6 मराठी प्रेम कथा | Romantic Love Stories in Marathi | Love Stories in Marathi

जर तुम्हाला मराठी प्रेम कथा (Love Stories in Marathi) वाचायच्या असेल तर तुम्ही एक्दम सही ठिकाणी आले आहेत. आमी तुमच्या सगड्यांचा साठी 6 मराठी प्रेम कथा आणल्या आहे.

Love Stories in Marathi

अशा करतो तुम्हाला या प्रेम कथा (Romantic Love Stories in Marathi)  नक्की आवडेल.

Contents


1. एक अप्रतिम प्रेमकहाणी......

Romantic Story in marathi

Romantic Story in marathi: त्या दोघांचा ब्रेक ऑफ झला होता... त्याला नोकरी लागायला वेळ होती अजुन...

पण ती थांबायला तयार नव्हती.... शेवटी गेली ती त्याला सोडून.....

आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा..... प्रेम... विश्वास... भावना...

यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा.... त्या गोष्टीला ३ वर्ष झाली...

पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.... घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे...

पण हा नेहमी टाळाटाल करायचा.... पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्याना बोलावते....

तो येतो ऑफीस मधून.... सगळे बसलेळेच असतात....

सगळे स्मोर असल्यामुळे तो टाळाटाल न करता गप बसतो.... मुलीकडे पाहायची तर ईछा नसते....

पण घरचे सगळे खुपच आग्रह करतात.... बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रहा करतात...

दुसर्या दिवशी भेटणाचा ठरता.... त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्याचा हाच विचार तो रात्र भर करत असतो....

दुसर्‍या दिवशी ते भेटतात... संध्याकाळचे ४ वाजले असतात....

तेवढयत त्याला ऑफीस मधून फोन येतो... तसा ही त्याला तिला नकार द्याचा असतो...

बोल्यची पण ईछा नसते... म्हणून तो तिला बोलतो...

मला ऑफीस मधे जरा थोडा वेळ काम आहे तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का...? "

ती"ठीक आहे" दोघेही टॅक्सीत बसतात...

पूर्ण वेळ शांतच.... कोणीच काहीच बोलत नाही....

ऑफीस येत.... ते बिल्डिंग पाशी येतात...

तो तिला म्हणतो वर चल... पण ती म्हणते उगीच ऑफीस मधले गैर समज करतील मी थांबते खाली तू ए जाऊन..."

आणि तो जातो.... तो ऑफीस मधेजातो..

काम करत असतो... त्याचे साहेब त्याला बोलावतात...

आणि त्याला प्रमोशन चा लेटर देतात... आणि बाहेर देशात जाणायची संधी पण असते.....

तो खूपच खुश होतो... पण त्याचे साहेब बोलतात...

की तुला आताच्या आता मला एक प्रेज़ेंटेशन तयार करून द्यावा लागेल....

मला लवकरात लवकर त्याना सेंड करायचा आहे... तो तयार होतो..

आणि लागतो कामाला.... ती खाली वाट बघत आहे हे विसरुनच जातो तो....

६ वाजतात..नंतर ७...८...८.३०....फाइनली त्याचा प्रेज़ेंटेशन तयार होत...

तो जातो साहेबाना द्यायला... ते पण खुश होतात....

साहेब"जा आता घरी जा आणि घरच्यानापण आनादाची बातमी दे.... ते ही वाट बघत असतील ना....."

त्याला अचानक आठवत... तो तिला खालीच सोडून आला होता...

आणि या प्रेज़ेंटेशन मुळे विसरूनच गेला होता....

ती गेली असेल निघून असाही त्याला वाटत पण जर थांबली असेल तर... तो लगेच निघतो तिथून...

मन खूपच अस्वस्थ असता त्याचा...

तो गेट बाहेर येतो... पाहतो तर काय...

ती असते एका आडोशयाला उभी.... त्याला काय बोलावा सुच्ताच नाही...

तो"सॉरी ग... मी विसरुनच गेलो होतो... मला वाटला तू गेली अशिल...

तू गेली का नाहीस...? मला फोन तर करायचा ना....."

ती "अरे तूच तर बोलला की थोडा वेळ काम आहे म्हणून.... मला वाटला येशील लगेच...

आणि फोन करायला... तुझा नंबर आहे का माज्या कडे...

