भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi | Ghost Stories in Marathi

जर तुम्ही भुतांना घाबरत नसाल आणि भुतांच्या गोष्टी (Horror Stories in Marathi) वाचण्यात रुची ठेवता तर मग खाली तुम्हा सगड्यां साठी काही भुतांच्या गोष्टी (Bhutanchya Goshti) लिहिल्या आहे. तुम्हाला ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडेल.

Horror Stories in Marathi

या गोष्टयं मध्ये काही लहान भुतांच्या गोष्टी (Short horror stories in marathi) आहे तर काही लांब भुतांच्या गोष्टी (Long horror stories in marathi) पण आहे. 


1. भूतांचे प्रकार

real horror stories in marathi

real horror stories in marathi: "कोकणात १४ प्रकाराची भूते प्रसिद्ध आहेत. एका अनाम व्यक्तीकडून मिळालेली हि पुढील माहिती.

१) वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात. कोकणातील पिशाच्च हे वेताळाच्या आधीन असतात. जो अंगातून भूत काढणारयाच्या देहात प्रवेश करतो व त्याच्याकडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो.

२) ब्रम्हग्रह / ब्रम्हराक्षस: हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते. जो वेदात निपुण आहे. पण  ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला आणि त्यातच त्याचा अन्त झाला.

३) समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध बनतो. हे भूत प्रमुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किव्वा तीठा अशा ठिकाणी पकडते. हे एक संतान नसलेला(निर्वंशी) ज्याचे कोणी कार्य केलेले नसते त्यापैकी असते. कोकणात हे सर्वात ताकदवान भूत मानले जाते. याला जर कोणी देवथ्यानाच्या पुढे केले तर देवथ्यान देखील पुढे येत नाहि.

४) देवचार: हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्ना नंतर थोड्याच दिवसात मरतो. हि भूते गावाच्या चारी बाजूला असतात. कोकणात यांना डावे अंग म्हटले जाते. कोकणी माणसांच्या गाऱ्हाण्यात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. याची सहानुभूती मिळविण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर, खोबरे द्यावे लागते.

५) मुंजा: हे ब्राम्हनांपैकी भूत असते. जो ब्राह्मण  मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो हे त्याचे भूत असते. याचे मुख्य स्थान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहिरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवर्ण्याचे काम करते.

६) खवीस: हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो. हे फार त्रासदायक भूत असते. ज्याला अतिशय क्रुर रीत्या मारले जाते. तो मेल्यानंतर खवीस होतो असा समाज आहे. 

७) गिर्या/गिऱ्हा: जो माणूस बुडून मेला किव्वा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत असते. हे भूत पाण्याच्या आसर्याला राहते. हे फार त्रासदायक असे भूत असते. रात्रीच्या प्रहरात जर कोणी नदी किव्वा  खाडी पार करताना याच्या तावडीत घावाला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात रात्रीच्या वेळी जे कुर्ले, मुळे पकडायला जातात त्यांना हमखास या भूतांचा अनुभव आला असेल. कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हे भूत त्याचा गुलाम बनतो. त्याला हवे ते आणून देतो. प तो केस त्याला पुन्हा मीळाला तर तो त्या माणसावर सर्व तर्हेची संकट सोडतो.

८) चेटकीण: हे मागासर्गीयांचे भूत असते. याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

९ ) झोटिंग: हे भूत खारवी किव्वा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते.

१०) विर: हे भूत क्षत्रिय समाजाच्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो. याला निमा असेही म्हटले जाते.

११) लावसट: ओली बाळन्तिन मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्युनंतर लावसट मध्ये होते.

१२) खुन्या: हे अतिशय क्रूर असे भूत असते. हे हरिजन समाजातील भूत असते.

१३) बायंगी: हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी, लांजा, गोळवशी किव्वा मालवण चौक येथे सुमारे दहा हजार रुपयांना हे विकत मिळते. हे भूत मालकाची भरभराट कराते आणि शत्रूला त्रास देते.

१४) चकवा: हे रात्री बेरात्री जंगलात किव्वा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकाविते. सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही.

Read लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral | छान छान गोष्टी

2. आबा

real ghost stories in marathi

real ghost stories in marathi: "भालचंद्र वैद्य रस्त्याच्या एका बाजूला उभा होता. हातातील ब्याग एका बाजूला ठेवून तो बंद पडलेल्या एस.टी बस कडे बघत होता. बसचा कंडक्टर आणि चालक बस दुरुस्तीचा प्रयत्न करीत होते. दोन चार इतर प्रवासीही हतबल पणे उभे होते. 

डॉक्टरकीची परीक्षा देऊन भालचंद्र मुंबईहून कोल्हापूरला त्याच्या खेडे गावात आई वडिलांना भेटायला आणि सुट्टी घालवायला आठवडाभर आला होता. भालचंद्रच्या घरात नावाने आणि पेशाने सगळे वैद्यच.

घाट उतरता उतरता अचानक एस. टी. बस मध्ये बिघाड झाला आणि बस बंद पडली. रात्रीचे ११.३० वाजले असतील. अर्धा तास भालचंद्र तसाच उभा होता. आधीच बसला वेळेनुसार बराच उशीर झाला होता. इतक्यात कंडक्टर प्रवाश्यांकडे आला आणि म्हणाला, “बस चालू व्हायला उशील लागल, म्याक्यानिक आणावा लागल. माफ करा पण तुम्हाला इथून पुढ या एस. टी ने जाता येणार न्हाय...”

भालचंद्र वैतागला होता काय बोलावे आणि काय नाही तो गप्प उभा होता. इतर प्रवासी काहीबाही बडबडत रस्त्यावर इतर वाहनांना हात दाखवत होते पण कोणी थांबेल तर शपथ.

सरळ रस्त्याने चालत गेलो तर किमान दोन तास तरी लागतील. एखादे वाहन मिळाले तरी फाट्यावरून चालत वीस मिनिटे जावे लागेल. भालचंद्राचे विचारचक्र चालू होते. भालचंद्राने मागे वळून पहिले. एक छोटा डोंगर होता, त्याच्या माहितीतला. मारुतीची टेकडी. लहानपणा पासून तो या टेकडीवर खेळत आला होता. चढायला सोपी पण थोडी पसरत अशी ती टेकडी होती.

टेकडी चढून उतरलो तर पायथ्याशीच आपला गाव. अवघी तीस मिनिट लागतील. त्याने हातातील घड्याळ उगाचच सरळ केल्यासारखे करून वेळ पहिली. मध्यरात्र सुरु झाली होती १२ चा काळ उलटून पाच दहा मिनिटे झाली होती. त्याने क्षणभर विचार केला आणि खाली ठेवलेली ब्याग उचलली.

भालचंद्र चालत टेकडीच्या पायथ्याशी आला. ब्यागेतून त्याने छोटेखानी टोर्च काढला त्याच्या अंधुक प्रकाशात तो टेकडी चढू लागला. आजूबाजूला काळामिट्ट अंधार पसरला होता. रातकिड्याचे किर्र गायन वातावरणात एक गूढ निर्मिती करीत होते. इतर वेळी भालचंद्र झपझप टेकडी चढून उतरला हि असता पण आज का कुणास ठाऊक पण त्याचे पाय अगदी सावधपणे पडत होते. माहितीतील रस्ता असूनही मनात एक अनामिक भीती भालचंद्रच्या मनात उठत होती. काही वेळात भालचंद्र टेकडी चढून वर आला. समोर निळसर पण गडद अंधार होता. गार वारा सुसाट वाहत होता. उजव्या बाजूला आणखी एक चढ टेकडीच्या वरच्या अंगाला जात होता तेथे शेत जमीन होती. तेथे त्याचा मित्र रंगा पाटलाचा मळा होता. क्षणभर भालचंद्रला वाटले, मळ्यावर जावे आणि रंग्याला घेऊन जावे सोबत. पण रंग्याहि मळ्यावर नसला तर. कापणीचा हंगामहि सरून गेला होता. मळ्यावर कदाचित कोणी नसेलही. असा काहीसा विचार करत भालचंद्र उभा होता.

मळ्यावर जाण्याचा विचार मनातून काढून भालचंद्र पुढे चालू लागला आणि इतक्यात समोरून कोणीतरी येत असल्याचा भास भालचंद्रला झाला. दाट झाडी आणि झुदुपांमुळे अंदाज लागत नव्हता पण कोणीतरी त्याच्या दिशेने येत होते. भालचंद्रने टोर्च त्या दिशेने फिरवला पण चार पाच पावलापुढेच त्याचा प्रकाश खुंटत होता. 

इतक्या रात्री कोण असावे या निर्जन टेकडीवर या विचाराने भालचंद्रच्या छातीत धडकी भरली. पुढे जावे कि मागे पळावे, त्याला काही सुचेना. गार वार्यातही त्याच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला. तो हळू हळू डावीकडे सरकू लागला आणि एका झाडामागे जाऊन उभा राहिला. समोरून कोण येत असावे हे पाहण्यासाठी तो हळूच मान वाकवून झाडामागून बघत होता. समोरून येणारी व्यक्ती हळू हळू जवळ येत होती. अंधुक निळ्या प्रकाशात ती व्यक्ती भालचंद्रला दिसू लागली. साधारण सहा फुट उंच अशी ती व्यक्ती हातात काठी घेऊन पुढे चालत येत होती. डोक्यावर भगवा फेटा आणि अंगात पांढराशुभ्र सदरा आणि धोतर असा पेहराव होता. तो माणूस चालत चालत भालचंद्रच्या बराच जवळ आला.

भालचंद्रला ती व्यक्ती आता स्पष्ट दिसली होती. भालचंद्र उडी मारून झाडाबाहेर आला.

“दादा तुम्ही”, भालचंद्र. भालचंद्र त्याच्या वडिलांना दादा म्हणायचा (ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वडिलांना दादा म्हणण्याची पद्धत अजून हि आढळून येते).

“भाल्या अरे तू टेकाडावर कशापायी आलास रस्ता न्हाय व्हय याला”, दादा.

भालचंद्रने बंद पडलेली एस.टी आणि झालेल्या उशिराबद्दल सविस्तर सांगितले. 

“पण इतक्या रात्रीचे तुम्ही या टेकाडावर कसे आणि कुठे निघालात”, भालचंद्र.

“अरे अडलेल्याची मदत करायची रीत आपली, मित्राकड निघालो व्हतो... पर ते जाऊदे तू आता चल माझ्यासोबत तुला टेकाड उतरून देतो आणि परत जातो मित्राकड”, दादा.

भालचंद्र दादांकडे पाहत होता. गेल्या सहा महिन्यात बराच फरक दादांच्या चेहऱ्यात आला होता. सुरकुत्या वाढल्या होत्या. वयही बरेच वाढल्यासारखे वाटत होते.

टेकडीवरचा वारा अधिकच थंड जाणवू लागला. रात किड्यांची कीर कीर थांबली होती आणि वातावरण अधिक गुढरम्य भासत होते. हळू हळू अंगाला झोम्बणाऱ्या गार वाऱ्याने भालचंद्र थोडा अस्वस्थच झाला होता.

जास्त काही न बोलता दादा मागे वळून चालू लागले आणि भालचंद्र त्यांच्या मागून चालू लागला. काही काळ कोणी काहीच बोलले नाही. दादा भालचंद्र पासून पुढे झपझप चालत होते.

“दादा येवड्या रात्रीच कोणाला घेऊन तरी बाहेर पडायचं. एकटे का निघालात”, भालचंद्र.

“गड्या गाव आपला, रस्ता आपला कशाला कोणाची भीती हाय”, दादा.

पुढचे पंधरा वीस मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये गेले. चालता चालता कधी टेकडी उतरून आलो भालचंद्रला कळालेच नाही.

“बर.. भाल्या तू घरला जा मी माग फिरतो”, दादा.

बर म्हणून भालचंद्र तसाच उभा राहिला. दादा मागे वळून झुडपांमध्ये गडपहि झाले. भालचंद्र चालत चालत घरी आला. रात्रीचा एक वाजला होता. घरी भालचंद्रची आई वाट पाहत होती. मिनिमिनता छोटा दिवा भिंतीच्या एका कोपर्यात ठेवला होता. वनी त्याची छोटी बहिण झोपली होती.

“भालू, इतका उशीर होय रे, काय झाल? तुझे दादा तुला बघायला भायेर गेले”, आई.

“अग आई एस.टी बिघडली होती म्हणून उशीर झाला आणि रस्त्याने चालत आलो असतो तर अजून दोन तासांनीच आलो असतो.”

“आणि दादा भेटले मला टेकाडावर...”, भालचंद्र.

“टेकाडावर...”, आईचा आश्चार्योदगार.

“का ग काय झाल?”, भालचंद्र.

“पर हे तर त्यांच्या मित्राच्या मोटारीन गेले आणि फाट्यावर जाऊन बघतो म्हणाले.”, आई.

क्षणभर कोणी काहीच बोलले नाही. भालचंद्रहि थोडा गोंधळला. 

“बर असुदे मी हात पाय धुऊन घेतो” म्हणत भालचंद्र मोरीकडे वळला.

सर्व आवरून भालचंद्र आणि आई दादांची वाट पाहत बसले तसे दादा एका मोटारीवरून अंगणात आले. भालचंद्रकडे बघून त्यांचा जीव भांड्यात पडला.

“भाल्या अरे कुठ कुठ शोधायचा तुला, इतका का उशीर, कुठ होतास?”, दादांनी प्रशाचा भडीमार चालू केला.

भालचंद्र मात्र स्तब्ध उभा दादांकडे फक्त बघत उभा होता.

दादा जर मला टेकाडावर भेटले नव्हते तर तो माणूस कोण जो माझ्यासोबत...

भालचंद्र विचार करत करत अंथरुणावर पडून होता. कोपर्यातल्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश भिंतीवरच्या ओळीने लावलेल्या फोटोंवर पडला होता. ओळीने एक एक फोटो तो पाहत होता आणि त्याची नजर पडली त्याच्या दिवंगत आजोबांच्या फोटोवर. तोच चेहरा अगदी तंतोतंत. धारदार नजर, किंचित बसके पण सरळ असे नाक. मूडपलेले पातळ ओठ आणि झुबकेदार मिशा. दादा अगदी आबांसारखेच दिसतात...

Read अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

3. म्हातारा

bhoot story in marathi

bhoot story in marathi: "A.D ११३ मध्ये मरण पावले रोमन सिनेटचा सदस्य प्लिनी धाकटा यांनी सांगितलेली एक सत्य कथा. गावात एक भला मोठा वाडा होता, प्रशस्त खोल्या असलेला. तो वाडा कुप्रसिद्ध होता. कोणीही त्या घरात जिवंत राहू शकले नाही. अमावाश्येच्या काळ्या रात्री तेथे भयानक आवाज येत असत. लक्षपूर्वक ऐकले तर लोकांडी साखळ्यांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत असे. याच आवाजान्मधून एक म्हातारा तेथे प्रकट होत असे. पाय बांधलेले, पिंजारलेले केस, वाढलेली दाढी असा किळसवाना तो म्हातारा.

