मराठी वाक्प्रचार व अर्थ | Vakprachar In Marathi With Meaning And Vakprachar PDF

तुम्हा सर्वां साठी आम्ही सादर करत आहो मराठी वाक्प्रचार व त्यांचे (Vakprachar In Marathi With Meaning) अर्थ जे तुम्ही वाचू शकता आणि मराठी वाक्प्रचार pdf डाउनलोड पण करू शकता.

vakprachar in marathi with meaning

तर हे आहे काही मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ.



Vakprachar In Marathi With Meaning

1) अक्काबाईचा फेरा येणे - अत्यंत गरीबी येणे 

2) आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे

3) अंग चोरणे - अगदी थोडे काम करणे

4) अंग झाडणे - नाकबूल करणे

5) अंग मुरडणे - दिमाख दाखवणे   

6) अंगाची लाही लाही होणे - संतापणे

7) अंगावर घेणे - पत्करणे

8) अंगी आणणे - बिंबवून घेणे

9) अभ्निदिव्य करणे - कठीण कसोटीस उतरणे

10) अंत पाहणे - कसोटी पाहणे, छळणे

11) अन्नास जागणे - कृतज्ञ असणे   

12) अन्नास मोताद होणे - उपासमार होणे

13) अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे

14) आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे

15) आकाशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे

16) आगीत तेल ओतणे - भांडण विकोपास जाईल असे करणे

17) आच लागणे - झळ लागणे

18) आनंदाला पारावार न उरणे - अति आनंद होणे

19) आभाळ कोसळणे - एकाएकी अनर्थ ओढवणे

20) अभिवादन करणे - नमस्कार करणे

21) आनंदावर विरजण पडणे - विरस होणे

Read मराठी विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd In Marathi

22) अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे

23) आत्मसात करणे - अंगी बाणणे

24) अभिवचन देणे - ठाम वचन देणे

25) अवाक्‌ होणे- आश्चर्यचकित होणे

26) अवज्ञा करणे - आज्ञा न पाळणे

27) आहारी जाणे - पूर्ण ताब्यात जाणे

28) आळा घालणे - नियंत्रण घालणे

29) उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे

30) ऊत येणे - अतिरेक होणे

31) उट्टे काढणे - सूड घेणे

32) उंटावरून शेळ्या हाकणे - मनापासून काम न करणे

33) उज्ज्वल करणे - उजळणे

34) उच्छाद आणणे - खूप संतावणे

35) उराशी बाळगणे - मनात जतन करून ठेवणे

36) उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणें

37) एका माळेचे मणी - एकसारख्याच वाईट स्वभावाच्याव्यत्ती 

38) एरंडाचे गुऱ्हाळ गाळणे - व्यर्थ बडबड करणे 

39) अंगाची लाही लाही होणे - रागाने लाल होणे साबा

40) अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे

41) कणीक तिंबणे- खूप मार देणे

42) कपाळमोक्ष होणे - मरण पावणे

43) कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे

44) कडी करणे - सरशशीकरंने

45) कठ दाटणे - सद्‌गदीत होणे

Read मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi

46) कंबर खचणे - धीर सुटणे, निराश होणे

47) कानोसा घेणे - दूरचा शब्द एकाग्रतेने ऐकणे

48) कसूर करणे - दुर्लक्ष करणे

49) कंबर बांधणे - कामाला सिद्ध होणे

50) कंबर कसणे - हिंमत करून तयारहोणे

51) काखा वर करणे - आपला काही संबंध नाही असे दाखविणे शिक्रा

52) काढतापायघेणे - सटकणे

53) काथ्याकूट करणे - निष्फळ चर्चा करणे

54) कानउघडणी करणे - खरडपट्टी काढणे

55) कान टोचणे- कडक शब्दात चूक समजावून सांगणे

56) कान फुंकणे - मन कलुषित करणे

57) कानाडोळा करणे - दुर्लक्ष कणे

58) कानाला खडा लावणे - धडा घेणे 

59) कानावर हात ठेवणे - माहिती नसल्याचा बहाणा करणे 

60) कान टवकारणे - लक्षपूर्वक ऐकण्यास तयार होणे