मनात आला तुझ्या घरी तुज्या बाबाना विचारावा नंबर...

पण मग ते तुलच ओरडले असते नंतर...

आणि माज्या घरच्याना विच्रला असत तर त्याचा पण तुज्याविषयी गैर समज झाला, असता...

वरती जावा वाटल पण परत ऑफीस मधे तुला डिस्टर्ब होएल म्हणून... नाही आले....

आणि तू बोलला होतास ना येतो...

मग ...."

तिला काय बोलावा हेच समजत नाही त्याला.... पण तीच मन आवडता त्याला...

तो"मला आवडली तू."

 ती"अरे पण अस आचनक... आपण अजुन काही बोललो पण नाही...

तू ओळखताही नाही मला अजुन नीट... लगेच अस ठरवायचा कारण..?"

तो"हो....

कारण आहे.... पण मला एक सांगायचा आहे तुला.....

मी एका मुलीवर खूपप्रेम करत होतो... ती ही करत होती....

पण लग्नासाठी ती तयार नव्हती... तिला माज्या प्रेमा सोबत...

माझे पैसे... नाव... प्रसिधी... हेही हव होत...

पण तेव्हा माज्या कडे काहीच नव्हता... मी तिला थोडा वेळ मागितला...

पण तोही ती द्यायला तयार नव्हती... शेवटी गेली ती सोडून मला....

त्यानंतर माझा प्रेम आणि विश्वास सर्व निरार्थक वाटू लागला....

म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाल करायचो... तुलाही नकार द्याचा हेच ठरवला होता मी...

खूप आधीच... पण आज जे झाला... त्याने माझे डोळे उघडले...

जिच्यावर मी एतका प्रेम करत होतो... ती ने मला कधी वेळ दिलाच नाही...

आणि आज माज्या फक्त एका शब्दावर.... तू एतका वेळ थांबलिस...

आणि मी विसरलो होतो हे एइकूणसुधा तू मला समजून घेतलास एतका....

कदाचित प्रेम होण्याला अजुन वेळ असेल आपल्यात.... पण मला तुझा स्वभावच आवडला....

ते पुरेस आहे आपल्या संसारसाठी.... हो ना...."

"जर तुलाही मी आवडलो असेल तर....सांग?" ती हळूच नजर खाली घेते...

त्याला तिचा उत्तरसमजत.... तो आई ला फोन करतो....

आणि बोलतो... "मला मुलगी पसंत आहे"

मित्राणो... लग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेच असतच...

पण त्यापेक्ष्याही... एकमेकना समजून घेणा...

गरजेच असत....? आवडली तर नक्की शेयर करा.....♥♥ 

Read

Mahabharat Stories in Marathi | महाभारत कथा मराठीत 

Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा

2. प्रेम....

Romantic love stories in marathi

Romantic love stories in marathi: माझा स्वतःचा स्वतःलाच एक प्रश्न होता कि, " देवाने " प्रेम " नावाची इतकी सुंदर गोष्ट बनवली, तरी माणूस दुःखी का..? "

खूप विचार केला, खूप शोधण्याचा प्रयत्न केला कि याच उत्तर काय ..?

माणूस जन्माला आल्यापासूनच त्याची शोध मोहीम सुरु होते. जन्म घेतल्यानंतर नवजात बालक आपल्या आईला शोधत असत, तिच्यात प्रेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो. तोच व्यक्ती थोडा मोठा होतो, चांगल्या मित्रांना शोधू लागतो, त्यांच्यामद्धे प्रेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आणखीन थोडा मोठा होतो तोच "प्रेयसी " किंवा " प्रियकर " म्हणजेच तुमच्या आमच्या भाषेत " गर्लफ्रेंड " आणि "बॉयफ्रेंड " मद्धे आपल्याला हव असलेल प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि मित्रांनो हीच ती वेळ जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला नवे वळण मिळणार असते. खर तर " प्रेम" या गोष्टीचा शोध त्याने इथे येउन थांबवायला हवा पण तो अस करत नाही.