तो वाडा अतिशय कमी पैशात भाड्याने देऊ केला तेव्हा अथेनोद्रौस नावाच्या एका तत्वज्ञाने तो वाडा भाड्याने घेतला आणि तेथे राहायला गेला. तेथे त्याला भयंकर गोष्टींचा अनुभव आला. एका रात्री त्याने त्या म्हाताऱ्याला त्या घरात पहिला. तो म्हातारा आला आणि घराच्या एका कोपऱ्यात विलीन झाला. हे सर्व त्याने पहिले. 

दुसऱ्या दिवशी त्याने ती जागा खणण्यास सांगितली. त्या खणलेल्या जागी एक मानवी हाडांचा सापळा सापडला. साखळीन वेढलेला तो सापळा त्याच म्हतार्याचा होता.

त्या सापळ्याला योग्य ठिकाणी विधिवत दफन करण्यात आले. त्यानंतर त्या वाड्यात ते आवाज परत कधीच ऐकू आले नाहीत आणि तो म्हाताराही पुन्हा दिसला नाही.

Read तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi

4. झपाटलेले घर

short horror story in marathi

Short horror story in marathi: "‘Amityville’ या अमेरिकेतील एका गावात घडलेली अतिशय भयानक आणि बहु चर्चित अशी सत्य भय कथा आहे. रोनाल्ड देफ़िओ नामक इसमाने त्याच्या राहत्या घरात त्याच्या आई वडिलांचा आणि चार मुलांचा खून केला. पोलिसांच्या तपासानुसार आलेल्या माहिती प्रमाणे रोनाल्ड ने वापरलेल्या बंदुकीला सायलेन्सर लावले नव्हते तसेच प्रतिकार झालेल्या कोणत्याच खुणा घरात आढळल्या नाहीत. तपास्कारांना हि मोठी बुचकळ्यात टाकणारी बाब होती.

१९७५ मध्ये लुत्झेस नावाचे एक परिवार त्या घरात राहण्यास आले. हा परिवार तेथे जास्तीत जास्त एक महिना राहिला. या एका महिन्यात त्यांना तिथे अमानवी आणि भयानक अशा गोष्टींचा अनुभव आला.

घरामध्ये अनेक प्रकाचे भयानक आवाज येत असत खासकरून रात्रीच्या वेळेस. त्या परिवारातल्या लहान मुलीला एक लहान मुलगी दिसायची जिच्या सोबत तिने मैत्री केली होती. तिचे डोळे लालभडक होते. भिंतीवर आदळ आपट होत असे आणि घरातील फर्निचर सुधा जागेवरून हलत असे.

अलौकिक तपासकार एड आणि लॉरेने वॉरेन चौकशी करण्यासाठी बोलाविले गेले होते. त्यांच्या तपासानुसार घर पछाडले होते. असे ऐकिवात आहे कि नवीन राहण्यास आलेल्या परिवारातील मुख्य पुरुषाला पछाडले गेले होते आणि त्याने सुधा आपल्या मुलांवर जीवघेणा हल्ला केला होता. पण आई मुळे ती मुले बचावली.

Read Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत

5. डॉक्टर राजेश आणि म्हातारा

marathi horror story

Marathi horror story: "डॉक्टर राजेश ची कोकणात बदली होऊन दोन तीन दिवस झाले होते. कोकणातल्या सरकारी दवाखान्यात त्याची क्लास वन सर्जन म्हणून नेमणूक झाली होती. राहायला सरकारी घर मिळाले होते. पण ते बाजार पेठेपासून दूर दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर होते. रस्त्यात अधे मध्ये इतर हि घर आणि वस्ती होती पण फारच तुरळक.

एके दिवशी राजेशला दवाखान्यात इमर्जन्सी केस आली होती त्यामुळे त्याला निघायला खूप उशीर झाला. जवळ मोटार सायकल होती. ती घेऊन तो घराच्या रस्त्याला लागला. दवाखाना आणि घर अशे जवळपास पाच ते सहा किलोमीटर चे अंतर होते.

राजेश मोटार सायकल घेऊन निघाला आणि त्या निर्जन रस्त्यावर आला. आजूबाजूला किर्रर्र वातावरण आणि भयाण काळोख पसरला होता. मोटार सायकलच्या हेडलाईट च्या प्रकाशात राजेश हळू हळू चालला होता. अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूने काहीतरी सरपटत त्याच्या मोटार सायकल समोरून उजवीकडे निघून गेले तसा राजेश चा तोल ढासळला आणि तो खाली पडला. त्याने चपापून इकडे तिकडे नजर फिरवली. काय होते ते कि आपल्याला भास झाला. उठून त्याने मोटार सायकल सरळ केली आणि सुरु करू लागला पण मोटार सायकल चालूच होईना.

राजेश ला दरदरून घाम फुटला होता. आता काय करावे.आजूबाजूला कोणीच नव्हते. मदत मागण्यासाठी ना कोणी मनुष्य होता नाही आजूबाजूला एखाद घर. काय करावे असा विचार चालू असतानाच मागून एक थंडगार हात राजेश च्या खांद्यावर पडला. हृदय गोठणे हि काय अवस्था असते ते राजेशने पुरेपूर त्याक्षणी अनुभवले. हळूच त्याने मागे वळून पहिले.

एक साठीचा इसम त्याच्यासमोर उभा होता. उंचपुरा मजबूत शरीरयष्टी आणि तितकेच राकट डोळे.

“माझी बायको खूप आजारी आहे. मला मदत करा”
“कोण तुम्ही आणि कुठे राहता”, राजेश ने चाचरत विचारले.
“मी रंगा वेताळे”, तितकेच थंड उत्तर. “डॉक्टर माझ्या बायकोला खूप ताप भरलाय. डॉक्टर ची खूप गरज आहे. तुम्ही माझ्यासोबत आलात आणि तिला तपासालात तर...”
“हो नक्कीच, चला”, मुळचा मदत करण्याचा स्वभाव असलेला राजेश आढेवेढे न घेता लगेच तयार झाला.

चला म्हणून तो इसम रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने पुढे चालू लागला. राजेशने गाडीची चावी काढून घेतली आणि त्याच्या मागून चालू लागला. वाटेत त्याने काही जुजबी प्रश्न केले पण काही प्रतिसाद मिळाला नाही. तो इसम भराभर पुढे चालत होता. पायवाट आता संपली होती पुढे घनदाट झाडी दिसत होती. राजेश च्या मनात अचानक भीतीची एक लहर उसळली. हि वाट तर जंगलात जाते...

अचानक राजेशच्या पायाजवळून काहीतर सरपटत पुढे निघून गेले ते थेट त्या इसमाच्या पायाला भिडले. इतका वेळ राजेशच्या हा प्रकार लक्षात आला नव्हता, त्या इसमाचे पाय शरीराच्या विरुद्ध दिशेला वळले होते आणि तो थेट पुढे चालत होता. राजेशने डोळे विस्फारले भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले. गर्भगळीत होऊन तो तेथेच उभा राहिला आणि तो इसम पुढे चालत चालत एका झाडीमागे गुडूप झाला.

राजेश धडपडत पळत त्याच्या मोटार सायकल जवळ आला. थरथरत्या हातांनी त्याने चावी लावली. दोन तीन झटक्यात मोटार सायकल सुरु झाली. आणि तितक्यात डावीकडून आवाज आला “आज वाचलास...” आणि भयंकर शांतता पसरली.
(डॉक्टर राजेशला आणखी इतर विचित्र अनुभव त्या गावात आले. ते लवकरच प्रकाशित केले जातील) 

Read Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये

6. डॉक्टर राजेशचे घर

marathi horror story read online

Marathi horror story read online: "डॉक्टर राजेशला कोकणात येऊन दोन आठवडे उलटले होते. दिवस बरे चालले होते. राजेशचा बराचसा वेळ इस्पितळातच जात असे. आठवड्या पूर्वीचा तो म्हतार्याचा अनुभव सोडला तर दिवस तसे सामान्यच गेले होते. आणि एका रात्री...

राजेश रात्री साडे नऊ वाजता इस्पितळातून घरी आला. जेवण गरम करून त्याने खाऊन घेतले. नेहमी प्रमाणे राजेश जेऊन झाल्यावर घरासमोरील अंगणात फेऱ्या मारत होता. त्या दिवशी अमावस्या होती. बाहेर काळाकुट अंधार पसरला होता. दूरवरून अधून मधून कुत्र्याचे रडणे कोल्हेकुई ऐकू येत होती. दूरच्या घरांमधील मिणमिणते दिवे दिसत होते.

राजेशला राहायला मिळालेले घर फार मोठे प्रशस्त होते. घराबाहेर अंगण. अंगणात एक आंब्याचे झाड त्याला कच्या कैरयाही लगडल्या होत्या. दोन मजली मोठाले असे घर होते. तसे पाहता राजेश एकटाच तेथे राहत होता. एकट्यासाठी त्याने खालील मजल्याच्या दोन खोल्या वापरात घेतल्या होत्या. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घराच्या आतूनच एक जिना होता. वरच्या खोल्या सर्व बंद होत्या. राजेश कडे त्या खोल्यांची चावी होती पण वापरत नसल्याने त्याने त्या बंदच ठेवल्या होत्या.

रात्रीचे अकरा वाजून गेले होते. राजेश अंगणातून घरात आला आणि सर्व दार खिडक्या बंद करून घेतल्या. त्याच्या खोलीत जाऊन तो थोड्या वेळातच झोपी गेला.

साधारण मध्य रात्रीचे अडीज वाजले असतील. राजेश गाढ झोपेत होता आणि अचानक क्र्रर्र्रर्र क्र्रर्र्रर्र असा आवाज सुरु झाला. रात्रीची भयाण शांतता त्या विचित्र आवाजाने भंग झाली. 

क्र्रर्र्रर्र... क्र्रर्र्रर्र... क्र्रर्र्रर्र.... आवाज सतत चालू होता. हळू हळू त्या आवाजाने राजेशची झोप मोड होऊ लागली. राजेशची झोप मोड झाली आणि तो अंथरुणात उठून बसला. त्या आवाजाची तीव्रता आता वाढली होती. राजेशला शंका आली कोणीतरी घराच्या आत आले आहे आणि जिन्यावरून चालत आहे. राजेश घामाने थबथबला होता. हृदयाचिः धडधड वाढत होती. राजेश लक्षपूर्वक ऐकू लागला त्या आवाजात अस्वस्थता आणि चाल्बिचलता होती. कोणीतरी जिन्यावरून खाली उतरत होते पुन्हा वर चढत होते. पुन्हा खाली पुन्हा वर... अशा काहीसा अंदाज राजेशला येत होता. खोलीचे दार राजेशने बंद करून घेतले होते. त्या दारा समोरच तो जिना होता. राजेश ला एका क्षणी वाटले उठून दार उघडून पाहावे कोण आहे ते. पण मनात एक अनामिक भीती उसळत होती. कदाचित यात त्याच्या जीवालाही धोका होता. काय करावे आणि काय नाही अशा अवस्थेत राजेश बसून होता. बाहेरचा आवाज संथपणे पण चालूच होता.

शेवटी राजेश जागेवरून उठला. रात्रीचे तीन वाजले होते. सर्वात आधी राजेशने खोलीतील दिवा सुरु केला. अर्धवट उघडी असलेली खिडकी त्याने पूर्ण उघडली. बाहेरचा थंडगार वारा घरात शिरला. दूरवर काळामिट्ट अंधार पसरला होता.

राजेश हळू हळू खोलीच्या दारापाशी आला. कडी काढून त्याने मागचा पुढचा विचार न करता झटक्यात दार पुढे लोटले, पण सावध पणे. तत्क्षणी तो आवाज तेथून नाहीसा झाला. समोर जिन्यावर राजेशची सावध-भीतीयुक्त नजर रोखली होती पण जिना रिकामा होता तेथे कोणीच नव्हते. राजेशने घरातील दिवे लावले. जिना चढून वरती जाण्याचा धीर राजेशला होत नव्हता. घरात एक प्रकारची मरण शांतता पसरली होती. बाहेर दूरवरून कोल्हेकुई आणि कुत्र्यांचे रडणे चालू होते. राजेश थोडावेळ दिवानघरात बसून राहिला.

काही वेळ गेल्यानंतर राजेश त्याच्या खोलीत येऊन बिछान्यावर अडवा झाला. समोर जिना दिसत होता. बराच वेळ राजेशला झोप लागली नाही. पहाटे कधीतरी राजेशचा डोळा लागला आणि तो झोपी गेला.
सकाळ झाल्यावर राजेश उठला. यंत्रवतपणे त्याने आपली तयारी उरकून घेतली आणि इस्पितळात निघून गेला. रात्री घडलेला प्रकार तो विसरला नव्हता पण कामात त्याने स्वतःला गुंतवून घेतले. 
पुढचे काही दिवस अगदी सामान्य गेले. राजेशला तो आवाज पुन्हा ऐकू आला नाही, आणि राजेश हळू हळू तो प्रसंग विसरूहि लागला होता.

Read Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज कथा 

7. झाड

marathi bhutanchi story

Marathi bhutanchi story: "हि साधारण दीड दोन वर्षा पूर्वीची घटना आहे. आम्ही नवी मुंबईत घर भाड्याने घेतले होते. कमी पैशात मोठे घर मिळत असल्याने मागचा पुढचा विचार न करता वडिलांनी लगेच निर्णय घेतला होता. एका सात मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर ते घर होते.

आमच्या घरी मी, आई-वडील आणि दोन लहान भाऊ असा आमचा पाच जणांचा परिवार. रविवारच्या दिवशी आम्ही सर्व त्या घरात राहण्यास गेलो. घर फार मोठे असे होते. प्रशस्त दिवाणखाना. दिवाणखान्याला लागुनच एक मोठी बाल्कनी होती. बाल्कनीतून समोरच पिंपळाचे एक मोठेच्या मोठे झाड होते. एवढे मोठे पिंपळाचे झाड कदाचित मी पहिल्यांदाच बघत होतो.
गेल्या बरोबर आम्ही एक छोटीशी पूजा केली होती. नातेवाईक हि आले होते. सर्व कार्यक्रम आटोपल्यावर पांगापांग झाली. 
संध्याकाळ उलटून गेली होती. अंधार पडू लागला होता. घरातला पहिला दिवस अतिशय मजेत चालला होता. 

पण अचानक...

रात्रीचे नऊ वाजले होते. मी आणि माझा छोटा भाऊ परब दिवाणखान्यात टीवी बघत बसलो होतो आणि अचानक तुषारचा(सर्वात छोटा भाऊ) जोरात रडण्याचा-ओरडण्याचा आवाज आला. आम्ही सर्व धावत आतल्या बेडरूम मध्ये पळालो आणि बघतो तर तुषार खिडकीकडे बोट करून रडत होता. आईने त्याला जवळ घेतले आणि शांत केले. बाबांनी खिडकीचे पडदे बंद करून घेतले. पडदे बंद होता होता माझी ओझरती नजर त्या पिंपळाच्या झाडावर पडली. का कुणाश ठाऊक पण रात्रीच्या चांदण्यात त्या पिंपळाची काया खूपच भयावह वाटत होती.

