अलंकार व त्याचे प्रकार आणि उदाहरण | Alankar In Marathi With Examples

तुम्हा सर्वां साठी आम्ही सादर करत आहो मराठी व्याकरणातील अलंकार व त्यांचे प्रकार उदाहरणासोबत.

alankar in marathi with example

अलंकार :- भाषेला ज्यांच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना 'भाषेचे अंलकार' असे म्हा ऱ्हणतात्त.

भाषेच्या अंलकाराचे प्रकार (दोन) :- 1) शब्दालंकार 2) अर्थालंकार1. शब्दालंकार | Shabdalankar in Marathi

शब्दालंकारात शब्दांतील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभायेते.

शब्दालंकाराचे प्रकार (तीन) - (अ) अनुप्रास (ब) यमक (क) श्लेषे


(अ) अनुप्रास अंलकार | Anupras Alankar In Marathi

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा 'अनुप्रास' हा अंलकार होतो. 

उदा

(1) वालिश, बहु, बायकांत, बुडडला

(2) आज गोकुळात रंग खेळतो हरी। राधिके रा पुन जा तुझ्या घरी ।

(3) गडद निळे गडद निळे जलत भरुनी आले. शितल अन्‌ पल रण अनिल गण निघाले. 

(4) पेटविले पाषाण ठारवरती शिवंबांनी ।
ळ्यामध्ये रीबाच्या गाजे संतांची वाणी ।

(5) मोहिनी तुझा मोहक मोहरा नातून माझ्या मावळेना । 

Read मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi

(ब) यमक अंलकार | Yamak Alankar In Marathi

कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये अथवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने पुन्हा आल्यास यमक हा अलंकार होतो.

उदा.

(1) सुसंगती सदा घडो , सुजन वाक्‍य कानी पडो
     कंलक मतिचा झडो, विषय सर्वता नावडो ।।

(2) जाणावा तो ज्ञानी । पुर्ण समाधानी । निःसंदेह मनी । सर्वकाळ ।।


(क) श्लेष अंलकार | Shlesh Alankar In Marathi

एकच शब्द वाक्यात किंवा काव्य पंक्तीस दोन अर्थांनी वापरल्या गेल्यास जी शब्द चिमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अंलकार होतो.

उदा.

(1) मित्राच्या उदयाने कोणला आनंद होत नाही?
येथे मित्र या शब्दाचे दोन अर्थ (मित्र सूर्य)

(2) जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सुमने । (फुले, चांगली मने,)2. अर्थालंकार | Arthalankar In Marathi

वापरलेल्या शब्दाच्या अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्यावेळी अर्थांलकार होतो.

1. उपमा अंलकार | Upma Alankar In Marathi

दोन वस्तुंमधील साम्य सोबत चमत्कृतिपूर्ण रीतीने वर्णन केले जाते तेव्हा उपमा अंलकार होतो. 

उपमा अंलकारात उपमेय (ज्याची तुलना करायची ते) व उपमान (ज्याच्याशी तुलना करायची ते) यांच्यात सारखेपणा दाखविला जाते. या अंलकारात जसा, सम, सारखा, गत, परी, समान यासारखे शब्द येतात.

उदा.

(1) सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी ।

(2) आभाळागत, माया तुझी आम्हावरी राहू दे ।

(3) मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो. 

(4) मुंबईची धरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी

(5) आमचे बाबा कर्णासारखे उदार आहेत.


2. उत्प्रेक्षा अंलकार | Utpreksha Alankar In Marathi

उपमेय हे जणू काही अपमानच आहे अशी ज्यावेळी कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अंलकार होतो.

उत्प्रेक्षा अंजर्बरात जणू, जणुकाय, गमे, वाटे, भासे की यासारखे साम्यवाचक शब्द येतात.

उदा.

(1) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचेप्रेमे जणू.

(2) तिचे मुख म्हणजे जणू चंद्रच ।

(3) तिचे अक्षर म्हणजे जणू मोतीच ।

(4) जगी जगतात जिवाणू जगती अनू मरती। जशीं ती गवताची पाती। 

Read मराठी अंक १ ते १०० | Number In Marathi 1 To 100 Names

3. अपन्हुती अंलकार | Apanhuti Alankar Marathi

उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे जेव्हा वर्णिले जाते तेव्हा अपन्हुती अंलकार होतो.

उदा.