आपल्या जोडीदारासमोर आपण काहीतरी मोठाच अपेक्षांचा डोंगर उभा करतो, कारण त्यावेळी आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःच्या मनाची काळजी असते, तुम्ही कितीही नाकारलत तरीही हि गोष्ट खरी आहे मित्रांनो, आपल्या जोडीदाराच वागण आपल्याला नाही पटलं तर आपण त्याच्याशी भांडतो, त्याने आपल्या मनासारखं वागावं हि इच्छा त्याच्या वर लादत असतो, लादणे हा शब्द मी अचूक वापरला आहे. कारण आपल्या जवळ असलेल्या अमुल्य गोष्टीला आपण त्यात मनासारखा बदल घडवून प्रेम करू इच्छित असतो.

प्रत्येक वेळी मनातलं दुःख तुमचा जोडीदार तुम्हाला शब्दानेच सांगेल अस नाही , काही तुम्हीही तुमच्या मानाने समजून घ्यायला हवं, पण काय करणार आपल्याला आपल्या मनातल्या अपेक्षांतून वेळ कुठे मिळतोय दुसर मन जाणून घ्यायला. असो ....तुम्हाला सांगतो तुमचा जोडीदार तो कसा हि असो पण त्याची एक खूप मोठी अपेक्षा असते तुमच्या कडून आणि ती असायला हि हवी तुम्हालाही कि , संपूर्ण दुनिया एकीकडे माझ्या विरोधात असेल तरी चालेल, पण त्यावेळी माझा जोडीदार माझ्या मतांसोबत आणि माझ्या विचारांना समजून माझ्या बाजूने ठाम उभा असावा " त्यावेळी पूर्ण दुनियेशी सामना करण्याची ताकद त्याच्यात फक्त तुम्ही त्याच्या सोबत असल्याने येते, आणि हि ताकद खरंच मोठ्यात मोठ्या संकटाला हरवू शकते.

माणसाचा " प्रेम " या गोष्टीचा शोध खरच व्यर्थ आहे, कारण ते त्याच्या मनात च आहे, जसा जंगलात कस्तुरीचा सुगंध शोधत भटकणारा हरीण, त्याला तर कधीच नाही कळल कि हि कस्तुरी त्याच्याच शरीरात आहे, तो जिथेही जाणार त्याला तिचा सुगंध येतच राहणार.

मग हा मनुष्य शोध कसला घेतोय...? मी सांगतो ...." स्वतःच्या मनाच्या सुखाचा " जो मरेपर्यंत पूर्ण नाही होत आणि नाही होणार.

हा शोध घेणारा व्यक्ती पुढे आणखीन काही वर्षांनी त्या आपल्या जोडीदारामद्धे आयुष्य भर मनासारखा साथ देणारी व्यक्ती शोधू लागतो. पुढे त्याच पती किंवा पत्नी मद्धे तो मनासारखं प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो. आणखीन काही वर्षांनी थरथरत्या हाताला शेवटच्या पावला पर्यंत गच्च हात देणारी व्यक्ती तो आपल्या जोडीदारामद्धे शोधू लागतो. शेवटी तो दिवस येतो जेव्हा याच व्यक्तीला आपली शोध मोहीम थांबवून या जगाचा निरोप घ्यायचा असतो. तुम्हाला काय वाटत याची शोध मोहीम संपली.....? नाही मित्रांनो, जगातून निरोप घेतल्यानंतर फक्त आपल्या मनातलं प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी त्याचे जिवलग त्याचा १२ X १० चा हार घातलेल्या फोटो टांगण्यासाठी घराच्या भिंतीवर जागा शोधू लागतात.

आता तुम्हीच ठरावा जर तुमच्या आमच्या आयुष्याचा प्रवास असा आहे तर, ज्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी आयुष्य घालवलं ते प्रेम होत कुठे.. 

Read

Sanskar Katha in Marathi | संस्कार कथा मराठीत 

Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज कथा

3. एक खरी प्रेम कथा...

Heart touching true love story in marathi

Heart touching true love story in marathi: एक मुलगा होता,,त्याला एक मुलगी बघटाक्षणी आवडते...?

अगदी पहिल्या नजरेतील प्रेम असत ना तस,, तो त्या मुलीला लग्नासाती प्रपोज़ करतो...?

ती थोडा वेळ मागते.

मग तो तिला इंप्रेस करायच्या प्रयत्नात असतो...?

एकदा ती त्याला स्वताच्या घरी चहासाठी बोलवते...? तो जातो...?

ती एकटीच असते...?

तीला आई वडील नसतात...

ती त्याच स्वागत करते...