61) काळजाचे पाणी होणे - दुःखाने मन विदीर्ण होणे

62) काळीज फाटणे - भीतीने थरकाप उडणे 

63) केसाने गळा कापणे - विश्वासघात करणे

64) कंठस्नान घालणे - ठार मारणे

65) कुंपणाने शेत खाणे - जबाबदार विश्वासू माणसानेच फसविणे

Read मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format & Example

66) खडे चारणे - पूर्ण पराभव करणे

67) खडा टाकून पाहणे - अंदाज घेणे

68) खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे

69) खसखस पिकणे - खूप हसणे

70) खूणगाठ बांधणे - पक्के ध्यानात ठेवणे 

71) खो घालणे - कामात विघ्न आणणे

72) खनपटीला बसणे - पिच्छा पुरवणे

73) खजील होणे - ओशाळणे, लाज वाटणे

74) खस्ता खाणे - त्रास भोगणे

75) गंगेत घोडे न्हाणे - कठीण काम तडीस नेणे

76) गचांडी देणे - अर्धचंद्र देणे, हाकलपट्टी करणे

77) गर्क होणे - गुंगून जाणे

78) गडप करणे - लपविणे

79) गंडा घालणे - ठकविणे

80) गयावया करणे - क्षमेची याचना करणे

Read मागणीपत्र लेखन | Magni Patra Lekhan In Marathi

81) गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे

82) गळ घालणे - आग्रह करणे 

83) गाळण उडणे - घाबरगुंडी उडणे

84) गाशा गुंडाळणे - एकदम पसार होणे

85) गुजराण करणे - निर्वाह करणे

86) गुण दाखवणे - खरे स्वरूप प्रकट करणे

87) गौडबंगाल असणे - काहीतरी रहस्य असणे

88) घाम गाळणे - खूप कष्ट करणे

89) घोडे पेंड खाणे - अडून राहणे

90) घोडे मारणे - नुकसान करणे

90) चंग बांधणे - निर्धार करणे , प्रतिज्ञा करणे

91) घोडे मध्येच अडणे - प्रगतीत खंड पडणे 

92) चऱ्हाट वळणे - कंटाळवाणी बाब सांगणे

93) चव्हाट्यावर आणणे - उघडकीस आणणे

94) चेहरा पडणे - निराश होणे

95) चौदावे रत्न दाखविणे - मार देणे

Read बारा राशी नावे | Zodiac Signs In Marathi

96) छाती फुगणे - गर्वहोणे

97) छाती दडपणे - थक्क होऊन घाबरणे 

98) जमीन दोस्त करणे - पूर्णपणे नष्ट करणे

99) जंग जंग पछाडणे - कमालीचा प्रयत्न करणे 

100) जिभेला हाड नसणे - वाटेल ते बोलणे

101) जिवाचे रान करणे - फार कष्ट सोसणे

102) जिवात जीव येणे - भीती दूर होणे

103) जीव भांड्यात पडणे - हायसे वाटणे, काळजी दूर होणे

104) जीव मेटाकुटीस येणे - वैतागून जाणे 

105) जल्लोष करणे - आनंदाने ओरडणे

106) जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे

107) जिवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे

108) जोपासना करणे - संगोपन करण 

109) टाहो फोडणे - आक्रोश करणे

110) टेंभा मिरवणे - दिमाख दाखवणे, तोरा दाखवणे

111) टाके ढिले होणे - अतिश्रमाने अंगी त्राण न उरणे

112) डांगोरा पिटणे - जाहीर करणे

113) डाळ शिजणे - थारा मिळणे, दाद लागणे 

114) डोक्यावर खापर फोडणे - दोष माथी मारणे

115) डोक्यात राख घालणे - संतापणे 

Read मराठी अंक १ ते १०० | Number In Marathi 1 To 100

116) डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे

117) डोक्यात प्रकाश पडणे - बरोबर लक्षात येणे 

118) डोळा चुकवणे - दृष्टीस न पडणे

119) डोळे उघडणे - सत्य स्थितीची जाणीव होणे 

120) डोळे पांढरे होणे - अतिशय भीती वाटणे

121) डोळ्यांत खुपणे - सहन न होणे 

122) डोळे निवणे - समाधान वाटणे

123) डोळ्यांचे पारणे फिटणे- पाहून समाधान होणे 

124) डोळे लावून बसणे - वाट बघत राहणे

125) डोळे खिळून राहणे - टक लावून बघत राहणे 

126) डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणे

127) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणून बुजून दुर्लक्ष करणे, कानाडोळा करणे 