काही दिवस खूप मजेत गेले. आम्ही सर्व त्या नवीन घरात हळू हळू रुळू लागलो होतो. आणि अचानक एके दिवशी आणखी एक घटना घडली...

आई तेव्हा स्वयंपाक घरात काम करत होती. बाबा कामावरून घरी आले नव्हते. मी, परब आणि तुषार दिवाण खाण्यात बसलो होतो. आणि अचानक आई जोरात ओरडत स्वयंपाक घरातून बाहेर आली. आम्ही तिघही खूप घाबरलो. आईने आम्हा तिघांनाही जवळ घेतले. तिच्या चेहरा भयभीत झाला होता. मी तिला विचारले असता तिने काहीच सांगितले नाही. 

रात्री बाबा घरी आल्यानंतर आईने बाबांना बाल्कनीत नेऊन काय घडले ते सांगितले. मी तेव्हा चोरून अर्धवट असे काही ऐकले...

आई सांगत होती “मी स्वयंपाक घरात काम करत होती. भाजी चिरून मी शेगडी चालू केली. आणि अचानक माझी नजर खिडकीतून समोरच्या झाडावर पडली. तेव्हा मला तेथे कसलीतरी हालचाल जाणवली. मला वाटल एखादा पक्षी किव्वा मांजर वगैरे असेल. पण काही क्षण् नीट पाहिल्यावर मला जाणवले. फांदीवरून कोणीतरी माझ्याकडे नजर रोखून बघत आहे, आणि काही कळायच्या आतच एक काळीकुट सावली झाडावरून सरपटत खाली आली...”
हे ऐकून माझ्या जीवाचा थरकाप उडाला. बाबांची प्रतिक्रिया यावर काय होती ती काही मी ऐकली नाही पण आठवड्याभरातच आम्ही ते घर सोडून निघून गेलो पुन्हा कधीच न येण्यासाठी.

Read Sanskar Katha in Marathi | संस्कार कथा मराठीत

8. शेळी

Bhutanchya goshti marathi

Bhutanchya goshti marathi: हि एक ऐकिवात कथा आमच्या कोल्हापुरातल्या गावची. माझ्या काकांकडून हि कथा मी ऐकली. माझ्या वडिलांचे आजोबा म्हणजे माझे पंजोबा. त्यांचे नाव शामराव होते. पंजोबा खूप उंच, धिप्पाड आणि धीट होते.

हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझे पंजोबा तरुण होते. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळेस गावात वाहन नसायचे. गावातील लोक पायीच किव्वा बैलगाडीने प्रवास करीत असत.

एकदा माझ्या पंजीला म्हणजे वडिलांच्या आजीला माहेरहून बोलावणे आले होते. माहेरून काही मंडळी पंजीला न्हेण्यास घरी आले होते. तेव्हा पंजोबाही त्यांच्या सोबत बैलगाडीने पंजीला सोडण्यास निघाले. गाव फार असे लांब नव्हते बैलगाडीने तासभर अंतरावरच होते. तर.. पंजोबा सोडायला गेले तेव्हा दुपार होती. घरी पोहचल्यावर दुपार उलटून गेली होती आणि अंधार पडू लागला होता. पंजोबांच्या सासर्यांनी त्यांना जेऊन तेथेच रात्री थांबण्याची विनंती केली, त्यांनी जेवण करण्यास होकार दिला पण रात्रीच निघणार असे सांगितले.

रात्री जेवण उरकल्यावर पंजोबा घरी जाण्यास निघाले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. सोबत मेहुणा येणास तयार झाला पण पंजोबांनी त्याला सोबत घेण्यास मनाई केली आणि ते एकटेच पायी निघाले. 

रात्रीचे शुद्ध चांदणे पसरले होते. गावाची वेस ओलांडून पंजोबा मुख्य रस्त्याला आले. खडकाळ रस्त्यावरून थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांनी डोंगर चढून जाण्याचा निर्णय घेतला. कारण डोंगर चढून उतरल्यावर गाव जवळच होता आणि वेळहि कमी लागला असता.

पंजोबा डोंगर चढू लागले. चंद्राच्या निळसर प्रकाशात पायवाट स्वच्छ दिसत होती. पंजोबा चालत चालत बरेच पुढे आले तेव्हा त्यांना एक शेळी दिसली. एवढ्या रात्री हि शेळी इथे कुठून आली अस म्हणून त्यांनी झडप घालून त्या शेळीचे पाय ओढले आणि तिला उचलून आपल्या खांद्यावर घेतली. शेळी खांद्यावर गप्प बसून होती तिचे दोन्ही पाय पंजोबांनी घट्ट पकडून धरले होते. थोडे अंतर चालून गेल्यावर एक छोटा ओढा लागला. ओढ्याला उथळ पाणी होते. पंजोबा पाण्यात उतरले आणि हळू हळू सावरत चालू लागले.

पाणी गुढग्यापर्यंत आले होते. पंजोबा शेळीला घट्ट पकडून हळू हळू सावरत ओढ पार करत होते आणि अचानक त्या शेळीचे पाय हळू हळू लांब पसरट होऊ लागले. बघता बघता त्या शेळीचे पाय ओढ्याच्या पाण्याला टेकले. हे बघून पंजोबांनी त्या शेळीला उचलून गरगर फिरवून दूर ओढ्याच्या अलीकडे फेकून दिले आणि झप झप पाय ओढीत ते ओढ्याच्या पलीकडे आले. मागे वळून न पाहता ते भराभर पुढे चालू लागले तेव्हा एक आवाज आला 

‘आज वाचलास’...

Read Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा

9. मुडदा घर

murda ghar horror story

Murda ghar horror story : "हि आमच्या डॉक्टर काकांकडून ऐकलेली एक घटना. साधारण चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा आमचे डॉक्टर काका मिरजच्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकत होते. मेडिकल कॉलेज तसे बरेच जुने आणि सरकारी. इस्पितळात एक मुडदा घर होते. त्या मुडदा घराबद्दल बरेच प्रवाद ऐकिवात होते. कोणी म्हणे तेथे रात्री आत्मे फिरतात. रात्री बारा नंतर तेथे रडण्याचे, ओरडण्याचे आणि इतर विचित्र आवाज येत असतात. एका वार्ड बॉयला येथे रात्रपाळी करीत असताना महिलेचा रडण्याचा आवाज आला. खिडकीतून वाकून बघतले असता एक जळलेली स्त्री तिच्या पलंगावर उठून बसलेली त्याला दिसली. ते पाहून तो तेथून पळत सुटला ते परत आलाच नाही.

त्यांच्या कॉलेज मध्ये एक मुलांचा ग्रुप होता. एकदा रात्री गप्पा मारता मारता पैज लागली. जो कोणी मुडदा घरात रात्री बारा नंतर एक तास थांबून परत येईल त्याला हजार रुपये. सात आठ जणांच्या त्या ग्रुप मधल्या एका मुलाने ती पैज स्वीकारली. विराज असे त्या मुलाचे नाव होते.

दुसऱ्या दिवशीच्या रात्री सर्व तयारी झाली. मुडदा घराबाहेररील दरवानाला थोडे फार पैसे आणि दारूची एक बाटली देऊन तेथून कटवण्यात आले. रात्री ठीक बाराच्या सुमारास विराज तयार झाला. मुडदा घराचे कुलूप उघडले आणि तो आत शिरला. दार मागे लोटून दिले तसे बाहेरच्या मुलांनी टाळा परत लावून दार बंद करून घेतले.

मुडदा घरात भयाण शांतता पसरली होती. खिडक्यांमधून अंधुक प्रकाश मुडदा घरात पसरला होता. पहिली पाच मिनिटे विराज दरवाजा जवळील भिंतीला टेकून फक्त समोर बघत होता. काही वेळ गेल्यावर तो खाली बसला. धीटपणा असला तरी भीती मनात हळू हळू दाटत होती. 

रात्री बाराचा सुमार आणि भयाण अशा काळोखात मुडदा घरात आपण एकटेच या विचारांनी विराज थोडा अस्वस्थ होऊ लागला होता. वीस मिनिटे उलटली होती. विराज तसाच बसून होता. डोळे टक्क उघडे होते. मुडदा घरात स्थब्ध वातावरण होते. विराजच्या समोर ओळीने पलंग होते आणि त्यावर ठेवेलेले मुडदे. विराज हळू हळू एक एक करून सर्व प्रेतांवरून त्याची नजर फिरवीत होता. निचेतन होऊन पडलेल्या त्या मृत शरीरांसोबत एका बंद खोलीत आपण एकटे बसलो आहोत हि जाणीवच हृदय गोठवणारी आहे. एक क्षण विराजला हि पैज स्वीकारल्याबद्दल पश्चाताप हि झाला.

मुडदा घराची शेवटची खिडकी उघडी होती तेथून प्रकाशाचा झोत सरळ एका प्रेतावर पडत होता. विराजची नजर त्या प्रेतावर पडली. का कुणास ठाऊक पण विराजला अंधुकशी हालचाल त्या पलंगावर जाणवली. विराजच्या अंगातून भीतीची लहर सळसळ करीत थेट मेंदूत घुसली. विराज उठून उभा राहिला. भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले होते.

आणि अचानक....

शेवटच्या पलंगावरची हालचाल आता स्पष्ट विराजला दिसू लागली. हळू हळू ते प्रेत त्याच्या जागेवर उठून बसू लागले होते. अंगावरची पांढरी चादर तशीच त्या प्रेतावर पसरली होती. विराजच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. ओरडण्यासाठी त्याने आ वासला पण घशातून आवाज बाहेर पडत नव्हता. ते प्रेत आता कमरेतून सरळ होत पलंगावर उठून बसले होते. डोक्यावरून चादर हळू हळू खाली सरकत होती. एक भयंकर किंकाळी फोडत विराज दरवाज्यावर हात आपटू लागला.

बाहेरच्या मुलांनी गडबडीने टाळा खोलत विराजला बाहेर काढले. बाहेर आल्या आल्या विराज पळत सुटला. ओरडत किंचाळत तो इस्पितळाच्या बाहेर गेला. काही मुले त्याच्या मागे धावली तर काही मुले फिदीफिदी हसत होती. 

विराज पैज हारला अशी चर्चा करीत मुले उभे होते. आतून त्यांचा मित्र सुखराम मुडदा म्हणून पलंगावर झोपणार होता त्याची वाट बघत...

बराच वेळ झाला सुखराम आतून बाहेर आला नव्हता तेव्हा मुले मुडदा घरात गेले. सुखराम चौथ्या पलंगावर चादर ओढून पडला होता. त्याला मुलांनी उठवला आणि बाहेर घेऊन आले.

मुलांनी मुडदा घराला टाळा लावून तेथून निघून गेले. सुखरामला आत काय काय घडले ते विचारण्यात आले तेव्हा त्याला कोणत्याच घटनेची पुसटशीही कल्पना नव्हती असे कळाले. विराज चे मुडदा घरात येणे, ओरडत किंचाळत बाहेर जाणे काहीच नाही. सुखराम जेव्हा मुडदा घरात जाऊन पलंगावर झोपला तेव्हा काही क्षणातच त्याला भयंकर थंडी वाजू लागली आणि काही कळायच्या आताच तो तेथे बेशुद्ध होऊन पडला होता. हे ऐकून मुलांची बोबडी वळली.

सुखराम जर तेथे बेशुद्ध होऊन पडला होता तर त्या शेवटच्या पाचव्या पलंगावर कोण...?

Read Mahabharat Stories in Marathi | महाभारत कथा मराठीत

10. एक अनुभव - आवाज 

Ek anubhav avaaz

मी लहान होतो, अवघा 14-15 वर्षाचा. ऊन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या कुटुंबासोबत गावी गेलो होतो.  गावच्या वातावरणात मी रमलो, मला गावी जायला खुप आवडायचे म्हणजे मला अजूनही आवडते. गावी काही दिवस मजेत गेले पण एका रात्री आम्ही सर्वजन जेवण करत होतो ,माझ जेवण सर्वाच्या  आगोदर झाले. मी हात धुऊन घराबाहेर आलो कारण आमच्या गावाला आमचा वाडा आहे .मी  वाड्याबाहेर सहज आलो व वाड्याच्या बाजूला एकटा उभा होतो. 

थंडगार वारा वाहत होता. वातावरण एकदम शांत होते. अगदी मला हवं  तसं. परंतु अचानक एका लहान, खूप लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. पण त्या वेळेस गावात कोणाकडेच,कोणाच्या घरी लहान मुलगा नव्हता आणि माझ्या माहिती नुसार त्या काळात आमच्या गावात एकही बाळ नव्हते.

 पण मला तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी त्या आवाजाकडे आपोआपच ओढला जात होतो. मला ती वेळ अजूनही आठवते, मला कळत होते मी त्या आवाजाकडे खेचला जातोय, मी काय करतोय, माझ्याबरोबर काय होत आहे हे मला कळत होतो पण  मी स्वताला त्या आवाजाकडे जाण्यापासून स्वताला रोखु शकत नव्हतो. तितक्यात माझ्या काकांनी मला  आवाज दिला, तसा मी दचकलो व जागीच थांबलो व तरीही मला तो आवाज ऐकू येत होता. मी लगेचच काकांना विचारले, तुम्हाला कोणत्या बाळाच्या रडण्याचा आवाज  येत आहे का?
काका म्हणाले,"नाही येत, का... रे काय झालं"

“मला एका बाळाचा आवाज ऐकू येत आहे. आत्तासुद्धा येत आहे” मी. 
काका म्हणाले ,"अरे... मला कसा नाही येत मग". मी विचारात पडलो. 
काका बोलले,"जाऊंदे विचार नको करूस, कधी कधी भास होतात आपल्याला. चल झोपायची तयारी करूयात."  
पण मला तो आवाज आजही आठवत आहे.

Read Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi

11. बळी

badi horror story

कोल्हापूर जिल्ह्यातील घाटात वसलेले एक छोटेसे गाव, सावरगाव. गाव तसे जेमतेम वस्ती असलेले. शहरापासून किमान दीड तासाच्या अंतरावर वसलेले. गावात अजून एस.टी चालू नव्हती झाली. तालुका बाजार अथवा कोल्हापुरात जाण्यासाठी चालतच किव्वा बैलगाडीने २-३ मैल कापून वेशीपर्यंत यावे लागत आणि तेथून एस.टी पकडून पुढे जावे लागे. गावात प्राथमिक शाळा सुरु झाली होती. जुन्या पिढीचे शिक्षण झाले नसल्याने अजूनही अनेक जुन्या रूढी परंपरा तसेच अंधश्रद्धा गावावर रूढ होत्या.