 आणि त्याच्यासाठी चहा बनवून आणते...

त्याची मजा करण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकते...

 तो ती च...हा काही न बोलता पितो....♥

आणि विचारल्यावर चहा छान झाल्याच सांगतो...?

 त्याचा तो स्वभाव पाहून ती इंप्रेस होते,,ती जेव्हा त्यात मीठ लागल नाही का अस विचारते तेव्हा तो मला असाच चहा आवडतो अस सांगतो...?

त्यांच लग्न होत,,मुलनबाळ होतात...?

लग्नाला २५ वर्ष पूर्ण होतात त्या दिवशी त्याच एका अपघात होतो,,मरताना तो खुश असतो,, कारण त्यांची मूल मार्गी लागलेली असतात,,

नवरा गेल्यावर तिचे दिवस त्याच्या आठवणीत जात असतात...♥

त्याच कपाट साफ करताना तिला एक लपावलेली डायरी सापडते,,ती त्यात त्याने एक निरोप तिच्यासाठी ठेवलेला असतो... ♥

"मी तुझ्याबरोबर नेहमीच खर्ं बोललोय एक गोष्ट सोडून...?

आणि त्याचा मला पश्चताप आहे..?

मला मिठाचा चहा आवडत नाही, मी तुला इंप्रेस करण्यासाठी फसवल,,मला झाल्यास माफ कर."

हे वाचताच ती रडू लागते,,कारण ते खोट खर करण्यासाठी तो मरेपर्यंत फक्त तिच्या हाताचा चहा प्यायचा,,अगदी तसाच मीठ घातलेला....♥

का कधी आयुष्यत झुरतं जगावं लागतं

मनात दुःख पण ओठांवर खोटं-खोटं हसु आनावं

लागतं......

...... खुप मनापासुन हवी असते जिवनात जी गोष्ट

पण..?

हसत-हसत तीला दूर जाताना पाहावं लागतं...... 

Read

Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये

भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi | Ghost Stories in Marathi

4. एक होता तो आणि एक ती 

love stories in marathi for reading

love stories in marathi for reading: त्याला ती एका पार्टीत भेटली.
खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.
ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.

तो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा.
त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच!
तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!

पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,
"तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?"

तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं.
ती "हो" म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं.
या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!

जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली.
कॉफीची ऑर्डर दिली.
पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता.
आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली.
झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!

कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला.
त्यानं वेटरला हाक मारली.
वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला.
तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!'

सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.
विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.
तीसुध्दा!

वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला.
त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला!
ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क  मीठ!

अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"

"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...
"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.
आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.
खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.

तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं.
किती हळुवार होतं त्याचं मन.
मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!

मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच  आपला जीवनसाथी.
तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं!
चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.
एखाद्या परीकथेसारखे.

खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.
ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा!
आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या  कॉफीत!अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.
एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...
काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.
त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.


"माझ्या प्रिये, मला माफ कर!
आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही...
केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!

त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.
आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती!
पण मला तु खुप आवडतेस...
आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो...
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे  नाही तर हे खोटेपणाचं  ओझं मी पेलू शकणार नाही!

प्लीज - मला माफ करशील?"

Read

Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत 

तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi

5. प्रेम करावे तर असे..........

school love story marathi

school love story marathi: मी तिला शोधत होते .ती आज दिसलीच नाही.ती कॉलेजलाच आली नव्हती .कारण.....कुणालाच माहित नव्हतं.! सारे आपापसात कुजबुजत होते. स्पष्ट कुणीही बोलत नव्हते. ..!
हो ती अतिशय हुशार अभ्यासात आणि कला गुनातही !सौंदर्य अतिशय सोज्वळ ,सडपातळ .गोरी.अतिशय देखणी राहणीमान अतिशय साधे,आजच्या युगाला न पटणारे तरीही आकर्षक....

कुणीही प्रेमात पाडवा अशी !नाव तीच "राजश्री" आम्ही तिला" राज" म्हणायचो." राज" म्हणजे "गाणं"...! हि तिची ओळख .गाणं हे तीच वेडंच...गाण्यासाठी ती वेडी होती .तिच्या गळ्यात जणू कोकिळेचा वास होता ...ती गायला लागली कि सारे मंत्रमुग्ध झालेच समजा ...त्यातली मी पण एक ........!मी पहिल्यांदा तीच गण ऐकलं..."जीवलगा राहिले दूर घर माझे..........."आणि मी तिच्या प्रेमात पडले ती आजपर्यंत.................!