(1) ओठ कशाचे ? देठचि फुलल्या पारिजातकाचे ।

(2) हे हृदय नसे, परि स्थंडिल धगधगले ।

(3) न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील।
न हे वंदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।।4. रूपक अंलकार | Rupak Alankar In Marathi

उपयोग व अपमान ही भिन्न नसून यांत एकरुपता आहे असे जेव्हा दाखविले जाते तेव्हा रूपक अंलकार होतो' (उत्प्रेक्षेप्रमाणे त्यात गुळगुळीतपणा नसतो.)

उदा.

(1) देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर ।

(2) देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थन ।
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ।।

(3) नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी

(4) बाई काय सांगो । स्वामींची ती दृष्टी । अमृताची वृष्टी। मज होय ।।

(5) भवसागर तरुण जाणे हे गृहस्थाश्रमातील माणसाला फार कठीण आहे.


5. व्यतिरेक अलंकार | Vyatirek Alankar Marathi 

उपमेये हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेव्हा दर्शविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो.

उदा.

(1) अमृताहनी ही गोड। नाम तुझे देवा ।

(2) सांज खुले, सोन्याहून पिवळे हे ऊन पडे ।

(3) संगे असता नाथा आपण, प्रासादाहुनी प्रसन्न कानन।6. अनव्यय अंलकार | Ananvay Alankar Marathi

उपमेयाला जेव्हा दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, उपमेयाचे श्रेष्ठत्व दाखविण्यासाठी उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते त्यावेळी अनन्वय अलंकार होतो.

उदा.

(1) आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी ।

(2) समर्था या जगी तुजसम असे तूच असशी ।

(3) झाले बह, होतील बहु, आहेतही बहुपरंतुयासम हा ।

(4) माझी आई अशी होती, जशी असतेच आई.


7. भ्रान्तिमान अलंकार | Bhrantiman Alankar Marathi

उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन त्याला अनुरुप अशी घडली, तर भ्रान्तिमान अंलकार होतो.

उंदा.

(1) श्रंगे विराजित नवी अरविंद पत्रे ।

पाहूनि मानुनि तिचीच विशाल नेत्रे ।

घालीन अंजन अशा मतिने तटाकी ।।

कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी ।।8. ससंदेह अलंकार | Sandeh Alankar Marathi

उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी दुविधा अवस्था होते. त्यावेळी ससंदेह अलंकार होतो.

उदा.

(1) कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा? 

(2) गालावरल्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जीविलसतसेलाली ।


9. अतिशयोक्ती अलंकार | Atishayokti Alankar Marathi

असंभाव्य किंवा अशक्य गोष्टी शक्‍य झाल्याचे वर्णन जेथे असते. म्हणजे एखादी गोष्ट आहे. त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होतो.

उदा.

(1) काव्य अगोदर झाले नतंर जग झाले सुंदर ।
रामायण आधी मग झाला राम जानकीवर ।।10. दृष्टान्त अलंकार | Drushtant Alankar Marathi

एखाद्या विषयाचे वर्णन करुन झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला वा उदाहरण दिले जाते. तेव्हा दृष्टांन्त अलंकार होतो.

1) लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।

Read Marathi Alphabets With PDF | मराठी मुळाक्षरे

11. अर्थान्तरन्यास अलंकार | Arthantaranyasa Alankar Marathi 

एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरुन सामान्य सिद्धान्त काढला गेला तर अर्थान्तरन्यास अलंकार होतो.

उदा.

(1) कटीण समय येता कोण कामास येतो? 

(2) अत्युच्ची पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा ।

(3) जग हे बंदी शाळा । कुणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला12. स्वभावोक्ती अलंकार | Swabhavokti Alankar Marathi

एखाद्या व्यक्‍तीने वस्तुचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे जेव्हा रोचक असे हबेहब वर्णन केले जाते तेव्हा स्वभावोक्‍ती अलंकार होतो.

उदा.

(1) ऐल ताटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतून शिका 

(2) मातीत ते पसरले अतिरम्य पंख
केले वरी उदर पांडूर निष्कलंक
चंचू तशीच उघडी पदलांबविले
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले


13. अन्योक्‍ती अलंकार | Anyokti Alankar In Marathi

ज्याच्याविषयी बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता “लेकी बोले सुने लागे” या प्रकारे आपले मनोगत व्यक्‍त करण्याच्या पद्धतीला अन्योकती अलंकार म्हणतात.

उदा.