गावात मध्यभागी गावदेवीचे मंदिर होते. मंदिरासमोर मोठे झाड होते, तीच गावाची चावडी, येथे दररोज लोकांची ये जा चाले. झाडाभोवती मोठा कट्टा बांधला होता, तेथे गावाची सभा भरे, तसेच निवांत गप्पा मारीत बसण्याची ती सर्वांची आवडती जागा होती.

सकाळ झाली होती, गावात लोकांची वर्दळ चालू झाली होती. पाणी भरायला बायका, गडी माणसे घरातून बाहेर पडली होती. पाठीवर दप्तर घेऊन लहान मोठी मुल शाळेत निघाली होती. सकाळची लगबग थोडी कमी झाली, चावडीवर दोन-तीन माणस निवांत बसली होती. साधारण सकाळचे ८.३० वाजत आले होते.

नामा गावातच वाढलेला वीस बावीस वर्षाचा तरुण होता. लहानपणीच आई वडिलांचे छत्र डोक्यावरून हरवले होते. होते नव्हते ते सर्व मोठ्या काकाने गीळन्कृत केले आणि त्याच्या वाटेला बेवारशाचे जिने आले, कुणी दिले तर खावे नाहीतर असेच पडून राहावे असे जिने झाले. हळू हळू नाम्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो वेड्यासारखा एकट्यानेच बडबड करू लागला. लोक त्याला वेडा नाम्या म्हणू लागले.

तेव्हा सकाळी नाम्या चावडीवर येऊन बसला. नेहमीप्रमाणे स्वतःशीच बडबड चालू होती.

“माळावर माणूस मारलाय.... तिकड बगीतल म्या.... कसा मारला.... डोक्यातून रगात भायेर आलय सगळ....तिकड जाऊ नग....तुलाबी मारल......हा हा हा.....”, अशी असंबंध आणि अखंड बडबड त्याची चालू होती.

चावडीवरच्या माणसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हळू हळू माणसांची पांगापांग झाली. दुपारचे बारा वाजले होते. शाळा सुटली. बबन्या आणि त्याचे मित्र शाळेतून बाहेर पडले. बबन्या सातवीत शिकणारा १०-१२ वर्षाचा मुलगा.

“चला र माळावर जाऊया....कैऱ्या पाडाय...”, बबन्या मित्रांना बोलला.

बबन्या आणि त्याच्या मित्रांचा कैऱ्या तोडायचा तसा रोजचाच कार्यक्रम झाला होता. शाळेसमोरच्या मोठ्या पटांगणा पलीडके एक छोटी टेकडी लागत होती. ती चढून गेल्यावर साधारण १० मिनिटे चालून पुढे गावाचा माळ सुरु होत होता. तेथे लोकांच्या शेतजमिनी होत्या तसेच बराच विस्तीर्ण असा परिसर होता, झाडा झुडपांनी वेढलेला. सहसा लोक कामाशिवाय त्या परिसरात जात नसत. 

बबन्या  आणि त्याचे मित्र उड्या मारत, दंगा मस्ती करत माळावर पोचले. शेतालगतच्या एक दोन झाडावरचे राहिले साहिलेले आंबे त्यांनी काढले.

“आर... येवड्याच कैऱ्या आज...”, किश्या बोलला.

“च्यायला...चला थोड आत जाऊ....रानात लई झाड हायती....कैऱ्या काय चीचापण काडून आणूया...”, असे म्हणत बबन्या पुढे चालू लागला, तसे बाकीची मुलही त्याच्यामागून चालू लागली. 
थोडं आत गेल्यावर, आंबे चिंचेची बरीच झाडे दिसली. सर्व मुल कैऱ्या चिंचा काढण्यात मग्न झालीत. बबन्याची नजर थोड्या दूर असलेल्या एका चिंचेच्या झाडावर पडली, तो पुढे गेला त्या झाडापाशी आला, दगड उचलण्यासाठी तो खाली वाकला आणि समोर त्याची नजर गेली, समोरील दृश्य पाहून त्याची बोबडी वळली, तो किंचाळला. त्याचा आवाज ऐकून बाकीचे दोघ तिघे तिकडे गेलीत आणि ते दृश्य पाहून सर्वांच्या छातीत धडकी भरली. समोर एका माणसाचा मृतदेह पडला होता. डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली गेली होती. धावत पळत सर्व जन तेथून बाहेर पडले.

माळा जवळच्या जंगलात पोलीस जमले होते. मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेहाची बरीच छिन्नविच्छिन अवस्था झाली होती. मृतदेहाची मरणोत्तर तपासाची अंतर्गत एक वेगळीच बातमी समोर आली ती म्हणजे त्या इसमाचा खून करून त्याच्या शरीरातील महत्वाचे अवयव काढून घेण्यात आले होते.

जागेचा पंचनामा झाला. पोलिसांनी त्यांची सूत्र जोरात हलवली. चौकशी दरम्यान त्या मृतदेहाची ओळख पटली. तो इसम सावरगावातीलच होता. त्याचे नाव रघुनाथ शेवाळे असे होते. त्याच्या घरी चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान असे समोर आले कि, रघुनाथ दोन दिवसांपूर्वी घरून तालुक्याला जाण्यासाठी निघाला होता. तालुक्याला इमारत बांधणीच्या एका कामासाठी तो चार पाच दिवस बाहेरच राहणार होता, पण अचानक त्याच्या घरी त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि घरी आक्रोश झाला. पोलिसांची चौकशी बरेच दिवस चालू होती. जंग जंग पछाडूनहि हवी तशी माहिती-पुरावे पोलिसांना मिळत नव्हते.

इतका भयंकर प्रकार गावात पहिल्यांदाच घडला होता. गावात भीतीचे वातावरण पसरले होते. बरेच दिवस निघून गेले.

दीड महिन्यानंतर

त्या दिवशी अमावस्या होती. शिवराज घरातून निघाला होता, त्याला कामानिमित्त तालुक्याला जायचे होते तसेच काहीदिवसांसाठी तो बाहेरच राहणार होता. रात्रीचे आठ वाजून गेले होते. शिवराज पायी चालत निघाला होता. शाळेसमोरील पटांगण ओलांडून तो एका पायवाटेवरून चालत निघाला, काही वेळ चालल्यानंतर दुरून गावाचिः वेस दिसू लागली. आजूबाजूला घनदाट अंधार पसरला होता. सर्व घर मागे पडली होती. शिवराज चालत होता आणि अचानक मागून त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार झाला.

रात्र सरून गेली, सकाळी काही गावकरी मिळून माळरानात लाकूड आणायला निघाली होती. ते तिघे-चौघे रानात पोचले. जळणासाठी रानात लाकूड आणायला गेलेल्या त्यांना काय माहित कि त्याच्या दृष्टीस काही अभद्र असे पडणार होते.

रानातल्या त्याच चिंचेच्या झाडाखाली शिवराजचा मृतदेह पडला होता. छिन्नविछिन्न अवस्थेत. बाजूला एक मोठा दगड पडला होता. लाल लिंबू तसेच इतर काही चित्र-विचित्र वस्तू तेथे पडल्या होत्या. अगदी रघुनाथ शेवाळे प्रमाणेच शिवराजलाही आपला जीव गमवावा लागला.

पंचनामा झाला. पोलिसांची तपासचक्र चालू झाली. पोलिसांना तसेच गावकऱ्यांना कळून चुकले होते कि हा नरबळी देण्याचा भयंकर अघोरी असा प्रकार गावात सुरु झाला आहे. 

घडलेल्या या प्रकारानंतर गावात भयंकर भीतीचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांना वेळीअवेळी बाहेर जाण्यास बंदी होऊ लागली. लहानच काय तर बाया-बापडेहि जीवाला घाबरून राहू लागले. गावात चित्र-विचित्र चर्चा होऊ लागल्या. कोणी म्हणे माळावरच्या रानात भुतखेत आहेत, आत्मा आहेत. घरात, चावडीवर याविषयी चर्चा रंगू लागल्या.

गावात जखूबाबा राहायचा. त्याचे झोपडीवजा घर वेशीपासून अलीकडे थोड्या अंतरावर होते. गावात त्याला सगळे घाबरून राहत असत. तसेच गावातील विचित्र प्रकारच्या अडचणी त्याच्या खऱ्या-खोट्या विद्येने दूर करीत असे त्यातून मिळणाऱ्या पैशाने त्याचा उदरनिर्वाह चालत असे.

त्या दिवशी रात्री जखूबाबा त्याचा घरात बसला होता, घराचे दार उघडेच होते. जखूबाबा दारासमोरच समोर बसला होता, दारात कोणीतरी आले होते, त्याने हाताने खून करत आत येण्यास सांगितले तशे ते जोडपे आत येऊन जखुबाबा समोर येऊन बसले. जाखुबाबाचे मंत्रोच्चार सुरूच होते. 

काहीवेळ गेल्यानंतर....

“दोन बळी पाडले आहेत आणखी दोन बळीची गरज पडणार हाय...”, जखुबाबा बोलत होता.

“जखुबा... लई जोखीम हाय त्यात... आणि आता पोलीस गस्तीवर असत्यात... गावकरी सावध झाल्यात... तू सांगितल्या परमान दोन बळी दिल्यात... कदी गावनार गुप्तधन....”, समोरील व्यक्ती.
“जास्त शानपन करू नागोस...”, जाखुबाबा ओरडला.

“मी सांग्तुय त्यापरमान करा... आर त्यात तुमचाच फायदा हाय... हा... आन न्हाय केल तर काय होईल तुमास्नी चांगलाच म्हाईत हाय....एकदा सुरु केल्याल काम आस आर्ध सोडता याच न्हाय...हा...”, जाखुबाबा तीरसाठासारख बोलत होता.

झोपडीत चाललेल्या त्या अघोरी चर्चेत भंग पडला तो बाहेरील कसलाशा आवाजाने. आवाज खिडकीजवळून आला होता. सर्वांनी तिकडे पाहिले. एक लहान मुलगा तेथे उभा राहून सर्व ऐकत होता. तो बबन्या होता. आपण पाहिले गेलोय हे कळताच बबन्या तेथून पळत सुटला. ते जोडपे लगबगीने उठून जखुबाबाच्या झोपडीतून निघून गेले.   

बबन्या घरी घाबरून बसला होता. बबन्याचा बाप त्याच्यासमोर बसला होता.

“आर बबन्या हे समद आपल्या भल्यासाठीच करतोय मी आन तुझी आई....”

“म्हंजे बा गावातल दोन खून तू आन आयन केल्यात....”, बबन्या.

“आर खून न्हाय...खून नग म्हणू.... बळी हाय त्यो.... त्याग अस्तुय त्यो....एक निवीद अस्तुय त्यो.... देवासाठी केलला.... तू अजून ल्हान हायस.... पर तुला सांगून ठेवतो.... गप गुमान रहा.... कुणालाबी यातलं कळता कामा नये...समजल... आर हे काम केल्यावर लई भरभराट हुईल आपली... तुला रोज नवी कापड घालय मिळतील... खायला चांगल चुंगल मिळल... काय न्हाय ते सार सार मिळल... आणि...”, बबन्याचा बाप विकट हसत बोलत होता, “आन तुझ्या मनातली पोरागीबी तुला मिळल....हा...हा...हा...”

बबन्या थोडा सावरला होता. बापाने दाखवलेल्या आमिषांना तो बळी पडला. याबद्दल त्याने कोणाकडेच चर्चा केली नाही.

काही दिवस निघून गेले. बबन्याच्या घरी आता तिसऱ्या बळीबद्दल चर्चा सुरु झाली होती. बबन्याला सर्व प्रकार माहित पडल्यापासून त्याच्या समोरच सर्व चर्चा होत असे. ठरल्याप्रमाणे तिसऱ्या बळीची सर्व तयारी झाली होती. 

यावेळेस पाळी होती हनमंतची. हनमंत गावातलाच तिशीतला तरुण होता. त्याला तालुक्याचे काम मिळाले होते. लगबगीने तो घरातून निघाला. इकडे बबन्याच्या बापाने सर्वप्रकारची खबरदारी घेतली होती तसेच तयारीची केली होती. घरातून निघालेला हनमंत वेशीपर्यंत पोचलाच नाही, खरे इप्सित साध्य झाले ते बबन्याच्या बापाचे गावात तिसरा बळी गेला होता.

हनमंतच्या घरात आक्रोश झाला होता तर बबन्याच्या घरी आनंद साजरा झाला.

पोलीसहि पुरते गोंधळून गेले होते. एका खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोवर दुसरा खून पडत होता. सर्व खुनामागे फक्त एक सामान्य धागा होता तो म्हणजे, हे खून म्हणजे कोणीतरी आपले अघोरी इप्सित साध्य करण्यासाठी दिलेले हे बळी होते, तसेच मृताच्या शरीरातून अवयव काढले जात होते. पण हे कोण करत होते याबाबतीत पोलीस आणि गावकरी पूर्णपणे अंधारात होते. 

जखूबाबाच्या झोपडीत बबन्याचा बाप आणि त्याची आई बसले होते.
“तीन बळी पार पडल्याती आता शेवटचा आणि एक पायजे हाय...बास...”, जाखुबाबा.
“जखुबा...पर धन कदी गावायच....”, बबन्याचा बाप.
“मिळल मिळल.... घाई करू नग.... आर देवाच काम हाय हे.... कोपबीप झाला म्हंजी कायच मिळायचं न्हाय... वाटून दिल्याली काम करायची.... फळ आपोआप मिळत्यात....”, जखुबाबा.


शेवटचा बळी द्यायची चर्चा बबन्याच्या घरात सुरु झाली होती. शेवटच काम आणि त्यानंतर मिळणार गुप्त धन या सर्वाचा विचार करून बबन्याचा बाप आणि आई उत्साहात होते. 
बबन्या मधल्या घरात पुस्तक वाचत बसला होता. स्वयंपाक घरात त्याचे आई वडील बोलत बसले होते.
“शकू आता शेवटचा बळी दिला म्हंजी काम झाल बग आपल...”
“व्हय... मला तर नुसता पैसाच पैसा दिसतुया... पर आता शेवटचा बळी कुणाचा द्याचा...”
“आता बळी मारुती झगड्याचा...”
हे बोलण ऐकून बबन्या बाहेर बेचैन झाला, पण तो गप्प राहिला, अभ्यासात बबन्याचे लक्ष लागले नाही.

तो दिवस उजाडला होता. सर्व तयारी झाली होती. 

