मराठी शुद्धलेखन व शुद्धशब्द | Marathi Shuddha Lekhan With Marathi Shuddha Shabd

तुम्हा सर्वां साठी सादर करीत आहे मराठी व्याकरण मदले मराठी शुद्धलेखन आणि शुद्ध शब्द (marathi shudha lekhan ani shudh shabd in marathi grammer).

Marathi Shuddha Lekhan

शुद्धलेखन लेखनविषयक नियम 

1) अनुस्वार : स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.

उदा.- चिंच, आंबा, तंटा, निबंध 

 2) तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशावेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवणीषी म्हणून वापरावे. 

उदा. पंडित = पण्डित, अंबुज = अम्बुज, अंतर्गत = अन्तर्गत

3) संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्ष बिंदू ( अनुस्वार) देऊनच लिहावेत.

उदा. संप, दंगा, खंत हे शब्द सम्प,दडगा, खन्त असे लिहू नयेत. 

4)  अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधी कधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.

वेदांत- वेदांमध्ये, वेदान्त - ब्रह्मज्ञान 

शालांत - शाळांमध्ये, शालान्त - शाळेचा शेवट 

देहांत - देहामध्ये, देहान्त - मृत्यू 

5) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. 

उदा. मुलांनी, घरांपुढे, त्यांच्या, लोकांना

6) आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा वरीलप्रमाणेच अनुस्वार द्यावा.

उदा. - मुख्यमंत्र्यांचा, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे ही.

ऱ्हस्व - दीर्घ 

1) मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावे. 

उदा. कवी, बुद्धी, गती, हरी, मनुस्मृती, मती, प्रीती, गुरू, पशू ,वायू 

2) मराठी इ-कारान्त व उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. 

मी, आई, पेरू, टोपी, वासरू, पाटी, जादू, पैलू 

3) सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम र्हस्वान्त अनी तर ते पूर्वपद ऱहस्वान्तच लिहावे व वीर्घान्त असेल तर ते दीर्घान्त लिलावें.

उदा. - कविचरित्र, गुरुदक्षिणा, प्रशुपक्षी, लघुकथा,:भातुविलास, हरिकृपा, सृष्टिसौंदर्य लक्ष्मीपुत्र, वधूबर, नदीतीर, भूगोल 

4) तत्सम अव्यये व्हस्वात लिहावीत. 

उदा. - परंतु, यथामति, तथापि, अति, इति ब नि आणि ही दोन-मराठी अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. 

5) (अ) मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उ-कार दीर्घ लिहावेत.

उदा. - तूप, मूल, ऊस, वीट, पीठ, विहीर, फूल, बहीण, गरींब, वकील

(ब) परंतु तत्सम अकारान्त शब्दातील उपान्त्य इ-कार किंवा ई-कार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किवा दीर्घ ठेवावा.

उदा. - गुण, विष, रसिक, कौतुक, शूर, शरीर, गीत, मंदिर, तरूण, कुसुम, प्रिय

6) (अ) मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपान्त्य इ कार किंवा उ कार ऱ्हस्व असतो. 

उदा. - किडा, विळी, पिसू, सुरू, पाहिजे, महिना, हुतुतू 

(ब) तत्सम शेवटचे अक्षर दीर्घ असले तरी त्यातील उपान्त्य इ कार किंवा उ कार संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा.

उदा. - पूजा, पीडा, परीक्षा, क्रीडा, प्रतीक्षा, नीती, अतिथी, प्रीती, गुरू, समिती

7) (अ) मराठी शब्दांतील जोडक्षरापूर्वीचे इ कार व उ कार सामान्यत: ऱ्हस्व असतात.

उदा. - कुस्ती, पुष्कळ, शिस्त,- दुष्काळ, पुस्तक

(ब) परंतु तत्सम शब्द मूळ संस्कृतप्रमाणेच लिहावेत. 

उदा. तीक्ष्ण, पूज्य, चरित्र, प्रतीक्षा, मित्र, पुण्य, गीष्म, नावीन्य, सूक्ष्म, कनिष्ठ, दुग्ध

8)  (अ) मराठी व तत्सम शब्दातील इ कारयुक्त व उ कारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामान्यतः ऱ्हस्व असतात.

उदा. - चिंच, लिंबू, तुरुंग, उंच, लिंग, अरविंद, बिंदू 

(ब) तसेच विसर्गापूर्वीचे इ कार व उ कार सामान्यतः ऱ्हस्व असतात.

उदा. - छिः, थु:, दुःख, निःशस्त्र 

9) मराठी शब्दांचा उपान्त्य ई कार किंवा ऊ कार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.

उदा. - गरीब- गरिबाला, विहीर- विहिरीत, जमीन - जमिनीचा, चूल - चुलींला परंतु तत्सम शब्द दिर्घच लिहावेत जसे - परीक्षा - परीक्षेला, दूत – दूताला

10) तीन अक्षरी मराठी शब्दाचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्य रूपात उपान्त्य ई-ऊ यांच्याजागी 'अ' आल्याचे दिसते. 

उदा. - बेरीज - बेरजेत, लाकूड - लाकडाला, काळीज - काळजात. 

11) पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी “सा' आल्यास त्या जागी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. 

उदा.  घसा - घशाला, ससा- सशाला, मासा - माशांना

12) तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' किंवा 'प' चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्य़ रूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते.

उदा. रक्कम - रकमेला, छप्पर- छपरांना, दुप्पट - दुपटीत, चप्पल-चपलांना

13) मधल्या 'म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते. 

