तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो अंधश्रद्धा मराठी निबंध (andhashraddha marathi nibandh), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता. 

Andhashraddha Essay in Marathi

या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "अंधश्रद्धा एक श्राप".


अंधश्रद्धा मराठी निबंध

अजूनही आपल्या समाजावर अंधश्रद्धेचा पगडा दिसून येतो. केसात जट निर्माण झाली को, त्या मुलीचा देवदासीत समावेश करायचा ही केवढी घणास्पद गोष्ट ! केसांची निगा नीट न राखल्यामुळे जट तयार होते, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शहरांत, तसेच खेडोपाड्यांत जाऊन लोकांना कितीतरी वेळा प्रत्यक्ष दाखवून दिले; तरी हे अज्ञानी लोक अंधश्रद्धा सोडायला तयार नाहीत.

अंधश्रद्धा हा मानबी समाजाला मिळालेला एक शाप आहे. अंधश्रद्धाळू माणूस आपली विचारशक्ती हरवून बसलेला असतो. ' श्रद्धा ' ही मानबी जीवनातील एक अमूल्य ठेवा आहे. आई, वडील, गुरुजन यांच्याविषयीची श्रद्धा ही खचितच अभिमानास्पद बाब आहे. पण कोणत्याही श्रद्धेचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत रूपांतरित होऊन समाजाला हानिकारक ठरतो. बुवा, साधू, महंत, महाराज यांच्याकडून फसवल्या गेल्याच्या तरुण-तरुणींच्या शोकांतिकेच्या दुःखद वार्ता सतत आपल्या कानांवर येतात. तेव्हा लक्षात येते कौ, अजूनही आपला तथाकथित प्रगत समाज अंधश्रद्धेच्या निबिड अंधारातच चाचपडत आहे. या विज्ञानाच्या युगातही श्रद्धाळू मंडळी बुवांच्या चमत्कारांवर विश्‍वास ठेवतातच कसा, हे काही कळत नाही.

ग्रह, तारे, ग्रहण या सर्वांविषयीची शास्त्रोक्त माहिती आज विज्ञानाने आपणाला उपलब्ध करून दिली आहे. ग्रहणांतील विविध स्थित्यंतरे आपण दूरदर्शनवर पाहतो, तरी आजही ग्रहणविषयींच्या अनेक कल्पना आपण अंधश्रद्धेने जोपासत असतो. अंधश्रद्धा या केवळ अशिक्षित किंवा अल्पशिक्षितांतचत असतात असे नाही, तर उच्चशिक्षित व स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवणारी कित्येक माणसेही अंधश्रद्धेला कवटाळून बसलेली दिसतात. त्यामुळेच प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे बांधलेल्या नोकेचे जलावतरण नारळ वाढवून करण्यात येते. तसेच निवडणुकीचा अर्ज भरणे अथवा नवीन चित्रपटाची सुरुवात शुभमुहूर्त पाहूनच केलेली आढळते.

ममाजमनाला वर्षानुवर्षे पोखरून टाकणारी ही अंधश्रद्धेची व्याधी नष्ट करायची असेल, तर सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे. आपण सर्वांनी ' अंधश्रद्धा निर्मूलन समिती 'सारख्या संस्थांचे कार्य नीट समजून घेतले पाहिजे. त्यांच्या कार्यात यथाशक्ति महभागी व्हायला हवे, तरच अंधश्रद्धेचा हा कलंक कायमचा पुसून टाकणे शक्‍य होईल.


अंधश्रद्धा मराठी निबंध PDF

अंधश्रद्धा मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download


तुम्हाला अंधश्रद्धा मराठी निबंध (Andhashraddha Essay in Marathi) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

Read

माझे आवडते शिक्षक निबंध

पावसाळा मराठी निबंध

पाणी वाचवा मराठी निबंध  

शेतकऱ्याचे मनोगत निबंध 

Post a Comment

Previous Post Next Post