संध्याकाळचे सात वाजले होते. मारुती झगडे घरातून बाहेर पडला. ठरल्या प्रमाणे शाळेसमोरील पटांगण ओलांडून मारुती पुढे निघाला. छोट्या पायवाटेने मारुती चालत पुढे निघाला. त्याच्या मागावर कोणीतरी होते याचा मागमूसहि त्याला नव्हता. एका झाडामागे बबन्याचा बाप लपून बसला होता. मारुती पुढे चालत होता, वेळ आली होती. बबन्याचा बाप चोर पावलांनी दबकत दबकत त्याच्या मागून गेला, डोक्यात प्रहार करणार इतक्यात...
“जागेवरच थांब नायतर गोळी घालीन”

पोलीस आले होते, अचानक आलेल्या पोलिसांमुळे बबन्याचा बाप भांबावून गेला. तेथून निसटण्याचा त्याने प्रयत्न केला पण हवालदार आणि पोलिसानी त्याला पकडून त्याच्या मुसक्या बांधल्या.
बबन्या समोर उभा होता. पोलिसांना बबन्यानेच सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.
“बा... तू केल ते लई वंगाळ केल बा... तेवा तुज आन आयच बोलन ऐकल... पुढचा बळी मारुती काकाचा... ह्ये ऐकून जीव ऱ्हायला न्हाय.... मारुती काकाचा बळी तू दिला असता तर माझ्या मित्राच किश्याच काय झाल आसत....त्याच्या आयन तर रडून रडून जीव दिला असता.....रातभर या इचारान झोप लागली नाय मला...पर मनाशी पक्क ठरिवल मारुती काकाला मारू द्याच न्हाय...”, बबन्या रडत होता. 

बबन्याच्या बापाला पोलीस घेऊन गेले. त्याच्या या सर्व दुष्कृत्यात सहभागी असलेल्या बबन्याची आईला आणि जखूबाबालाही अटक करण्यात आली. 

चौकशी अंतर्गत एक फार विचित्र आणि मन भांबावून टाकणारी गोष्ट समोर आली ती म्हणजे या सर्व खून अथवा बळी सत्रामागील मुख्य सूत्रधार गावातील एक नामांकित व्यक्ती होती. या सर्व गोष्टींमागे गावचा सरपंच मुख्य सूत्रधार होता. 

सरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सरपंचानी पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्नही केला पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही, सरते शेवटी सरपंचानी आपला गुन्हा मान्य केला आणि सर्व गोष्टींचा खुलासा केला.
गावातल्या माणसांचे गेलेले बळी म्हणजे सरपंचाच्या फायद्यासाठी केलेले अक्षम्य आणि अघोरी गुन्हे होते. यासाठी सरपंचाने जखूबाबाची मदत घेतली होती. जखूबाबाने या देवभोळ्या आणि परिस्थितीने गांजलेल्या माणसांना गुप्तधनाचे आमिष दाखवून बळी घेण्यास सांगितले आणि मुळात त्यामागे गुप्तधन, खजिना असं काहीहि मिळणार नव्हत, खरी संपती मिळणार होती ती सरपंचाला. खून केलेल्या माणसाचे अवयव रातोरात विकले जात होते. 

बळी देण्यासाठी ठरवलेल्या माणसाला फितावण्याचे काम सरपंचाच्या माणसांचे होते. त्यांना तालुक्याला चांगल काम देण्याचे आमिष दाखवले जात होते. कशाना कशा प्रकारे संध्याकाळी घरून निघण्यास सांगायचे आणि तिथून पुढे काम बबन्याच्या बापाचे होते.

या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि प्रकरणावर पडदा टाकला. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

अशा प्रकारे गावातील घडलेल्या या मोठ्या खून सत्राचा पडदा फाश झाला. गावकरयांनाहि एक मोठा धडा मिळाला होता. असे बळी देऊन अथवा दुसऱ्याचे घर उद्वस्थ करून कधीच कोणाच भल होत नाही.

समाप्त

12. उतारा

long horror story in marathi

long horror story in marathi: 'आई ग... पायात काहीतरी घुसलय, काय घुसलय हे माहीत नाही पन घुसलय हे नक्की , वाईट कळ उठलीय पन थांबून चालणार नाही.. ,
नाही नाही..... आनवानी नाही.. पायात चपला घातल्यात पन झिजून झिजून टाचेखाली चंद्रकोर तयार झालीय... त्यातुनच एखादा दगड टोचलाय.. पन ओरडुनही चालणार नाही, आणी बोलुनही चालणार नाही.. जे बोलायच ते मनातल्या मनातच.
  तसा रस्ता खुपच सुनसान आहे , 
रस्ता कसला ..? आणी सुनसान तरी कसला..? 

शेतातील ऊस वहातूक करणा-या ट्रैक्टर, बैलगाड्यानी ये जा करून तयार झालेला कच्चा रस्ता...  चिखलात रूतलेल्या चाकांनी दबलेली जमीन आणी मधे ऊगवलेले खुरटे गवत , एरवी दिवसा इकड नदीला कपडे धुण्यासाठी जाणा-या महीला आणी शेतात काम करणा-या काही लोकांव्यतीरीक्त कोणी फिरकत नाही तर एवढ्या रात्री कोण येईल... तशी रात्र पन बरीच झाली आहे. म्हणजे घरातुन बाहेर पडलो तेव्हा आकरा वाजुन गेले होते. त्यातच हे पावसाचे दिवस . हातामधे पिशवीचे बंध घट्ट पकडलेत आणी त्याच हातात मोबाईल चा टॉर्च लावलाय. त्याच्या पांढ-या बल्ब च्या प्रकाशात वाट गवसतेय..  मघापासुन मुख्य रस्त्यावर होतो तेव्हा काही वाटल नाही पन आता थोडी भिती वाटतेय. थोडी म्हणजे, जरा जास्तच भीती वाटतेय , कारण हा पाच , सात फुटांचा कच्चा रस्ता.. आजुबाजूला कमरेपर्यन्त वाढलेले गवत आणी दुतर्फा दाट झाडी...  त्यातच बर्रर्रर्रर्रर्रर्र कन चिखलात पाय जाताच हळूच पाय बाहेर काढुन जमिनीवर आपटतोय का ते सांगायची गरज नाही. तेवढे तुमच्या लक्षात येत असलच... मंद वारा सुटलाय... त्यातच वा-याची एखादी मोठी झुळूक आली की ती उंच उंच झाडांच्या काळ्याकुट्ट आकृत्या एका संथ लयीत डोलायला सुरवात करतात... जसे मान डोलाऊन आपल्याकडे येण्यास खुनावत आहेत... मघापासुन गंम्मत वाटत होती पन आता मात्र या सगळ्या वातावरणाची भिती वाटतेय.  कपाळावर जमा होणारे घामाचे थेंब आणी क्षणाक्षणाला वाढत जाणारी काळजाची धडधड मला पुढ जाण्यापासुन थांबवायचा प्रयत्न करताहेत , त्यात भरीत भर म्हणुन ही भयान काळी रात्र. म्हणजे ती रोजच असते पन आज तीची भिषणता सपशेल जाणवतेय.

खरतर मला एका ठिकानी पोहोचायचय, म्हणजे सोबतच हे जे साहीत्य आहे ते एका ठिकानी द्यायच आहे.... द्यायच नाही...!तर ठेवायच आहे...
गावाबाहेरून जी नदी वहाते, तीच्या काठाजवळ एक भल मोठ पिंपळाच झाड आहे.. तशी नदिकाठी झाडाझुडपांची बरीच गर्दी आहे पन त्या पिंपळाच्या झाडाखाली किंचीत रिकामी जागा आहे... तीथच हे साहीत्या ठेवायच, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे... तीथच कोणीतरीे माझ्या योण्याची वाट पहात बसलय, त्या ठिकानी...! जीथ सहसा कोणीही जात नाही...
साहीत्या म्हणजे काय...?
तर बघा.... उजव्या हातात बांबूच्या लहानसहान काड्यांनी विनलेली ही छोटीशी टोपली आहे... त्यात पांढरा भात आणी त्यावर विस्कटुन टाकलेला 'गुलाल'.... गुलाल ...! तोच जे विजयी झाल्यावर तोंडाला लावतात आणी मयत झाल्यावर छातीवर टाकतात... 
तोच तो....

डाव्या हातात एक कापडी पिशवी ज्यात एक देशी दारूची बाटली आणी मस्त मसाला वगैरे घालुन तयार केलेल मटन, जे पळसाच्या पानांमधे गुंडाळी करून त्यात ठेवलय... त्याचा खमंग वास न रहावुन तोंडात लाळ आणतोय... तसा या मोकळ्या वातावरणात वास नाही येत आहे पन ते मटन भरायला मीच होता... म्हणुन... आणखी एक दोन पुरचुंड्या आहेत ज्यात काळी हळद आणी काही काळे दाणे, जे तीथ पोहोचल्यावर त्या जागी ठेवायचे आहेत...
एक एक मिनीट...! अस वाटतय की कोणीतरी माझ्या मागुन येतय... कदाचीत माझा पाठलाग होतोय... पन सक्त ताकीद आहे की मागे पहायच नाही त्यामुळे काय करावे सुचेनास झालय... कारण मागुन येणा-याची चाहुल स्पष्ट जाणवतेय... पन मागे बघु शकत नाही...   मला सांगितलय वळुन पहायच नाही आणी बोलायचही ना...............
बाप रे.......! हे मी काय करतोय......?
म्हणजे , बोलायच नाही अस बजावलय तरी मी बडबड करत निघालोय....!
पन माझी ही बडबड मनातल्या मनात सुरू आहे... मनातल्या मनात बोललेल चालत असेल कारण मनात तसेही हजारो विचार येत असतात.....
पन कोणीतरी येतय, मागुन.... 
मला जाणवतय की या वाटेवर मी एकटा नाही ..
पन कोणी नसेल... एवढ्या रात्री कोणी इकड येईल ....?  पन असेलही... म्हणजे मी हे साहीत्य ठेवतोय की नाही हे पहायला कोणीतरी आलय, की ज्याच्यासाठी हे साहीत्य आहे तोच मागे येतोय....? हे पहायला की मी चुकून त्यातल काही उष्ट तर करीत नाही याची खात्री करायला....

असो मला माझ काम संपऊन लवकर परत जायचंय.... कारण माझ्या ही पोटात उंदरांनी भुकेन झिंग झींग झींगाट घालायला सुरवात केलीय..
आता मी हे काय आणी का घेऊन निघालोय हा प्रश्न पडला आसेल ना....? 
हम्म.... सांगतो हो... त्याच अस झाल ... मागच्या एक दोन आठवड्यात म्हणजे गणेश चतुर्थी आधी शेजारची छोटी मुल आपापल्या आईंसोबत नदीला आली होतीत... आता सर्व महीला कपडे धुण्यात मग्न होत्या तर मुल लपंडाव खेळत होती.... त्यातच मगदुमांची छोटी 'प्रांजल'.. ती ही होती.... बराच वेळ झाला पन कुठच दिसत नव्हती.... सर्वांना वाटल मुल घरी गेलीत तीही गेली आसेल , पन ती गायाबच होती.... सा-याजणी आवरून घरी आल्या पन पोरगी कुठच दिसेना... मग काय.... बोंबाबोंब.... इकड तीकड शोधाशोध झाली पन काहीच सुगावा लागेना... त्यात चौगल्यांचा छोटा निक्कू , म्हणजे निखील... तो म्हणाला  नदीजवळ खेळताना लपुन बसती ती परत दिसलीच नाही.... मग काय.....सायंकाळी 6 ला सर्वच नदीकाठी... 'ती' सापडली पन बेशुद्ध.... त्याच पिंपळाखाली.... घरी आणली ...... बेडवर शांत पडुन होती... तीच्या आजोबांनी तोंडावर पाणी मारल तशी शुध्दीवर आली...  मी बाजुलाच उभा होतो... तीनं खाडकन डोळ उघडले तर ते रक्तासारखे लालबुंद झाले होते... झटकन उठून बसली आणी आपली नजर तीथ जमलेल्या प्रत्येकावर रोखुन धरू लागली... चेह-यावर विस्कटलेले केस आणी रक्ताळलेले डोळे..  ती सात, आठ वर्षाची निरगस मुलगी पन काळजाचा थरकाप उडवणारी रखरखती नजर... घरघरणारा श्वास आणी बिछाण्याला घट्ट पकडुन प्रत्येकाला भुकेल्या वाघीणीसारखी पहात होती. माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता.... 

बघा.. अजुनही आठवल तरी काटा येतोय.. तीला अस पहून सर्वांनीच ओळखल की हे काहीतरी वेगळ आहे... आम्ही तीथुन बाहेर पडलो आणी चार दिवस सायंकाळची कट्ट्यावर हीच चर्चा रंगली...

आठ दिवस असेच गेले, त्या रात्री मंडळाचे सर्व कार्यकर्ते गणपतीचे स्टेज घालत होतो... आकरा वाजले असतील... मगदुमांचे घर स्टेजपासुन हाकेच्या अंतरावर... अचानक एका बाईच्या किंकाळीने आम्ही सर्वच हादरून गेलो...  आवाजाच्या दिशेने पाहील तर मगदुमांच्या घरातले लाईट पटापट लागले आणी पुन्हा तशीच किंकाळी कानावर पडली... आम्ही धावत गेलो आणी दरवाजा वाजवायला सुरवात केली. त्या आजोबांनी दरवाजा उघडला पन ते ही थरथर कापत होते... 

त्यांनी आतल्या रूमच्या दिशेने बोट केल तसे आम्ही दोघे आत शिरलो....  प्रांजल ची आई बेशुध्द जमिनीवर पडली होती तर तीचे बाबा सुन्न होऊन एकटक डाव्या बाजुच्या लैप्टवर पहात होते... आम्ही काही बोलणार तोच  माझीही नजर तीकडे गेली तसा मी ही दोन पावल मागे सरकलो... 

प्रांजल... अंगावर पांढरा फ्रॉक होता तर मोकळे केस चेह-यावर पसरलेले... लैप्टवर बसली होता... पाय खाली मोकळे सोडुन मागे पुढे झोके देत होती आणी तीची क्रुर भेदक नजर आमच्यापैकी प्रत्येकावर पडत होती.. पाटलांचा आतुल आणी मी दोघेच पुढ होतो... म्हणजे आमच्यात धाडशी तो अतुलच... माझ्या बद्दल सांगायला नको....

तशी मलाssss,  भीती वाटत नाही..  पन थोडा घाबरतो... इतकच. 
मी तसाच उभा होतो की मघाच्या त्या किंकाळीने जागे झालेले आजुबाजूच्या घरातले लोक आत आले... 