उदा. किंमत - किमतीला, गंमत - गमतीने, हिंमत - हिमतीने 

14) धातूला 'ऊ' आणि 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी व असेल तर वू वून अशी रूपे होतात, पण धातूच्या शेवटी व नसेल तर ऊ, ऊन अशी रूपे होतात.

उदा. - धाव- धावून, ठेव - ठेवून, जेव - जेवून, धू - धुऊन, गा- गाऊन, जा - जाऊन 

शुद्ध अशुद्ध शब्द मराठी 


srअशुद्ध शुद्ध
1दृडमूल दृढमूल
2दुषणीय दूषणीय
3दूरीत दुरित
4दुष्टीकोन दृष्टिकोन
5दवितिया द्वितीया
6दुष्टिगोचर दृष्टिगोचर
7दुरावस्था दुरवस्था
8द्रवीड द्रविड
9द्रविडि द्राविडी
10दिपावली दीपावली
11दूर्मिळ दुर्मिळ
12देहातुन देहातून
13दिर्घ दीर्घ
14दुष्टिक्षेप दृष्टिक्षेप
15द्विपकल्प द्वीपकल्प
16दशेंद्रीये दशेंद्रिये
17 दुतवास दूतावास
18दुश्चीन्ह दुश्चिन्ह
19 ध्वनिफित ध्वनिफीत
20धुमधडाका धूमधडाका
21धिरोदत्त धीरोदात्त
22र्धर्म धर्म
23धुमकेतु धूमकेतू
24ध्रूव ध्रुव
25निर्रभ्र निरभ्र
26नीयूक्त नियुक्त
27नाविन्य नावीन्य
28निझर्र निर्झर
29नीयमित नियमित
30नीर्भय निर्भय
31नीष्कलंक निष्कलंक
32निरद नीरद
33निलिमा नीलिमा
34नीर्मल निर्मल
35नकूल नकुल
36निती नीती
37नीर्भीड निर्भीड
38नितिवंत नीतिवंत
39निगडीत निगडित
40नुतनीकरन नूतनीकरण
41 नीष्कारण निष्कारण
42नदीतिर नदीतीर
43नीशेधार्ह निषेधार्ह
44नागरीक नागरिक
45निसंग नि:संग
46नीष्कांचन निष्कांचन
47नीर्जन निर्जन
48नीरुपण निरूपण
49नीर्मळ निर्मळ
50निरिक्षण निरीक्षण
51नेतृत्वगूण नेतृत्वगुण
52नीर्मिती निर्मिती
53नुपूर नूपुर
54परीपाक परिपाक
55परिक्षित परीक्षित
56पूण्य पुण्य
57प्रतिक्षा प्रतीक्षा
58पांढरि पांढरी
59पक्षि पक्षी
60प्रिती प्रीती
61परिट परीट
62प्रतीकार प्रतिकार
63प्रतीष्ठा प्रतिष्ठा
64प्रवीण्य प्रावीण्य
65परीपूर्णता परिपूर्णता
66परिक्षा परीक्षा
67पाउलखूणा पाऊलखुणा
68पूत्र पुत्र
69पंचांरती पंचारती
70पवीत्र पवित्र
71पूष्प पुष्प
72पांडूरंग पांडुरंग
73परीनती परिणती
74पाश्चात्य पाश्चात्त्य
75पुरस्थिती पूरस्थिती
76प्राप्तीकर प्राप्तिकर
77पाणीग्रहण पाणिग्रहण
78पारितोषीक पारितोषिक
79प्रदक्षीणा प्रदक्षिणा
80परीसर परिसर
81प्राविण्य प्रावीण्य
82परीच्छेद परिच्छेद
83प्रस्थावना प्रस्तावना
84पितांबर पीतांबर
85प्रतीकूल प्रतिकूल
86पत्नि पत्नी
87पारंपारीक पारंपरिक
88पापभिरु पापभीरू
89प्रतीनीधी प्रतिनिधी
90पुजनीय पूजनीय
91परीशीलन परिशीलन
92पुनर्वालोकन पुनरवलोकन
93पाश्चीमात्य पाश्चिमात्य
94प्रतिश्या प्रतीक्षा
95प्रतीबंध प्रतिबंध
96परंतू परंतु
97परिस्थीति परिस्थिति
98पाहूणचार पाहुणचार
99प्रातस्काल प्रात:काल
100पलिकडे पलीकडे
101पातीशिल प्रगतिशील
102पथारि पथारी
103पुर्वपिठिका पूर्वपीठिका
104फूले फुले
105बलिष्ट बलिष्ठ
106बुद्धीमांदय बुद्धिमांदय
107बधिर बधीर
108बहीर्मूख बहिर्मुख
109भानुदय भानूदय
110भाउ भाऊ
111भ्रष्ट्राचार भ्रष्टाचार
112भीष्मप्रतीज्ञा भीष्मप्रतिज्ञा
113भुपेंद्र भूपेंद्र
114माणूसकि माणुसकी
115मजुर मजूर
116मनस्थीती मन:स्थिती
117म्हणुन म्हणून
118महीना महिना
119 महात्वाचे महत्त्वाचे
120मागमुस मागमूस
121महिपाल महीपाल
122महीना महिना
123राहाणे राहणे
124लघुत्तम लघुतम
125लीपि लिपी
126वंसत वसंत
127वैग्यानीक वैज्ञानिक
128वार्षीक वार्षिक

Read

विभक्ती मराठी व्याकरण | Vibhakti In Marathi

वाक्य व त्याचे प्रकार आणि उदाहरण | Vakyache Prakar

अलंकार व त्याचे प्रकार आणि उदाहरण | Alankar In Marathi

विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Viram Chinh In Marathi

मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi

3 Comments

Post a Comment

Previous Post Next Post