पण.........हे की आज ती कॉलेजमध्ये नाही ,tution मधेही नाही, घरीपण नाही ,........आणि कुणी काही सांगतही नाही ......तेवढ्यात आमची एक मैत्रीण समोरून येताना दिसली .मी धावतच जाऊन विचारले अग राज कुठे आहे ? कुठे दिसत नाही !ती रडतच बोलली हॉस्पिटल मध्ये भर्ती आहे .मला अचानक काही सुचेनासं झालं.कालपर्यंत जी धडधाकट मुलगी माझासोबत होती ती अचानक हॉस्पिटल मध्ये?.तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात .ती पुढे बोलू लागली .....माझा पायाखालची वाळूच सरकली .राज सारखी सहनशील मुलगी असा काही करू शकते ? विश्वासच बसत नव्हता .मग अचानक की झालं?

ती कुणाजवळ काही बोलत नव्हती पण एकदा बोलताबोलता तीने माझा जवळ आपला मन हलका करण्याचा प्रयत्न केला.....ती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती .तो तिच्या क्लासचा नव्हता पण कॉलेजचा होता .एक वर्ग समोर होता .पण क्षेत्र एकाच होतं ....ती बर्याच कार्यक्रमात गायची .प्रत्येक स्पर्धा .कॉलेज चे प्रोग्राम राज शिवाय अधुरे असायचे ....गाण्यासाठी साथीला वादक लागयचे ..आणि अशातच त्याची ओळख झाली ..तो वादक होतं ,प्रत्येक वाद्य मोठ्या शिताफीने वाजवण्याची कला त्याला अवगत होती .त्याला सगळे allroundar म्हणायचे...तो बर्याच कार्यक्रमात वेगवेगळ्या गायिका ,गायका सोबत वाजवायचा ..पण राज चा गाणं तो अतिशय जीव लाऊन वाजवायचा कारण ती गायचीच भन्नाट..............

तिचं गाणं नेहमी भावपूर्ण व त्याला आवडणारा असायचं... तो अतिशय लोकप्रिय आणि खूप हुशार ड्रमर होता. मुली पटकन त्याचावर इम्प्रेस व्हायच्या .या सार्या गोष्टींचा त्याला खूप घमंड होता..तो खूप गर्विष्ट होता . हे त्याचा वागण्यातून जाणवायचं ..हे तिलाही माहित होता..पण म्हणतात ना मना समोर कुणाच चालत नसता....!
नाव त्याच विशाल.....मन अगदी अविशाल.........उद्धट, गर्विष्ट, चिडचिडा असा त्याचा स्वभाव ....दिसायला मात्र एकदम आकर्षक .एकदा कुणी पहाव आणि प्रेमातच पाडाव असा...पडली प्रेमात...म्हणतात ना कि प्रेम आंधळा असता ".पण हि तर पूर्णतः अपंगच झाली त्याचा प्रेमात."वेडी".........

जसजशी त्याची ओळख वाढत गेली ,,तसतशी हिची ओढही वाढत गेली .तो मात्र .........सारं समजून.....बाहेर गावी बरेचदा कार्यक्रमाला मिळून जायचे .बाकी युनिट पण असायचं सोबत ....हि मात्र याची काळजी घेण्यात मग्न असायची ."विशाल म्हणजे माझं जीवन " .असा ती म्हणायाची ...तो जेवला कि नाही ?त्याला बारा वाटत कि नाही?त्याला काय पाहिजे काय नाही?ह्या सगळ्या गोष्टीची काळजी तिचं करायची....पण त्याला हे सारं आवडायचा नाही म्हणायचं "रीआज कर" उगाच वेळ घालू नको " 

तिच्या डोळ्यातला त्याचसाठी असणारा प्रेम सर्वाना दिसायचं .पण !हा तर पाषाण याला कधी पाझारच फुटला नाही .कित्येकदा तिच्यावर चिडायचा पण हि मात्र प्रेमदिवानी कधी उलट उत्तरही देत नसे ......तिचा मन कितेकदा दुखावल्या जाई..ती कधीही बोलून दाखवत नसे ...दुखाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून येई .....