' ती ' प्रत्येकाला  पहात होती . अगदी रागाने..  जशी चवताळली आहे.. एखाद्याच्या अंगावर झेप घेऊन नरडीचा घोट घ्यावा असे तीचे हावभाव... प्रत्येकाला पहात जोेरजोरात पायांना झोके देऊ लागली... ' प्रांजल' म्हणुन तीच्या बाबाने हाक दीली तसे झटकन तीन पायांची हलचाल बंद करून खाली मान घालुन बसुन राहीली... पुर्ण मिनीटभर सर्वत्र एकदम शांतता होती...  प्रत्येकजन लैफ्टवर बसलेल्या प्रांजल कडेच पहात होता..  आणी अचानक ती जोरात किंचाळली... पन तो आवाज वेगळा होता.... भरडा...... जसा कोणी करड्या आवाजाच्या आणी धिप्पाड शरीरयष्टी असलेला पुरूष रागाने वेडा होऊन ओरडेल असा तो आवाज होता... त्या आवाजाने उपस्थीतांपैकी प्रत्येकाच्या अंगावर शहारा आलेला...  या परिस्थीतीत काय कराव हे कोणालाच सुचेनास झाली की इतक्यात ती बेशुध्द होऊन खाली पडली, पन माझ्या पुढे असलेल्या अतुलने तीला अलगद पकडले...

बाजुचे जोशी काका तीथच होते... तीला बेडवर झोपवुन आम्ही बाहेरच्या हॉलमधे बसलो. एव्हाना तीची आईही शुध्दीवर आली होती..
जोशी काकांनी तीच्या आईकडे पहील..
"तुला सांगितल होत ना पोरीला नदीकाठची बाधा झालीय ...." काका थोडे रागातच म्हणाले...
" पन 'यांचा' असल्या गोष्टीवर विश्वास नाही, मी तरी काय करू..?"  प्रांजल ची आई खाली बसत डोक भिंतीला टेकत रडु लागल तसा काकांनी आपला मोर्चा तीच्या बाबांकडे म्हणजे रमेश कडे वळवला...
"काय रे... तुला सांगितलेल समजत नाही...? तुझ्या बापान कधी आजवर माझा शब्द ओलांडला नाही , आणी तु.....?"
रमेश मात्र मान खाली घालुन भिंतीला तक्या देऊन निमुटपने ऐकत होता
तसे काका पुढ म्हणाले ...
" आठ दिवसापुर्वीच सांगितलेल तुझी साडेसाती सुरू आहे गाडी जपुन चालव , घेतलास ना पाय मोडुन... आता हे पोरीच अस..."
" ये थेरड्या..." 
एका भरड्या आवाजाने सर्वच स्तब्ध झालो.. सर्वांनी बेडवर झोपलेल्या प्रांजल कडे पाहीले... कारण ती ज्या भरड्या , पुरषी आवाजात ओरडली तसाच आवाज होता... पन ती तर शांत झोपलेली..... आणी पुन्हा आवाज घुमला..
"म्हातारा झालास पन अजुन माज उतरला नाही तुझा...."
त्या आवाजान तीथला प्रत्येकजन अचंबीत झाला... प्रांजल चे वडील 'रमेश' खाली मान घालुन बसलेले आणी भयंकर रागाने ते जोशी काकांना बोलत होते... तसा अतुल त्याच्या अंगावर धाऊन गेला...
"काय रे....तुझ्या बापाच्या वयाचे ते अस बोलतोस त्यांना.... भो*** मस्ती आलीय काय रे...."
तशी झटकन रमेश ने मान वर केली आणी तीथल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला... लाल रक्ताळलेले डोळे, चेह-यावरच्या क्रुर छटा आणी आवाजातील ती घरघर ... रमेश ताडकन उठुन उभा राहीला, त्याला पाहुन काळजात चर्रर्रर्रर्रर्र कन झालं.. अतुल तर मागेच सरकल मी हळुहळू दरवाजा कडे सरकु लागलो...म्हणजे ऐन वेळी दरवाजा शोधायला नको म्हणुन.... 

रमेश न समोरच उभ्या अतुलची कॉलर पकडुन त्याच्या डोळ्यात डोळे घालुन पाहू लागला...  मी सपशेल अतुलचे हातपाय गळताना पाहीलेत... तो खुपच घाबरून गेला होता.. मी अतुलला मागे खेचु लागलो तशी आपली ताकत एकवटुन अतुलन रमेशला जोराचा धक्का दिला, रमेश मागे पडला आणी अतुलही धडपडत बाजुला झाला पन काहीच न बोलता तो दरवाजा कडे धावला आणी घर गाठल.... जर मी ही तीथुन गेलो असतो तर आजवरचा इथल्या लोकांचा माझ्यावरचा विश्वास सत्यात उतरला असता की मी.... म्हणुन आवंढा गिळुन मी तीथच थांबलो....

"क.....क...... काय झाल......?" रमेश भानावर येत चाचपडत बोलु लागताच तसे काका म्हणाले
" हे असच घरातल्या प्रत्येकात संचारत राहील.... 'अमावस्येच्या' आत सांगितलेल साहीत्य तयार करून तो 'उतारा' घरातल्या प्रत्येकाच्या अंगावरून उतरून रात्रीच्या वेळी पिंपळाजवळच्या दगडावर ठेऊन यावा लागेल... मगच 'ते' परत त्याच्या जागेवर जाईल, नाहीतर अनर्थ ओढवुन घ्याल..."
" पन कोण ठेवणार...? माझी ही अवस्था अशी वडीलांना थोड चालल तरी धाप लागतेय..."
रमेश हताशपने म्हणाला.
"शेजारच्या एखाद्या मित्राला सांग.." म्हणत काकांनी नजर आम्हा सर्वांवर फिरवली ... मी जरा गर्दीत 'आडाला' झालो तसा बाजुच्या खिडकीतुन आत डोकावणारा सागर ओरडुन मला म्हणाला...
" संज्या.... तु लपु नकोस.... तुला कोणी नाही सांगत.... सगळ्यांनाच माहीती आहे तु किती धाडशी आहेस ते...ख्या ख्या ख्या" 
आमचे सर्वच मित्र हसु लागले..
चार चौघात आपमान केला नालायकाने.. खरतर चारचौघात अपमान केला, याsssच काही वाटल नाही पन तीथच जोशी काकांची मुलगी 'अस्मिता', हाताची घडी घालुन उभी होती.. तीच्या समोरच माझा... आता कुठ जरा लाईन देत होती, त्यात आमचे दोस्त, तीला समोर बघुनच माझा उध्दार करतात... 
मग तावातावात मी ही म्हणालो...
" मी जातो हो काका... तीच्यायला...भितोय काय आपन...."
अस्मितान मात्र माझ्या कडे पाहुन भुवया उंचावल्या..  मी ही छाती फुगवून धाडशीपनाचा दिखावा करत स्माईल दिली, तीनं घडी घातलेल्या हाताचा अंगठा मला दिसेल असा उंचावत शुभेच्छा दिल्या.. तसा मनात म्हणालो बास्स्स... जिंकल मी... आता तो 'उतारा' त्या जागेवर काय...... म्हणाल तर त्या भुताला दोन घास चारुन पन येतो....
मागच्या आठवड्यात गणपती विसर्जन झाल तसा रमेश आणी काकांनी मला बोलवून घेतल...  'उतारा' टाकायचा दिवस आणी वेळ ठरली...
आणी आता हा उतारा घेऊन निघालोय....

खरतर हे सगळ जरा जास्तच विचित्र वाटतय... पन नाईलाज, जबाबदारी घेतलीय म्हणजे काम तर करावच लागणार आहे.. दुरवरून गावठी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज मात्र मघापासुन येतोय.. आणी तो पिंपळही दिसु लागलाय... हिरव्यागार पानांनी अगदी गच्च भरलेल ते भल मोठ पिंपळाच झाड... जराशी वा-याची झुळूक येताच पानांची सळसळ उरात धडकीच भरवतेय... काही अंतरावरच 'पंचगंगा' नदी वहातेय.. नदीच पात्र ही पुर्ण भरलय, ही काळोखी रात्र... त्यात हा निर्जन परिसर. या शांत वातावरणात नदीच्या खळखळणारा आवाज आणी नदीकाठच्या गर्द झाडाझुडपांमधुन रातकिड्यांची किर्रर्रर्रर्रर्रर्र किर्रर्रर्रर्रर्रर्र काळजाचा थरकाप उडतेय... खाली चिखलही खुप आहे..त्यातुन चालताना थोडी कसरत होतेय म्हणजे पाय घसरू नये यासाठी... बेडकांचे अधुनमधून ओरडणे सुरूच आहे... म्हणजे टाॅर्च च्या पांढ-या प्रकाशात दिसतात ही बेडकं... अगदी लहान... गोंडस... हाताच्या पंजातही मावणार नाहीत अशी....  पौर्णीमा होऊन गेली असेल पन ढगाळलेल्या आकाशात चंद्र कुठेतरी लपुन बसलाय..  चालताना वाटेत येणारी ही छोटी छोटी झुडपे अडथळा बनताहेत, त्यातुनच वाट काढावी लागतेय.. शर्टमधे अडकणा-या काटेरी फांद्या जणु पुढ जाऊ नये म्हणून मला मागे खेचताहेत...  हात मात्र आता दुखू लागलेत.... किती मोठ आणी भव्य हे पिंपळाच झाड आहे... खुप दिवसांनी इकड आलोय... तुम्ही कधी 'घुबड' पाहीलय का.....? पिंपळाच्या झाडावर बसलय... म्हणजे टॉर्च च्या प्रकाशात त्याची भेदक नजर माझ्या वरच होती हे लक्षात आल.... पन न बोलता आजुबाजूला न पहाता हे साहीत्य त्या ठिकानी ठेवायच आहे...  खरतर अजुनही वाटतय की कोणीतरी आजुबाजूला आहे.. या लख्ख भयान काळोखात आजुबाजूच्या झुडपांमधे होणारी सळसळ होताना वाटतय की एखाद श्वापद लपुन बसलय किंवा कोणीतरी दुरून पाहातय...
जाऊदेत...

ही टोपली समोर पकडुन धरलीये आणी खाली ठेवण्यासाठी जागा पहातोय... खाली चिखलान बरबटलेल्या जमिनीवर पालापाचोळा, झाडाच्या तुटलेल्या फांद्या आणी जनावरांची विष्ठा इतरस्त्र पसरली आहे... तसे इथ बरेच 'उतारे' ठेवलेले दिसत आहेत... टॉर्चच्या प्रकाशात आजुबाजूला खुपशा रिकाम्या टोपल्या इतरत्र पडलेल्या दिसत आहेत. सोबतच मधोमध चिरून कुंकू लावलेले हे पिवळेजरद्द लिंबू... सुटलेल्या पुड्यांमधुन पसरलेले काळे दाणे , रिकाम्या बाटल्या.. आणखी बरच काही दिसतय..

असो... 
ही टोपली त्याsss जागेवरच ठेवतो... 
हाssss  इथच असुदे ...
डोळे झाकुन नमस्कार करतो बाबा.... जो कोणी आहे त्याला...
हम्म... झाल एकदाच... चलाsss... आता थेट घरी....
पन मागे वळून पहायच नाही...
एक मिनीट..................... मागे पिंपळाच्या झाडावर कसलीशी हलचाल जाणवतेय... हो जिथ उतारा ठेवलाय तीथच...... मागे...... जस एखाद मांजर नखांचा आधार घेत खर्रर्रर्रर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्रर्रर्रर्र करत झाडावरुन खाली उतरतय...
जाऊदे.... मागे पहायच नाही... चालत रहायच...चालत रहायच...चालत रहायच...
अरे बाप रे... हे काय....... मटनाची पिशवी आणी हे ठेवायच लक्षात नाही...
आता...?
आता काय करु.......??
मागे पाहु...? की दुरूनच फेकून देऊ..? न....नाही.... मागे जावच लागणार...!
पन आता वर पहायच नाही , खाली जमीनीकडे पहातच मागे वळायच आणी हे ठेऊन इथुन धावतच थेट घर......... होssss... असच करतो....
खाली पहातच मागे फिरतोय , पन काळज धाड धाड करतय.... खुप भिती वाटतेय यार...
अरेच्या... ही टोपली मी आत्ताच ठेवलेली....  बाप रे... कुणीतरी रागात भिरकावुन द्यावा तसा त्या टोपलीतला भात विस्कटुन टाकलाय... सर्वत्र ... एक मिनीटही झाला नाही ठेऊन मग कोणी केल हे...?
बाप रे.... आजुबाजूच्या काळोखात नजर फिरताना अंगावर काटा येतोय.... कोणीतरी इथच आहे...तीच अनामीक शक्ति जी प्रांजल आणी तीच्या वडिलांवर हावी झालेली... मी मागे पाहीलेल त्या 'शक्ती' ला  आवडलेल नाही... म्हणजे कोणीतरी आहे...आसपास..... 
आई ग... स्स्स्स्स्स्स्स   काटा येतोय अंगावर ..... 
भी ....... भीती वाटतेय..... खरच......
लवकर हे मटन ठेऊन इथुन बाहेर पडतो... तो दगड कुठे गेला.... हा ... दिसला... हाच तो काळा दगड.... त्यावरच हे मटन आणी बाटली ही ठेवतो...
चला.... झाल एकदाच... झटकन निघुया...
हे काटेरी झाड.... मघाशी येताना अडकले आता जातानाही....  फाटलाच शेवटी शर्ट....
एक सेकेंड... कोणीतरी उभ आहे... मागे.... आणी आता मला त्याच्या श्वासातली घरघरही जाणवतेय... अंगावर काटा आलाय... मी स्वता:ला सावरत चालण्याच वेग वाढवतोय पन परतीच्या या वाटेवर आता मी एकटा नाही हे नक्की...

बाप रे.....आता धावत सुटायला हव.... नाहीतर...
एक.... दोन...... तीन.....
धावतोय पन चिखलाने बरबटलेल्या वाटेवर पाय घसरत आहेत .. 
आई ग... वाईट पडलोय... हात , पाय अंग सगळ चिखलान माखलय... पन न रहाऊन नजर मागे गेलीच....
बाप रे... मागे त्या वाटेवर अगदी मधोमध कोणीतरी उभ आहे ..  एका सावलीसरखी ती काळीकुट्ट पुरषी आकृती .. धिप्पाड. या भयान काळोखात माझ्यावर रोखलेले त्याचे लालसर डोळे मात्र चमकत आहेत... ते कोणतीच हलचाल न करत नाही तरी अस वाटतय की ते माझ्याकडे सरकतय.....
बाप रे....... पळाsssss इथुन.. नाहीतर मेलो...
हsssssss हsssss  हssssssss पळताना
धाप लागतेय... पन थांबायच नाही.... धावत खुप दुर आलोय...
आता ते मागे दिसत तर नाही.. 
हssssss   हssssss 
म्हणजे ते त्याच्या जागेवर गेल.. बर झाsssssल... मुख्य रस्ता आलाय...
पन अंग खुsssप जड वाटतय... हsssss 
म्हणजेsssss पाठीवर मोठ ओझ घेऊन धावतोय अस वाटतय...
आल..... हssssss  
घsssssर जवळ आलssss
वाचलो.... देवा..... उपकार तुझे.. हsssss
बर झाल..... हsssss जोशीssss काका.....रमेश बाहेरच आहेत....
काकाss
काकाssssss
काकाsssssssss
"अरे.... संजु....हळु पडशील..... ठेवलास का निट...?"
" हो काका...ठेवल..."
"तुझ अंग भाजतय रे... आणी डोळे...?. हम्म....शेवटी मागे पाहीसच ना... घात करुन घेतलास स्वता:चा..... ! रमेश....! आता याचा उतारा कोण टाकणार.....?"
समाप्त...

