य !


माझे आवडते शिक्षक निबंध PDF

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download


धन्यवाद
तुम्हाला माझे आवडते शिक्षक निबंध (My Favourite Teacher Essay in Marathi ) हा निबंध (majhe avadte shikshak) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

Read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

वाचाल तर वाचाल मराठी निबंध 

माझे बालपण निबंध

माझी आई निबंध मराठी मधे

Post a Comment

Previous Post Next Post