राजने नेहमी विशाल वर निर्मळ निस्वार्थी कशाचीही अपेक्षा ना ठेवता प्रेम केलं.देन .देन .आणि देनच प्रेम असू शकतं...असा ती म्हणायची ..एकदा तरी माझा प्रेम या पाषाणाला पाझर फोडेल या आशेने ती नेहमी त्याचावर प्रेम करीत राहिली अचानक तिला समजला तो नेहमीसाठी शहर सोडून बाहेरगावी चालला ......खूप रात्र झाली होती .ती दुसर्या दिवसाची वाट पाहू लागली .......पूर्ण रात्र रडून काढली तिने .......त्याचापासून दूर? हि कल्पनाही सहन करू शकली नाही ......एकदाची सकाळ झाली ती कॉलेजला आली डोळे सुजलेलेच दिसत होते ...... की झाले रा.............?

विचारण्याच्या आताच ती कुणाला तरी शोधत पुढे निघून गेली ...........माझा लक्षात आला ती विशाल ला शोधत होती .तेवढ्यात तो समोरून येताना दिसला .."थांब विशाल मला काही बोलायचं आहे तुझाशी तुझा आयुष्यातला फक्त काही वेळ दे मला आज" ती बोलली......डोळे पाणावलेले होते ....मला सोडून जाऊ नको रे !मी खूप प्रेम करते तुझावर!जीवापाड!मी कोणतेही कष्ट करेन तू म्हणशील ते करेन! पण मला सोडून जाऊ नको रे मी नाही जगू शकणार तुझाशिवाय मला समजून घे माझा प्रेमाला! माझा मनाला! समजून घे......".एका श्वासात तिने आपल्या मनातील लाव्हा खाली केला....आणि तो मात्र स्तब्ध .शांत.त्याला काही सुचेनासं झालं .......

तो शांत स्वरात बोलू लागला" हे बघ राज मी तुझ्या भावना समजू शकतो ....मला तुला दुखवायचं नाही होता .पण मी तुझा कडे या नजरेने पाहूच शकत नाही .प्रेम करणे तर दूरच विचारही करू शकत नाही...अग वेडे !कारण प्रेम एकदाच केला जाता आणि ते मी करून चुकलोय आणि मला तिच्याशी प्रामाणिक राहायचं आहे .ती खूप दूर आहे माझापासून तरीही .!तू खूप गुणी ,खूप चांगली मुलगी आहेस ,हुशार आहेस ! तुझाजवळ देवाने दिलेली अनमोल भेट आहे .तुझा आवाज तुझा गाणं .!आपल्या कलेच चीज कर .आपला आयुष सुंदर घडव .........

हा विचार डोक्यातून काढून टाक.....तू मला समजून घे व मला माफ कर .....!एवढा बोलून तो तेथून निघून गेला ....तो नेहमीसाठीच....हि वेडी हो वेडीच ! त्याचा शब्दातला अर्थ समजू शकली नाही . ...आणि एक निर्णय घेतला मनाशीच......आणि आज ती हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत होती .............वाटला परत दोन गालात द्याव्यात ....कुणी आयुष्यातून गेला म्हणून आयुष संपता काय विचारावं ?पण कोणत्याही प्रश्नाचा उउतातर ती देऊ शकत नव्हती कारण आज तिचं एक प्रश्न बनून बसली होती......तिला बघतच ओक्साबोक्शी रडावसं वाटला.......

कसातरी मन आवरून बाहेर आले.......काही दिवसांनी तिची प्रकृतीत सुधारणा झाली.रीआज पूर्ण बंद झालं होता गाणं गाने तर दूर एकातही नव्हती.....पाषाण मूर्ती बनली जणू !काहीतरी शून्यात शोधत असायची कितीतरी वेळ बाहेर पाळण्यावर बसून..........एक मात्र आजही कुणालाच माहित नाही माझाशिवाय कि तिने झोपेच्या गोळ्या का खल्यात?परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे तिने असा केला साऱ्यांनाच वाटत .......