13. मदत (Help)

help horror story

आज आफिस मधे खुपच काम होत त्यामुळे सुरजला घरी जायला आज नेहमीपेक्षा जास्तच उशीर झाला...

सुरज म्हणजे एक देखणा, रूबाबदार तरूण ... ऊंची साधारण सहा फुटाच्या आसपास ... क्लिन शेव्ह, काळेभोर सिल्की केस. स्वच्छ पाणीदार डोळे ..

 आवरा आवर करुन तो बाहेर पडु लागला तोच टेबलवर ठेवलेल्या मोबाइलची रिंग झाली... सुरजने गडबडीत फोन रिसीव केला...

" हैलो.... Sorry sweetheart....खुप काम होत आज... त्यामुळे थोडा उशीर झाला... मी निघतोयच... अर्ध्या तासातच पोहोचतोय..."

त्याच बोलण ऐकताच समोरून बोलणारी तरुणी म्हणाली... 

" तुझ तर नेहमीचच आहे.... आणखी किती वेळ मित्र मैत्रिणीना थांबवुन वाट पहायला लावु...."

" sorry जान...फक्त अर्धा तास..."

टेबल वर ठेवलेल्या गिफ्ट कडे पहात सुरज पुढे म्हणाला... " birthday girl साठी काहीतरी surprise आहे.... "

" तु आणी तुझ surprise plz दोघेही लवकर या....कारण घरी जायला उशीर झाला तर माझे बाबा मला त्याहून मोठ surprise देतील Okay ... plz  "

" हो ग...आलोच ... आणि पुन्हा एकदा...happy birthday sweeti.... and love u so much....bye"

मोबाइल बंद करून खिशात ठेवला आणि bag घेऊन बाहेर येत office lock करून मागे फिरला तसा समोर उभे वाचमन 'शामराव' यानी सुरजला हल्की स्माईल दिली... त्याने ही थोडा प्रतीसाद दिला आणि बाहेर आला, तर बाहेर त्याला पावसाच आक्राळ विक्राळ रूप दिसल .. लख्ख काळोख, जोराचा पाऊस, त्यात घोंघावणारा सोसाट्याचा वारा आणि विजांचा भीषण तांडव... एकुणच निसर्गाच हे रौद्र रुप आज एखाद्या भयंकर घटनेची पुर्वसुचनाच देत होत... 

 वाचमन ने छत्री उघडली तसे दोघेही चालत कारच्या दिशेने निघाले...  सुरजला त्याच्या कार पर्यन्त पोहोचवल तसा सुरजने गाडी स्टार्ट केली तोच काहीतरी त्याच्या लक्षात आल... 

" अरे यार..." अस स्वताशीच बोलत तो पुन्हा कार मधून उतरला आणि office च्या दिशेने निघाला... 

"काय झाल साहेब म्हणत वाचमन विचारल पन काही उत्तर न देत सुरज office च्या दिशेने गेला... वाचमन तिथच उभा रहात सुरज कडे पहात होता... सुरज ने दरवाजाच lock उघडल तोच सगळीकडच्या लाईट्स गेल्या ...

" ओह... गॉड...." म्हणत त्याने खिशातील मोबाइल काढला आणि टार्च सुरू केली आणि टेबलवर विसरलेले गिफ्ट शोधु लागला...

" अरेच्या ....... आता तर टेबलवरच होत, इतक्यात कुठे गेल... " म्हणत त्याचा शोध सुरू झाला... मोबाइलमधील टॉर्च च्या प्रकाशात सगळीकडे पाहल पन कुठेच सापडत नव्हते... तसा त्यान आपल्या गुडघ्यावर बसुन खाली वाकुन टेबलखाली पाहिल तर त्यान घेतलेल छोटस गिफ्ट हि-याची अंगठी टेबलखाली होती... त्यान आपल्या डाव्या हाती टॉर्च घेतली आणि उजवा हात अंगठी काढण्यासाठी टेबलखाली सरकवला... टेबलखालची जागा खुप अरूंद असल्याने सुरजच्या हाताला अंगठी लवकर लागत नव्हती.... तसेच बोटानी चाचपडत तो आपला हात पुढे सरकवु लागला...तस त्याच्या हाताला काहीतरी चिकट लागले... त्या थोड विचित्र वाटल .... आपला हात बाहेर काढून टॉर्चच्या प्रकाशात पाहिल तसा त्याच्या काळजाचा थरकाप उडाला... भितीने त्याचे डोळे पांढरे झाले... त्याच्या हाताला वाढदिवसाच्या केकचा काही भाग चिकटला होता,त्यावर कुणाचेतरी रक्तही लागले होते... थरथर कापत तो तसाच रांगत मागे सरकला आणि स्वता:ला सावरत टॉर्च च्या प्रकाशात टेबलखाली पाहु लागला... पन खुप अंधार असल्याने स्पष्ट काहीच दिसत नव्हत... थोड धाडस करुन पुढे जात टॉर्च टेबल खाली नेली तर ऐक रक्तान माखलेला birthday केक विस्कटून पडलेला... थरथरत तो तसाच मागे सरकला तसे त्या अंधारात त्याच्या हाताला एक कापड लागले... हाताला लागलेला केक त्या कापडाला पुसून हात स्वच्छ केले पन  त्याला आश्चर्य वाटल की हे कापड मघाशी जाताना तर आपल्या office मधे नव्हते... दुस-या हातातील टॉर्चचा प्रकाश त्याने त्या कापडावर पाडला तसा तो भीतीने आणखीणच शहारला... तो एका लहान मुलीचा फ्रॉक होता तो ही रक्ताने माखलेला...

" नाही...." इतकेच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्यान तो फ्रॉक झटकन फेकुन दिला आणि त्याबरोबरच दुस-या हातातला मोबाइल पन खाली जमीनीवर उलट पडला आणि त्यातील टॉर्चचा प्रकाश थेट सुरजच्या चेह-यावर पडला.. सुरज त्या फ्रॉक कडे थरथरत्या नजरेने एकटक पाहू लागला.... काही वेळ तो तसाच बसुन त्या फ्रॉकला पहात होता....  एक निरव शांतता त्या जागेवर पसरली होती...  तोच त्या अंधारात त्याला कर्रर्रर्र कर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्र असा आवाज ऐकू येउ लागला... आणि आवाजा बरोबरच सुरजच्या काळजाचे ठोकेही वाढु लागले... त्याला आता दरदरून घाम फुटायला लागला... त्याच लक्ष्य आवाजाच्या दिशेन गेल तस त्याच्या काळजात चर्रर्रर्रर्रर्र कन झाल... डोळे विस्फारून तो समोर पहात होता... त्याच्या समोर त्याचच खुर्चीवर कोणीतरी पाठमोर बसल होत... आणि एका लयीत खुर्चिवर बसुन हालत होत... सुरजच्या काळीजाचा थरकाप उडाला, जोरजोरात छातीत धडधडत होत जणु  काळिज छाती फाडून बाहेरच यायचा प्रयत्न करत की काय... आपली नजर त्या खुर्चिवरील आकृतिवरून न हलवता खाली पडलेला मोबाइल डाव्या हाताने चाचपायला लागला.... तसा तो मोबाइल आणखी दुर गेला... 

" क........क........ कोण आहेस तु....?"

थरथरत्या आवाजात सुरजने एक प्रश्न केला तस त्या आकृतिन हालन बंद केल आणि तशीच शांत बसुन राहिली... पुन्हा त्याच्या केबिन मधे निरव शांतता पसरली...  सुरजचा प्रण कंठाशी आलेला तरीही एकटक काळोखात दिसणा-या त्या मानवी आकृतिकडे पहात होता...

" मला नाही ओळखलस... " भेसुर, भरड्या आवाजात बोलत खुर्चीवर बसलेली ती आकृति आता हळु हळू ऊभी राहु लागली तसा पुन्हा खुर्ची कर्रर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्रर्र असा आवाज करत पुर्ववत झाली.... 

हा आवाज त्याला थोडा ओळखीचा वाटला...   टेबलच्या पलीकडे उभी ती आकृति आता सुरज कडे वळू लागली पन तीचा चेहरा निट दिसत नव्हता.... खाली पडलेला मोबाइल उचलालचा प्रयत्न करु लागला पन तो मोबाइल त्याच्या बोटानी सरकत आणखी पुढे जाऊ लागला तसा एका क्षणासाठी सुरज ने आपली नजर त्या आकृतिवरून काढली आणि मोबाइल कडे पहात झटकन वर उचलून समोर पाहील तर कोणीच नव्हत... सुरज दचकून जागेवरच बसुन राहीला...

'अरेच्चया .....आत्ता तर इथच होता.....' मनात म्हणत त्यान आपला मोबाइल चा टॉर्च आजुबाजुला फिरवायला सुरवात केली ...पन कोणीच नव्हत... आणि आश्चर्य म्हणजे त्या छोट्या मुलीचा फ्रॉक आणि तो रक्ताने बरबटलेला birthday केकही कुठच दिसत नव्हता....  स्वता:ला सावरत तो तसाच उठून उभा राहीला... आणि त्या लक्ष टेबलवर गेल तस त्याला पुन्हा आश्चर्य वाटल.... कारण काही वेळापुर्वी टेबलखाली पडलेली अंगठी टेबलवरच आणि तशीच होती... तसाच पुढ जात थरथरत्या हाताने तो अंगठी उचलणार इतक्यात कोणीतरी वरून जोरात त्याच्या टेबल च्या काचेवर पडल... आणि टेबलवरील काचेचे छोटे छोटे तुकडे सर्वत्र पसरले... टेबलवर पडलेला तो माणुस जखमानी भरला होता... त्याच्या जखमांमधुन वहाणार रक्त खाली टेबलवर पसरू लागल... असह्य वेदनेन कण्हत त्यान आपला हात पुढे केला आणि सुरजची दातखिळीच बसली... त्या व्यक्तिच्या हातात तोच एका छोट्या मुलीचा रक्ताने बरबटलेला फ्रॉक होता... तो फ्रॉक सुरजसमोर धरूत त्या व्यक्तीच्या तोंडातुन उद्गार आले...

"मला वाचव..."

त्या भीषण प्रसंगान सुरज जिवाच्या आकांताने ओरडला तोच लाईट्स आल्या...

 'शामरावांची' वाचमनची ड्यूटी संपली होती आणि पुढच्या ड्यूटीसाठी 'पांडबा' आलेले साधारण पन्नास पंचावन्न वयाचे सावळे, धिप्पाड जेमतेम शामरावांसारखेच...दोघेही बाहेर उभारून आपापसात बोलत होते.. घरी जाण्यासाठी शामरावांनी सायकल काढलेली...तोच सुरजच्या आवाजाने घाबरून  दोघेही धावतच सुरजच्या केबीन मधे आले,  सुरज थरथर कापत त्या टेबलकडे पहात होता...त्याच अंग घामान भिजल होत आणि डोळ्यात एक अनामीक भिती दाटली होती... 

" स....... साहेब ... काय झाल......"

सुरजची मानसिक स्थिति पाहुन शामरावानी विचारल... पन सुरज काहीच न बोलता त्या टेबलकडे पहात अजूनही थरथर कापत होता...

शामरावांनी त्याच्या खांद्याला पकडुन थोड हलवुन पुन्हा विचारल तसा सुरज शुद्धीवर आला आणि आजुबाजूला पाहू लागल तर सर्व काही ठीक, व्यवस्थित होत... तो टेबल, त्यावरील काचही चांगली होती आणि ती अंगठी अजुनही टेबलवर तशीच होती..

मघापासुन भीषण बनलेल वातावरण आता सामान्य होऊ लागल.... 

वाचमन कडे पहात सुरज म्हणाला..

" क......काही नाही......"

पण त्याच्या आवाजातली, आणी चेह-यावरची भिती लपण्यासारखी नव्हती... 

दोघे वाचमन एकमेकाकडे पहात खांदे उडवीत तीथुन बाहेर पडले....  सुरज अजुनही घाबरलेल्या स्थितितच होता गडबडीने अंगठी उचलली आणि office बंद करुन लगेच तीथुन बाहेर पडला... बाहेर अजुनही जोराचा पाऊस आणि वारा होताच... सुरजला येताना पाहाताच शामराव छत्री उघडून त्याच्याबरोबर चालत गाडीपर्यन्त गेला.... सुरजने काहीच न बोलता गाडी सुरू केली आणि सुसाट वेगात तीथु बाहेर पडला....

सुरजची गाडी वेगात जात होती..तुला पहातच शामराव मागे फिरले... तसे पांडबा थोड आश्चर्यान म्हणाले.... 

"साहेबाना अचानक काय झाल..."

हातातील छत्री बंद करुन बाजुच्या कोप-यात ठेवत शामराव म्हणाले... 

"अचानक कुठ.....अरे जेव्हापासुन त्यांच्या मित्राने म्हणजे 'अमित' साहेबानी जिन्यावरून ऊडी मारून आत्महत्या केली त्या नंतर साहेबाना असेच भयंकर भास होत आहेत...."

शामरावांच बोलण संपते न संपते तोच पांडबा म्हणाले..." पन सगळे म्हणत आहेत की दारूच्या नशेत सुरज साहेबानीच त्याना वरून ढकलून दिल असणार..."

सायकलच लावलेल स्टैंड काढत शामराव म्हणाले... " आत्महत्या की खुन की आणखी काही.... पैसेवाल्या लोकांना काही फरक पडत नाही रे...चार पैसे तोंडात कोंबले की झाल...." बोलत बोलत एका हातात छत्री आणि दुस-या हातात सायकलचे हैंडल सावरत घरी निघाले...

*****

 सुरज आपल्या नेहमीच्याच वेगात होता.. पावसाचे मोठ मोठे थेंब तड तड करत काचेवर आपटायचे, ते काचेवरचे पाणी व्हायपर बाजुला करून काच स्वच्छ करायच आणि पुन्हा पाण्याचे थेंब जणु काही त्यांचा खेळच सुरू होता...

