विभक्ती मराठी व्याकरण | Vibhakti In Marathi | Vibhakti Table In Marathi

तुम्हा सर्वां साठी सादर करीत आहे मराठी व्याकरण मदले विभक्ती आणि त्यांचे प्रकार.

Vibhakti In Marathi

तर हे आहे विभक्ती आणि त्यांचे.

नामांच्या किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला 'विभक्ती' असे म्हणतात. उदा.- नदीच्या डोहात रामाने उडी मारली. .

नदीच्या डोहात रामाने ही विभक्तींची रूपे आहेत. ही रूपे तयार करताना या शब्दांना 'च्या', 'त', 'ने' ही अक्षरे जोडली. अशा अक्षरांना विभक्ती चे प्रत्यय असे म्हणतात.

विभक्तीचे अर्थ - विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दाशब्दांमधील जे संबंध जोडले जातात, त्यांना 'विभक्तीचे अर्थ' असे म्हणतात. 

कारकार्थ - वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात. त्यांना 'कारकार्थ" म्हणतात.

उपपदार्थ - वाक्यातील क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेल्या संबंधांना 'उपपदार्थ' असे म्हणतात. उदा.- आमचा सोन्या घराच्या अंगणात खेळायचा. 

सोन्या व अंगणात या दोन शब्दांचा संबंध खेळायचा या क्रियापदाशी आहे. म्हणून या दोन शब्दांची ही कारकविभक्ती किंवा कारक संबंध आहे आमचा, घराच्या या दोन शब्दांचा संबंध क्रियापदाशी नसून अनुक्रमे सोन्या व.

अंगणात या दोन उपपदांकडे आहे. अशा संबंधाला 'उपपद संबंध" किंवा 'उपपद विभक्ती'असे म्हणतात. 

विभक्तीचे प्रत्यय व कारकार्थ

विभक्ती एकवचनी प्रत्ययअनेकवचनी प्रत्यय कारकार्थ
प्रथमा प्रत्यय नाहीत प्रत्यय नाहीत कर्ता
द्वितीया स,ला, ते स,ला,ना,ते कर्म
तृतीया ने,ए,शी नी,ही,ई,शी करण
चतुर्थी स,ला,ते स,ला,ना,ते संप्रदान
पंचमी ऊन, हून. ऊन, हुन अपादान
षष्ठी चा,ची,चे चे,च्या, ची संबध
सप्तमी त,ई,आ त,ई,आ अधिकरण
संबोधन प्रत्यय नाहीत नो हाक


Vibhakti Table In Marathi

तृतीयेचा कारकार्थ करण - करण म्हणजे क्रियेचे साधन

चतुर्थीचा कारकार्थ संप्रदन म्हणजे दान.

पंचमीचा कारकार्थ अपादान म्हणजे वियोग. सप्तमीचा कारकार्थ अधिकरण म्हणजे आश्रय, स्थान. द्वितीय व चतुर्थी या दोन्ही विभक्तींचे प्रत्यय समान आहेत. परंतु जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते. किंवा देणे, बोलणे, सांगणे इ. अर्थाचा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला संप्रदान असे म्हणतात. त्यांची विभक्ती चतुर्थी असते.

खालील वाक्ये अभ्यासा

द्वितीय विभक्ती चतुर्थी विभक्ती
(१) पोलीसाने चोरास पकडले (१) कर्णाने इंद्राला कवचकुंडले दिली.
(२) तो मुख्याध्यापकांना भेटला (२) आजीने रामास गोष्ट सांगितली.Read

वाक्य व त्याचे प्रकार आणि उदाहरण | Vakyache Prakar In Marathi

अलंकार व त्याचे प्रकार आणि उदाहरण | Alankar In Marathi

विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Viram Chinh In Marathi

१४० मराठी म्हणी व अर्थ | Marathi Mhani

मराठी मुळाक्षरे | Marathi Varnamala

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post