मी पण तिला नको बोलू कुणाजवळ असा वाचन घेतला........आता बरीच महिने झालीत ती बर्यापैकी नॉर्मल आहे रीआज सुरु केलं .गाणं सुरु केलं ....राज स्वताला सावरायला शिकली आता.!आजही ती गाणं गाताना तिच्या गळ्यातून एक वेदनेची लहर येते.......आज तिच्या चंचल ,रोमांटिक गाण्याची जागा संथ ,दर्दी .हृदयस्पर्शी गाण्यांनी घेतली आहे .............गाताना आजही ती त्याला वादकाच्या जागी शोधते.........

पण तो तेथे नसतो .तिच्या चेहऱ्यावर गाताना नेहमी एक गोड स्मित असतं पण त्याचा मगच दुख ............माझाशिवाय जास्त कुणाला कळणार ......."राज" ला जेव्हा जेव्हा मी गाताना पाहते माझे डोळे आपोआपच पाणावतात ........आणि मनातून शब्द ओठांवर येतात .................".प्रेम करावं तर राज सारखा "

Read
अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral

6. प्रेम विवाह

romantic story marathi

दोघांचा प्रेमविवाह झाला होता लग्नाला 2 महिने झाले होते. आज तिला खूप राग आला होता ती रागात बोलली...

ती : आयुष्यात मी मोठी चुकी केली ती म्हणजे तुझ्याशी लग्न करून.

तो :तुला आज कळलं.

ती : हो ना जर आधीच कळलं असतं तर ही वेळ  माझ्यावर आली नसती.

तो : मला पण तसंच वाटतं.

ती : तुला लाज वाटत नाही का असं बोलायला.

तो : यात लाज कसली.

ती : तुझ्याशी बोलून काही फायदा नाही निर्लज आहेस.

असं म्हणून ती आपली कपडे भरायला घेते त्यावेळी तो बोलतो

तो : मी मदत करू का ?

ती : नको काही गरज नाही माझं मी करते.

तो : बरं ठीक आहे पैसे वैगरे आहेत ना जायला ?

ती : तू अजिबात काळजी करु नको आहेत माझ्याकडे.

तो : खरंच तू जानार आहेस ?

ती :तुला मस्करी वाटते का ?

तो : ok ठीक आहे जा.

ती : जाणारच आहे.

तिने आपली बॅग भरली आणि ती जायला निघाली.

तो दारात उभा होता तिने मागे वळून पाहिलं नाही.

ती चालत होती.  अचानक दरवाजाच्या जोरात आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर दरवाजा बंद आणि तो घरात गेला होता.  ती पळत आली दरवाजाजवळ आणि मोठयाने ओरडून लागली...

ती : अरे मी जात नाहीं plz दरवाजा खोल.

तरीही दरवाजा उघडला नव्हता. ती घाबरली. हृदयाची धडधड वाढली डोळ्यातून अश्रू ओघळली.

ती रडत रडत दरवाजा वाजवू लागली 

त्यावेळी त्याने दरवाजा उघडला ती ने त्याला मीठी मारली 

आणि त्याच्या मिठीत रडू लागली  सॉरी म्हणू लागली तोही तिचे अश्रू पुसू लागला

तो : मान्य आहे मला  की मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही पण तुझ्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार होतो तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो

तुझ्यावर खूप प्रेम करतोय

कारण तूच माझा जीव आहेस मी तुझ्यासाठी जगतोय आणि तूच जर नसशील तर मी जगून काय करू सांग ना

ती : sorry पुन्हा अस कधी करणार नाही

मी तुला सोडून कधी जाणार नाही 

तु प्रेमाने भरवलेला घास मी खाईन

तु उपाशी तर मी पण उपाशीच राहीन

माझं सर्वस्व तुला मी वाहीन.

असे बोलून परत एकदा दोघांनी एकमेकांना मिठी मारली  आणि दोघेही  सुख दुःखात एकमेकांना साथ देऊन हातात हात घेऊन  छान संसार मांडू लागले.

आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी जी सुखात साथ जेवढी देते तेवढी दुःखात ही साथ देणारी असावी अशीच आपली life partner असावी.....

तर ह्या होत्या काही मराठी प्रेम कथा (love stories in marathi) तुम्हाला या गोष्टी कसे वाटले आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि आपल्या मित्रां सोबत या गोष्टी share करा.

जर तुम्हाला आणखी प्रेम कथा वाचायच्या असेल तर आम्हाला कंमेंट करून सांगा आम्ही नक्की ऍड करू. 

3 Comments

Post a Comment

Previous Post Next Post