128) डोळ्यांत तेल घालणे - काळजीपूर्वक काम करणे ता

129) तडीस नेणे -पूर्ण करणे 

130) तसदीदेणे-त्रासदेणे 

131) तळपायाची आग मस्तकात जाणे -अतिशय संतापणे 

132) ताव काढणे - राग काढणे 

133) तारांबळ उडणे - घाईने गडबड करणे

134) तिलांजली देणे - त्यायकरणे

135) तोंड टाकणे - वाटेल तसे बोलणे, अद् वातदूवा बोलणे

Read मराठी महिने व नाव मराठी आणि इंग्रजी

136) तोंड काळे करणे - निघून जाणे 

137) तोडाला पाणी सुंटणे - हाव निर्माण होणे

138) तोंडघशी पडणे - फसगत होणे

139) तोंड देणे - परिस्थितीस सामोरे जाणे

140) तोंडचे पाणी पळणे - घाबरून जाणे 

141) तोंडाला पाने पुसणे - फसवणे

142) तोंडात बोटे घालणे - आश्चर्यचकित होणे

143) तळहातावर शिर घेणे - जिवावर उदार होणे

144) थुंकी झेणणे - खुशामत करणे 

145) दखल घेणे -लक्षदेणे

146) दाद न देणे - दुर्लक्ष करणे 

147) दाद घेणे - नीट लक्ष घालणे

148) दाद मागणे - न्याय मागणे 

149) दबा धरून बसणे - टपून बसणे

150) दातांच्या कण्या करणे - गयावया करणे 

151) दाती तृण धरणे - शरण येणे

152) दात धरणे- डूख ठेवणे 

153) दातखिळी बसणे - बोलणे अवघड होणे

154) दात पाडणे - फजिती करणे 

155) दात ओठ खाणे - दूवेष करणे

156) दूषण लावणे - दोष देणे

157) दुरावून बसणे - जवळीक निर्माण न होणे

158) दुधात साखर पडणे - आनंद द्विगुणित होणे

159) द्राविडी प्राणायाम करणे - सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे

160) दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणे - दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे

