तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi | तेनाली राम च्या मराठी गोष्टी

आम्हाला माहित आहे तुम्ही सगड्यांना तेनाली रामा च्या गोष्टी खूप अवाढतात. खाली तुम्हा सगड्यां साठी काही लहान तेनालीराम च्या कथा (Tenali Raman Stories in Marathi) लिहिल्या आहे. तुम्हाला ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडेल.

Tenali Raman Stories in Marathi

तेनालीराम म्हणजे असाच एक बिरबलचा भाईबंद. तसाच बुद्धिमान नि चतुर, हजरजबाबी नि तल्लख. तेनालीराम ही काही कल्पित व्यक्ती नाही; ऐतिहासिक आहे.


1. तेनालीराम चे वाक्चातुर्य

tenali raman short stories written in marathi

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की, याबाबतीत एक योजना बनवण्यात यावी. 

मंत्रीमंडळाने त्वरीत योजना बनवली. खर्चासहीत पूर्ण. तपशील महाराजांना प्रस्तुत केला. महाराजांनीही त्याला अनुमती दिली. मंडळाची मजाच झाली. त्यांनी आपल्या परिवारांतील सदस्यांनाच नाही, तर दूर दूरच्या नातेवाईकांनाही चाकरीला (नोकरीवर) ठेवले. पैसा व्यर्थ खर्च होऊ लागला. सम्राट मंत्र्यांना त्याविषयी विचारित, तेव्हा मंत्री एकच उत्तर द्यायचे ‘‘अन्नदाता, पहात रहा. ही योजना पूर्ण होताच विजयनगरच्या शत्रुला ह्या सीमा हिमालय पर्वतासारख्या भासतील.’’ होता-होता दोन मास लोटले. तिसर्‍या मासात तेनालीराम यात्रेवरुन आला. विजयनगरची सीमा ओलांडताच त्याला सुगावा लागला की, योजने अंतर्गत मंत्री, सेनापती पंडित तसेच अनेक दरबारीही आपआपला स्वार्थ साधत होते. सीमा सुरक्षेच्या नावाखाली अनेक वस्त्या जमीनदोस्त केल्या होत्या. कित्येक शेतमळे उध्वस्त केले होते. अत्याचार आणि अराजकता माजलेली होती आणि सम्राटाच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नव्हते. 

सीमा क्षेत्रातील जनतेची करुण कहाणी ऐकून तो चिंताग्रस्त झाला; परंतु हे सर्व महाराजांना सांगणार कसे ? बराच विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. तीन मासांच्या रजेनंतर ज्या दिवशी तेनालीराम दरबारात हजर झाला, तेव्हा राजा कृष्णदेव रायनी हसून स्वागत केले. मग म्हणाले, ‘‘तेनालीराम तुझ्या अनुपस्थितीत आम्ही पुष्कळ मोठे कार्य केले आहे. आम्ही विजयनगरच्या सर्व सीमा अभेद्य बनवल्या, आता तेथील रहिवाशी निर्भयतेने राहू शकतात.’’ 

‘‘खरे आहे महाराज ! ’’ तेनालीराम म्हणाला, ‘‘सीमा क्षेत्रात आपला जयजयकार होत आहे. मंत्रीजीच्या या महत्वपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत.’’ मंत्री तेनालीराम थोडा वेळ थांबून म्हणाला, ‘‘अन्नदाता, शत्रुच्या आक्रमणापासून भयमुक्त होऊन सीमांत गाववाल्यांनी नाट्यमंडळ बनवले आहे. आपण तर कलेचे पारखी आहात म्हणूनच आपल्या पहिल्या नाटकाचे उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.’’ 

सम्राट कृष्णदेवराय प्रसन्न झाले. त्यांनी लगेच स्वीकृती दिली आणि दुसर्‍याच दिवशी रंगशाळेत नाटक आयोजित केले गेले. कृष्णदेवराय सहपरिवार उपस्थित झाले. सर्व दरबारी तसेच राज्यातील प्रतिष्ठित नागरिकांनाही आमंत्रित केले गेले. नाटक वेळेवर चालू झाले; पण ते नाटक कसले होते ? तर सीमांत रहीवाशांवर होणार्‍या अत्याचारांवरची जिवंत प्रतिमा होती. मधे-मधे विदुषक रंगमंचावर येई आणि सम्राट कृष्णदेवरायांकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणे, ‘‘दया करा महाराज ! आम्हाला वाचवा ! शत्रूच्या आक्रमणापेक्षा अधिक आम्हाला आपल्या माणसांपासून सुरक्षा हवी आहे.’’ मंत्री, सेनापती, पंडीत, राजदरबारी, नागरिक सर्वच हैराण झाले. महाराजांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी तेनालीरामला बोलवून विचारले, ‘‘हे सर्व काय आहे ?’’ ‘‘मला काही माहित नाही, महाराज’’ तेनालीराम भोळेपणाचा आव आणून म्हणाला, ‘‘तुम्ही ह्या लोकांनाच विचारा ना’’! 