(1) सांबाच्या पिंडी ते बससि अधिष्ठून वृश्चिका आज ।
परी तो आश्रय सुटता खेटरे उतरतील रे तुझा माज।।

(2) येथे समस्तं बहिरे बसतात लोक। का भाषणे तू करिशी अनेक ।
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक । रंगावरुन तुजला गणतील काक ।।14. विरोधाभास अलंकार | Virodhabhas Alankar Marathi

एखाद्या विधानात वरकॅऱणी विरोधाभास दिसतो पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा वेळी विरोधाभास अलंकार होतो.

उदा.

(1) जरी आंधळी मी तुला पाहते.

(2) सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. 

(3) स्वतःसाठी जगलास तर मेलास । दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास ।

(4) ऐसा गा मी ब्रहम। विश्वाचा आधार । खोलीस लाचार । हक्‍्काचिया ।।

(5) मरणात खरोखर जग जगते ।


15. असंगती अलंकार | Asangati Alankar Marathi

कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे जेथे वर्णन असते त्यास असंगती अलंकार म्हणतात.

उदा.

1) गुलाब माझ्या हृदयी फुलला । रंग तुझ्या गालावर खुलला ।

2) काटा माझ्या पायी रुतला । शूल तुझ्या उरी कोमल का ?16. व्याजस्तुती अलंकार | Vyaj Stuti Alankar Marathi

बाहेरुन स्तुती पण आतून निंदा किंवा बाहेरुन निंदा पण आतून स्तुती असे जेथे असते तेथे व्याजस्तुती अलंकार होतो.

उदा.

(1) होती वदन चंद्राच्या दर्शशाचीच आस ती ।
अर्धचंद्रच तू द्यावा, कृपा याहन कोणती? ।।

(2) कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी ।।17. व्याजोक्ती अलंकार | Vyajokti Alankar Marathi

एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जेथे प्रयत्न केला जातो तेथे व्याजोकक्‍ती अलंकार होतो.

उदा.

(1) येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे।
डोळ्यांत काय गेले हे ? म्हणुनी नयनापुसे।18. चेतनाुगणोक्ती अलंकार | Chetangunokti Alankar Marathi

निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करुन त्या मानवाप्रमाणे कृती करतात. असे जेव्हा वर्णन केले जाते तेथे चेतनागुणोकक्‍ती हा अलंकार होतो.

उदा.

(1) कुंटुब वत्सल असे फणस हा । कटिखांद्यावर घेऊन बाळे

(2) अरे वेड्या सोनचाफ्या । काय तुझा रे बहर ।।
नाही पाहिलीस माझी । चाफेकळी सोनगौर ।।

(3) चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ।।

(4) आला हा दारी उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरी सौध्याचे, देईल ज्याचे त्याला


19. सार अलंकार | Sar Alankar In Marathi

एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो, तेव्हा सार हा अलंकारहोतो.

उदा.

(1) आधिच मर्कट तशातहि मद्य प्याला
 झाला तशात जरि वृश्चिक दंश त्याला ।

(2) विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली ।।
गतीविना वित्त गेले । वित्ताविना शुद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ॥

(3) काव्यात नाटके रम्य, नाटकांत शाकुंतल ।
त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोक ते ।20. पर्यायोक्त अलंकार |  Prayukt Alankar Marathi

एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती आडवळणाने सांगितली जाते तेव्हा पर्यायोक्त अलंकार होतो.

(1) तू हे सांगतोस ती कल्पित कथा वाटते. (तु खोट बोलतोस)

(2) त्याचे वडील सरकारचा पाहणचार घेत आहेत. (तुरुंगात आहेत)

तर हे होते संपूर्ण मराठी व्याकरणातील अलंकार व त्यांचे उदाहरण (Alankar in marathi grammer with example) तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले आम्हाला कंमेंट करून सांगा व या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत share करा. 

Read

विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Viram Chinh In Marathi

१४० मराठी म्हणी व अर्थ | Marathi Mhani

मराठी वाक्प्रचार व अर्थ | Vakprachar In Marathi

मराठी विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd In Marathi

3 Comments

  1. स्वभावोक्ती अलंकाराचे दुसरे उदाहरण चुकीचे वाटते कारण एका शिकार्याने एका पक्षाला बाणाने मारल्यानंतर त्याच्या मृत झालेल्या व खाली उपड्या पडलेल्या शरीराचे अवस्थेचे ते वर्णन आहे व ते रोचक कसे? चोच ऊघडी, पाय ताणलेले, पांढरे पोट वगैरे. साधारण पन्नास वर्षांपूर्वी ही कविता आम्हास शिकवली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post