 सुरजची कार आता हायवे वर धाऊ लागली तसा पावसाचा जोर आणखीनच वाढला... त्यातच विजेचा लख्ख प्रकाशाने डोळे दिपुन जायचे ..आज वाहनही फारशी दिसत नव्हती...  काही अंतर पुढे येताच त्याला मागुन एक ट्रक येताना दिसला, ट्रकचा वेग फारसा नव्हता... सुरज ने बाजुच्या आरशात पाहील आणि त्याला पुढे जाऊ देण्यासाठी कार बाजुला घेतली तसा त्या ट्रक चालकाने ट्रक सुरज च्या कार सोबत आणला... पन तो ओव्हरटेक करून पुढे जात नव्हता... सुरज ने सहज त्याच्या कडे पाहील तर तो ट्रक ड्राइवर एकटक त्याच्याकडेच पहात होता...  सुरजने त्याच्याकडे लक्ष न देत आपलीच गाडी वेगात पुढे नेली... गाडीतील म्यूजिक प्लेयर सुरू करुन शांत पने गाणी ऐकत सुरजच गाडी चालवण सुरू होत.. इतक्यात पुन्हा तो ट्रक वेगात त्याच्या बाजुला आला... पन या वेळी तो ड्राइवर सुरजला मागे पहाण्यासाठी खुणावत होता...पन सुरजने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कारचा वेग आणखी वाढवून त्याच्या खुप पुढे निघून गेला... बाजुच्या काचेत पाहील आता तो ट्रक त्याच्या कारच्या खुप मागे राहीला आणि दिसेनासा झाला.... गाडीचा वेग तसाच होता... मोबाइलची रिंग वाजली तसा त्याने बाजुच्या सिटवरचा मोबाइल उचलला तोच तो ट्रक वेगात त्याच्या बाजुला आला आणि पुन्हा त्या ड्राइवर ने सुरज ला मागे पहाण्यास खुणावले...

आता मात्र सुरजला त्याचा भयंकर राग आला होता... त्यान मागे पाहील पन मागे कोणीच नव्हत... आणि इतक्यात त्याच लक्ष समोर गेल ...  त्यान  गाडीचा वेग कंट्रोल करायला ब्रेक दाबले तशी पावसाच्या पाण्यामुळे गाडी स्लीप होत पुर्ण तिरकी होऊन बाजुच्या झाडाला जाऊन धडकली... तीथच एक जिवघेण वळण होत... तो तसाच वेगात आला असता तर मोठा अपघात झाला असता... स्वता:ला सावरत त्यान आजुबाजूला पाहील पन तो ट्रक कुठच दिसत नव्हता... या प्रसंगान त्याच ह्रदय अजुन जोरजोरात धडधडत होत...दोन्ही हात स्टेअरिंग ठेऊन थोडा वेळ तो तसाच बसुन राहीला... हा भास होता की सत्य या विचारातच तो गुरफटल होता... काळजाचे ठोके normal झाले तशी गाडी घेऊन त्याने पुन्हा आपला रस्ता धरला...गाडी चालवत तो त्या ट्रक ड्रायवरचा विचार करत होता... जोराचा पाऊस, भयान काळोख आणि आता घडलेली थरारक घटना यामुळे तो आणखीणच दचकुन गाडी गाडी चालवत होता.... बाजुच्या आरशात पाहिल तर मागे एखादही वाहन दिसत नव्हत... हायवेवर असुनही आज भयान शांतता वाटत होती... बाजुला ठेवलेले सिगरेट च्या पाकिटातून एक सिगार काढली तोच त्याची नजर वर असलेल्या आरशात गेली आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला... मागच्या सिटवर एक व्यक्ती बसली होती... अंधार असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता... पन ती व्यक्ति एकटक सुरजकडे पहात होती... गर्रकन मान फिरवून मागे पाहील तर कोणीच नव्हत आणि काही समजायच्या आतच भरधाव वेगात असलेली त्याची कार एका रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली...

धडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरची काच फुटून झाडाच्या फांद्या आत आल्या..  सुरज ला खुप मार लागला, जख्मी अवस्थेतच तो तसाच उतरून गाडीतून बाहेर आला आणि तीथेच बेशुद्ध पडला...

काही वेळात तो शुद्धीवर आला तशी त्याला आपल्या आजुबाजुला खुप गर्दी दिसली...  लोक आपापसात कुजबूजत होती... त्यान उठायचा प्रयत्न गेला पन त्याच्या शरीराला भयंकर वेदना होत होत्या.. कोणीतरी आपल्याला hospital मधे घेऊन जाव अस वाटत होत पन त्याला बोलताही येत नव्हत.. त्या डोळसमोर अंधारी येऊ लागली.. आपन आता ईथेच मरणार या भावनेन तो हतबल होऊन तसाच पडून राहीला ....  इतक्यात त्याला दुर वरून एका ambulance च्या सायरनचा आवाज येऊ लागला... तस त्याला थोड बर वाटल...जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.. ambulance त्याच्या जवळ येऊन थांबली... आपल्या आजुबाजूला होत असलेली हलचाल तो पाहु शकत होता... पन बोलण्याची शक्ति नव्हती... काही लोकानी त्याला उचलून ambulance मधे ठेवले तोच काही दिवसापुर्वी घडलेली एक घटना सुरजच्या डोळ्यासमोर जशी च्या तशी उभी राहीली...

सुरज आणि अमित खुप चांगले मित्र, अगदी जिवाभावचे...काही दिवसापुर्वी दोघे पार्टी वरून घरी येत होते दोघानीही थोडी घेतली होती... मस्त enjoy चाललेला, पन बोलता बोलता दोघामधे किरकोळ वाद झाला आणि हा वाद वाढू लागला, दोघेही प्यायलेले त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायला तयार होईना... बोलता बोलता अचानक सुरजने गाडी रस्त्याकडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर येत दोघे झटापटीवर ऊतरले... सुरजने अमितला जोरात मागे ढकलले,

तसा अमित मागे रस्त्यावर पडला आणि मागुन भरधाव वेगात येणा-या ट्रक ड्राइवरने अमितला वाचवायला गाडी एकदम बाजुला वळवली पन ताबा सुटल्याने तो ट्रक तसाच वेगात एका झाडावर आदळला... जोराचा आवाज झाला. समोर घडलेल्या या भीषण अपघाताने दोघेही हादरून गेले...काय करावे दोघानाही सुचेनासे झाले... सगळ्या वातावरणात जिवघेणी शांतता पसरली होती... तोच कोणीतरी असह्य वेदनेने कण्हत असल्याचा आवाज आला... दोघेही एकमेकाला आधार देत त्या ट्रकच्या दिशेने चालू लागले... तसा कण्हत असलेल्या त्या व्यक्तिचा आवाज वाढू लागला... हळु हळू पुढ येत सुरज ने ट्रकचा दरवाजा उघडला, आत काचांचा खच पडला होता... स्टेअरिंग वर डोक आपटल्याने त्याचे डोके फुटून रक्तस्त्राव होत होता... धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भागा आत आल्याने ड्राइवर दोन्हीच्या मधे अडकला होता, या दोघाना पहाताच मदतीसाठी त्याने आपला रक्ताने माखलेला हात पुढे केला... त्याची अवस्था बघुन सुरज आणि अमित दोघाच्याही अंगावर काटा आला... भितीने पुढ जाण्याची हिम्मत होत नव्हती... दोघेही मागे फिरु लागले तसा तो रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत त्या ड्राइवर ने पाणावलेल्या डोळ्यानी त्या दोघासमोर मदतीसाठी हात जोडले... त्याने एका हाताने बाजुला पडलेला ड्रेस उचलला... तो एका छोट्या मुलीचा होता ... आणि तीथेच चौकोनी कागदी box फाडून बाहेर आलेल्या केकवर थोड रक्त लागल होत...  कदाचित त्या ड्राइवरच्या छोट्या मुलीचा वाढदिवस असावा ....  कोणीतरी घरी त्याची वाट पहात होत... माझे बाबा आता माझ्यासाठी केक आणि नवीन कपडे आणतील म्हणून वाटेला डोळे लाऊन बसलेली आपली पाच वर्षाची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहीली...

 त्याच्याकडे पहात अमित आणि सुरज मागे फिरू लागले तसा तो ड्राइवर रडुन मदतीची भिक मागु लागला पन मागे न पहाता ते तसेच आपल्या गाडीत बसले.. मदतीसाठी त्या ड्राइवरची येणारी किंकाळी,रडण, ओरडण याकडे दुर्लक्ष करून दोघानी गाडी काढली आणि तसेच वेगात निघाले... सुरजने बाजुच्या आरशात पाहिल तर तो ट्रक मागे पडू लागला... काही वेळापुर्वी गाडीत दंगा मस्ती करणारे दोघेही भीतीने शांत बसले होते... दोघानाही माहिती होत की त्या ड्राइवरच्या या अवस्थेला आपण कारणीभुत आहोत... त्यान ट्रक वळवला नसता तर अमितच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असत्या.. काही वेळातच दोघे अमितच्या फार्म हाऊस वर परतले... पन दोघे एकमेकाशी बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते.. सुरज सोफ्यावर डोक धरुन बसलेला तर अमित पाण्याच्या बाटलीचे टोपन उघडून गटागट पाणी पिऊ लागला आणी थोडे आपल्या डोक्यावर ओतून बाजुच्या खुर्चिवर बसला...

तासभर दोघे तसेच बसुन होते... रोजच दंगा, मस्ती, दारू पिण याची सवय असलेल्या अमितच्या या फार्म हाऊस वर आज एक निरव शांतता पसरली होती... इतक्यात बाहेरून एखादी गाडी जोरात धडकावी आणि काचा फुटून चिंधड्या व्हाव्या असा आवाज आला... दोघाच्या पायाखालची जमीनही हादरली इतका भीषण आवाज होता...  भीतीने दोघाचेही काळीज जोरजोरात धडधडत होते जणु छाती फाडुन बाहेरच यावे असे.... एकमेकाकडे पहात दोघेही बाहेर धावले... आजुबाजूला पाहील पन काहीच नव्हत... दोघे तसेच रस्त्यावर आले पन दुरदूर पर्यन्त कुठलही वाहन दिसत नव्हत... दोघानाही थोड आश्चर्य वाटल कारण आवाज दोघानीही स्पष्ट ऐकला होता... दोघे तसेच आत आले, सुरज सोफ्यावर बसणार तोच पुन्हा तोच भीषण आवाज आला... आणि सोबत एका पुरूषाची आर्त किंकाळी ऐकु आली... भीतीने दोघेही गर्भगळीत होऊन एकमेेकाकडे पाहु लागले...  अमितमधे आता पाय उचलण्याचही धाडस नव्हत... सुरजने मात्र थोड धाडस कारत बाहेर गेला... अमित तसाच थरथर कापत भिंतीला चिकटून उभा होता... अचानक त्याला बारिक आवाजात कोणाचीतरी कुजबूज ऐकू आली... तो लक्ष देऊन ऐकु लागला, तस कोणीतरी भिंतीच्या पलीकडे आपापसात बोलत असल्याच जाणवल... त्यान शांतपणे आपले कान भिंती जवळ नेले तोच कोणीतरी त्याचे केस पकडून त्याच डोक भयंकर ताकतीन त्या भिंतीवर आपटल तसा अमित खाली पडला... अमितच्या डोक्यात  भेग पडली आणि त्यातून एकसारख रक्त वाहु लागल... त्याच्या डोक्यातून वहाणार रक्त जमीनीवर पसरू लागल... तो मदतीसाठी सुरजला बोलवणार तोच पुन्हा कुणीतरी त्याचे केस पकडून डोक जमिनीवर आपटल... या वेळी दोन्ही दातायधे अडकल्याने त्याची जिभच तुटली... आता त्याच्या तोंडातून आवाजही येत नव्हता.. अमितने तशीच आपली मान फिरवून पाहिल तर त्याला मारणारा सुरजच होता.... त्याचा जिवाभावाचा मित्रच आज त्याचा जिव घेत होता... त्याच्याकडे पहातच अमित ने जिव सोडला... तसा सुरज शुद्धीवर आला सुरज शुद्धीवर आला तस त्याने अमितकडे पाहिल, त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल पाहुन सुरज हादरुन गेला... थरथरतच त्यान अमितला विचारल...

" अ......अ.....अमित ...... कोणी मारल तुला एवढ....थांब घाबरु नकोस... तुला hospital मधे नेतो..." तस त्यान अमितला ऊचलल अमितच जखमेन सुन्न झाला होता त्याला काहीच बोलता येत नव्हत.. त्याच्या डोक्यातून तोंडातून रक्त येत होत.... सुरज त्याला घेऊन जिन्याच्या पाय-या चढू लागला तसा अमित आणखी घाबरला... पन त्याच शरीर साथ देत नव्हत... सुरज तसाच त्याला वर घेऊन गेला आणि वरून खाली फेकुन दिल.... अमित जागेवरच संपला.... सुरज शुद्धीवर आला आणी अमितची अवस्था बघुन पुन्हा बेशुद्ध झाला...

काही दिवसापुर्वी घडलेल हे थरारनाट्या सुरजच्या डोळ्यासमोर उभ राहिल... काही लोकानी जखमी सुरजला ambulance मधे ठेवले... आपला जिव वाचला या आशेन त्याला थोडा धीर आला... सायरन चा आवाज करत ambulance रस्त्याने धावत होती...

स्ट्रेचरवर जखमानी कण्हत पडलेल्या सुरज ने विचारले... " hospital अजून किती दुर आहे ......"

त्याच्या प्रश्नाला कोणीतरी भरड्या आवाजात उत्तर दिल...

" hospital चाहे पास हो या दुर वहां पहुंचनेतक तु जींदा नही बचेगा........क्यों की.."

एवढ बोलुन ambulance च्या ड्राइवरने मागे सुरज कडे पाहिल आणि भयान हास्य करत पुढे म्हणाला....

" मैं भी नही पहुंचा था ....." 

त्याच्याकडे पहाताच सुरज चे डोळे पांढरे झाले.... भीतीने तो जोरजोरात ओरडू लागला..

"..मला सोड ... मला माफ कर .... जाऊदे मला...."

इकडे accident झालेल्या ठिकानी लघुशंखेस गेलेले ड्राइवर आणि एक कर्मचारी चालत आले... तर ambulance कुठेच नव्हती... त्या गर्दितलच एकजन म्हणाला तुम्ही इथ मग ambulance कोण चालवतय....

            Ambulance मधे सुरजला आपल्या पायाशेजारी खाली मान घालुन बसलेल्या आणखी एक माणसाचा  आवाज आला...

" तुला कस सोडु....."

आवाज ओळखीचा होता तसे सुरजने त्याच्याकडे पाहीले....आणि प्राण कंठाशी आला... भितीने त्याची दातखिळीच बसली... तस सुरजकडे पहात शेजारी बसलेला तो माणुस म्हणाला.... 

" तु तर माझा जिवाभावाचा मित्र आहेस.."

त्यान आपली मान वर करत सुरजकडे पाहिल....तो अमित होता.....

आता ambulance सूसाट वेगाने धावत होती...तसे सुरजच्या काळजाचे ठोके'धाड धाड धाड ' करत आणखी वाढु लागले...तशीच ambulance सुसाट धावत एका वळणावरुन खाली कोसळली आणि यावेळी सुरजने शेवटचा श्वास घेतला...   

समाप्त...

तर ह्या होत्या काही भुतांची कथा मराठी मध्ये जर या भुतांच्या गोष्टी (Horror stories in marathi) वाचून तुम्हाला मजा आली असेल तर आम्हाला कंमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रां सोबत share जरूर करा.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post