Read Marathi Alphabets With PDF | मराठी मुळाक्षरे

160) धाबे दणाणणे - खूप घाबरणे

161) धूळ चारणे - पराभव करणे

162) धूम ठोकणे - वेगाने पळून जाणे

163) नजरेत भरणे - उठूंन दिसणे

164) नजर करणे - भेटवस्तू देणे 

165) नक्षा उतरविणे - गर्व नाहीसा करणे

166) नाक मुरडणे - नापसंती दाखवणे 

167) नाकाला मिरची झोंबणे - खूप रांग येणे

168) नाक ठेचणे - नक्षा उतरविणे 

169) नाक वर असणे - ताठ असणे

170) नाकी नऊ येणे- मेटाकुटीला येणे, फार त्रास होणे

171) नावे ठेवणे- दोष देणे, निंदा करणे 

172) नाव मिळणे - प्रसिद्धी मिळणे

173) नाकाने कांदे सोलणे - उगाच बढाया मारणे

174) नावाला नसणे - जरासुद्धा 

175) नसणे पड खाणे - माघार घेणे

176) पदर पसरणे - क्षमा मागणे 

177) पदरात घेणे - स्वीकारणे

178) पदरात घालणे - स्वाधीन करणे

179) पर्वा करणे - फिकिर करणे

180) पराचा कावळा करणे - अतिशयोक्ती करणे, क्षुल्लक गोष्टीला महत्व देणे

181) पारायण करणे - पुनःपुन्हा वाचणे

182) पाठ दाखवणे -पळून जाणे

183) पाठीशी घालणे- संरक्षण देणे 

184) पाठनसोडणे -पिच्छापुरवणे

185) पाढा वाचणे- सविस्तर हकिकत सांगणे 

186) पार पडणे- पूर्ण करणे

187) पाणी पाजणे- पराभव करणे  

188) पाणीपडणे-वायाजाणे 

189) पाणी मुरणे- गुप्त कट शिजत असणे 

190) पाणी सोडणे- त्याग करणे

191) पाण्यात पाहणे- द्वेष करणे 

192) पादाक्रांत करणे - जिंकणे

193) पंक्तिभेद करणे - पक्षपात करणे 

194) पायमल्ली करणे - उपमर्द करणे

195) पाय धरणे- शरणज़ाणे

196) पारडे फिरणे - स्थितीत बदल होणे

197) पावलावर पाऊल ठेवणे - अनुकरण करणे 

198) पोटात घालणे -क्षमा करणे

199) पोटावर पाय देणे - उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे

200) पोटात कावळे ओरडणे - अतिशय भूक लागणे

201) पाणउतारा करणे - अपमान करणे 

202) प्रचिती येणे - अनुभव येणे

203) पुरून उरणे - सरस ठरणे

204) पित्त खवळणे - संतापणे 

205) प्राणावर बेतणे - जिवाला धोका निर्माण होणे 

206) प्राणावर उदार होणे - जिवाची पर्वा न करणे

207) फंडशा उडवणे - संपवून टाकणे 

208) फाटे फोडणे - नसत्या हरकती काढणे

209) फिर्याद गुदरणे - तक्रार दाखल करणे 

210) बभ्रा करणे - बोभाटा करणे

211) बारा वाजणे - पूर्ण नाश होणे

212) बादरायण संबंध असणे - ओढून ताणून लावलेला संबंध असणे 

213) बुचकळ्यात पडणे - गोंधळून जाणे 

214) बट्ट्याबोळ होणे- विचका होणे

215) बोल लावणे- दोषं देणे 

216) बोळ्याने दूध पिणे- बुद्यिहीन असणे

217) बेचैन होणे- अस्वस्थ होणे 

218) बाजी जिंकणे- यशस्वी होणे

219) बार उडवणे- कार्य पूर्ण करणे 

220) बेहोष होणे- भान हरपणे 

221) भान नसणे- जाणीव नसणे 

222) भीड घालणे- विनंती करणे

223) भगीरथ प्रयत्न करणे- चिकाटीने प्रत्न करणे 

224) भवति न भवाति करणे- सर्व बाजूंनी विचार करणे 

225) भविष्य उज्ज्वल करणे- प्रगती करणे 

226) भीड चेपणे- परिचयामुळे भीती नाहीशी होणे

227) मन मोठे करणे- उदारपणा दाखवणे 

228) मन मोडणे- इच्छेविरूद्ध वागणे

229) मनात मांडे खाणे- व्यर्थ मनोराज्य करणे 

230) मनावर घेणे- मनात पक्का विचार करणे

131) मनात घर करणे- मनात कायमचे राहे 

232) मन भरून येणे- मनात भावना दाटून

234) मन ताठ ठेवणे- स्वाभिमानाने वागणे 

235) माश्या मारणे- निरूद्योगी राहणे

236) मग्न होणे- गुंगून जाणे

237) मंत्रमुग्ध होणे- भारावून जाणे 

238) मागमूस नसणे- मुळीच माहीत नसणे

239) मूग गिळणे- उत्तर न देता गप्प राहणे 

240) मात्रा चालणे- योग्य परिणाम होणे

241) मुठीत असणे- ताब्यात असणे 

242) मेतकूट जमणे- स्नेह जुळणे

243) राम नसणे- अर्थ नसणे

244) राईचा पर्वत करणे- क्षुल्लक गोष्टीला उगाच महत्त्व देणे 

245) रामराम ठोकणे- सोडून जाणे 

246) लष्कराच्या भाकरी भांजणे- नसती उठाठेव करणे

247) वठणीवर आणणे- ताळ्यावर आणणे 

248) वांकुल्या दाखवणे- वेडावणे 

249) वाट लागणे- नष्ट होणे 

250) दर्दी देणे- कळवणे, सूचना देणे

251) वाहत्या गंगेत हात धुणे- आलेल्या संधीचा फायदा घेणे

252) वाळीत टाकणे- बहिष्कार घालणे 

253) विडा उचलणे- प्रतिज्ञा करणे

254) विशद करणे- स्पष्ट करून सांगणे

255) शहानिशा करणे- चौकशीकरून खात्री करून घेणे

256) शिगेला पोहोचणे- शेवटच्या टोकाला जाणे 

257) शंब्द झेलणे- आज्ञा त्वरित पाळणे

258) शिरकाव करणे- प्रवेश करणे 

259) श्री गणेशा करणे- आरंभ करणे

260) सहीसलामत सुटणे- दोष न येता 

261) सुटका होणे सत्त्व पाहणे- परीक्षा पाहणे

262) सर करणे- काबीज करणे 

263) सळो की पळो करणे- अतिशय हैराण करणे

264) सुळावरची पोळी-प्राणावर बेतणारे काम करणे 

265) संस्कार होणे- ठसा उमटणे

266) साकार करणे- प्रत्यक्षात आणणे 

267) सूतोवाच करणे- प्रारंभ करणे

268) सोक्षमोक्ष होणे- निकालात निघणे 

269) सामोरे जाणे- संकटास तोंड देणे

270) संधान बांधणे- जवळीक निर्माण करणे 

271) स्वर्ग दोन बोटे उरणे- गर्वाने फुगुन जाणे

272) हरभऱ्याच्या झाडावर चढवणे- खोटी स्तूती करून मोठेपणा देणे

272) हतबल. होणे- काहीच इलाज न चालणे 

273) हात घालणे- पत्करणे

274) हात टेकणे- नाईलाजाने माघार घेणे 

275) हात टाकणे- मार देणे, मारणे

276) हात देणे- मदत करणे 

277) हात चोळणे- चरफडणे |

278) हात मारणे- भरपूर खाणे 

279) हात दाखवणे- इंगा दाखवणे

280) हात पाय गाळणे- धीर सुटणे . 

281) हातपाय हलविणे- मेहनत करणे

282) हातापाया पडणे- गयावया करणे 

283) हातावर तुरी देणे- फसवून पळून जाणे

284) हस्तगत करणे- ताब्यात घेणे 

285) हाय खाणे- धास्ती घेणे, दहशत घेणे

286) हातात कंकण बांधणे- प्रतिज्ञा करणे

287) हात धुवून पाठीस लागणे- चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे

Marathi Vakprachar PDF

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ ऑफलाईन वाचण्या साठी व मराठी वाक्प्रचार pdf डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Click Here To Download

तर हे होते मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले आम्हाला कंमेंट करून सांगा व या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत share करा. 

Post a Comment

Previous Post Next Post