महाराजांनी रंगशाळेतच विचारपूस केली. तेव्हा खरी गोष्ट समोर आली. त्याच क्षणी बर्‍याचशा दरबार्‍यांना मिळणारी सवलत थांबवली गेली. मंत्री, सेनापती तसेच पंडितजीवर मोठे मोठे खटले भरले गेले आणि तेनालीरामची स्तुती करत सम्राट कृष्णदेव राय म्हणाले, ‘‘राजनीतीमध्ये तुझ्यासारखा चतुर कोणीच नाही, तेनालीराम तू मारतोही आणि आवाजही होऊ देत नाहीस.’ 

Read: Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज कथा

2. तेनालीराम आणि स्वप्न महाल

tenali raman small stories in marathi

एके रात्री रात्री राजा कृष्‍णदेवराय याला स्‍वप्‍न पडले. त्‍या स्‍वप्‍नामध्‍ये त्‍याने एक सुंदर महाल पाहिला. तो महाल खूप सुंदर होता, महाल अधांतरी तरंगत होता. महालाला सुंदर सुंदर दालने होती, दालनात रंगीबेरंगी रत्‍ने लावली होती. महालात विशेष प्रकाशयोजना केलेली नव्‍हती जेव्‍हा मनाला वाटेल तेव्‍हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्‍हा प्रकाश नको वाटे तेव्‍हा अंधार होत असे. सुखसंपन्‍नतेने सजलेला तो महाल म्‍हणजे एक आश्‍चर्य होते. पृथ्‍वीवरच्‍या कोणत्‍याही माणसाला भुरळ पाडेल अशाच प्रकारची त्‍या महालाची रचना होती. हे स्‍वप्‍नात राजाने पाहिले आणि जागा होताच त्‍याने आपल्‍या राज्‍यात दवंडी पिटवली की, जो कोणी मला अशा वर्णनाचा महाल बनवून देईल त्‍याला एक लाख सुवर्णमुद्रा बक्षीस देण्‍यात येतील.

 सर्व राज्‍यात राजाच्‍या या स्‍वप्‍नाची चर्चा होऊ लागली. जो तो हेच म्‍हणू लागला की अशा प्रकारचा महाल फक्त स्‍वप्‍नात बनू शकतो. राजाला बहुधा हे कळत नसावे अशाच आशयाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. राजाने आपल्‍या राज्‍यातील सर्व कारागिरांना बोलावले त्‍यांना सूचना दिल्‍या. अंगात विविध कौशल्‍ये असणारे कुशल कारागिर राजाला समजावू लागले,’’महाराज, अशा प्रकारचा महाल कधीच बनू शकत नाही. तुम्‍ही याचा नाद सोडून द्या’’ पण राजाच्‍या डोक्‍यात आता तो महाल बांधण्‍याचे ठरलेच होते. काही स्‍वार्थी लोकांनी मात्र याचा चांगलाच लाभ करून घेतला. त्‍यांनी महाल बांधण्‍यासाठी राजाकडून पैसे घेतले. राजाने महाल बांधून देण्‍याचे आश्‍वासन देऊन ती माणसे गायब झाली होती. मात्र मंत्री लोकांना याचे वाईट वाटत होते की राजाला माणसे फसवित आहेत. 

कोणीही मंत्री राजाला समजावून सांगायला पुढे जात नव्‍हता. यातून फक्त एकच माणूस राजाला समजावू शकत होता तो म्‍हणजे तेनालीराम आणि तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. एक दिवस राजाचा दरबार सुरु झाला आणि एक म्‍हातारा माणूस रडत, मोठ्याने ओरडत दरबारात आला. राजाने त्‍याला न रडण्‍याची विनंती केली व म्‍हणाला,’’ वृद्धबुवा काय झाले, चिंता करू नका, मी काही तुमची मदत करू का. तुम्‍हाला न्‍याय मिळेल याची तुम्‍ही ,खात्री बाळगा.’’ म्‍हातारा रडायचे थांबवून राजाला म्‍हणाला,’’महाराज, मला सर्वानी लुटले, माझ्या जीवनभराची कमाई कुणीतरी चोरी केली. महाराज, मला छोटी छोटी मुले आहेत आता तुम्‍हीच सांगा की मी त्‍यांना कसे जगवू.’’ राजाला हे ऐकून खूप राग आला व संतापाने राजा म्‍हणाला,’’ मला सांगा, कोणी तुम्‍हाला छळले, कोणी तुमची संपत्ती हडप केली. माझा कोणी कर्मचारी तुम्‍हाला जर त्रास देत असेल तर सांगा.

’’ म्‍हातारा म्‍हणाला,’’ नाही महाराज तुमचा कोणीही कर्मचारी मला त्रास देत नाहीये’’ राजा म्‍हणाला,’’ मग तुमची संपत्ती कुणी हडप केली अशी तुमची तक्रार आहे’’ म्‍हातारा म्‍हणाला,’’ महाराज, क्षमा असावी पण काल रात्री मला एक स्‍वप्न पडले, त्‍या स्‍वप्नात तुम्‍ही स्‍वत:, तुमचे मंत्री आणि दरबारातले सर्व कर्मचारी सगळे मिळून माझ्या घरी आलात आणि माझ्या घरातील तिजोरी तुम्‍ही सर्वानी मिळून उचलली आणि ती तुम्‍ही तुमच्‍या राजखजिन्यात जमा करून घेतली.

’’ राजा अजूनच संतापला व म्‍हणाला,’’ मूर्खासारखे बोलू नको, अरे सत्‍यात तर काय मी स्‍वप्‍नातसुद्धा असा अत्‍याचार करणार नाही आणि मूर्ख माणसा स्‍वप्‍ने कधी सत्‍य होतात काय याची तुला जाणीव आहे की नाही.’’ हे वाक्य संपताक्षणी त्‍या म्‍हाता-याने आपली नकली दाढी व फेटा काढून टाकला व आपल्‍या मूळ अवतारात हजर झाला. तो तेनालीराम होता. तेनालीराम म्‍हणाला,’’ महाराज अशक्‍य स्‍वप्‍ने सत्‍यात येऊ शकत नाहीत हेच मला तुम्‍हाला सांगायचे होते. माणसाने स्‍वप्‍ने सत्‍यात आणण्‍याचा प्रयत्‍न करावा हे योग्‍य आहे पण अशक्‍य असणा-या स्‍वप्‍नांच्‍या मागे कधीच पळू नये असे मला वाटते.’’ राजाला आपली चूक कळून आली. त्‍याने तेनालीरामला चांगला सल्‍ला दिल्‍याबद्दल बक्षीस दिले.

तात्‍पर्य :- योग्‍य माणसांचा सल्‍ला काही वेळेला उपयोगी ठरतो, अशाच माणसांची संगत ठेवणे चांगले ठरते. 

Readलहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral | छान छान गोष्टी

3. तेनालीराम आणि कंजूस व्यापारी

tenaliram story in marathi

Tenali Raman Stories in Marathi: राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात एक कंजूस व्यापारी रहात होता. त्याच्याजवळ पैशांची कमतरता नव्हती, पण खिशातून एक पैसा पण काढताना त्याच्या अतिशय जीवावर येत असे. एकदा त्याच्या काही मित्रांनी त्याला एका चित्रकाराकडून त्याचे स्वःताचे चित्र बनविण्यास तयार केले. तेव्हा तो तयार झाला परंतु जेव्हा तो चित्रकार त्याचे चित्र बनवून घेऊन आला तेव्हा त्या व्यापाऱ्याची इच्छा होत नव्हती, की मूल्य स्वरूपात त्या चित्रकाराला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.

तो व्यापारी पण एक कलाकारच होता. चित्रकाराला येत असलेले बघून व्यापारी घरात गेला व काही वेळातच आपला चेहरा बदलून बाहेर आला त्याने चित्रकाराला सांगितले, ‘तू काढून आणलेले चित्र जरापण चांगले नाही, तूच सांग तू काढून आणलेल्या चित्रातील चेहरा माझ्या चेहऱ्याशी जरा पण मिळतो का?’ चित्रकाराने बघितले खरोखरच व्यापाराचा चेहरा व चित्रातील चेहरा वेगळा आहे. तेव्हा व्यापारी बोलला ‘जेव्हा तू असे चित्र बनवून आणेल की जे माझ्या चेहऱ्याला मिळते जूळते आहे, तेव्हाच मी तू आणलेले चित्र विकत घेईन.’ पुढे दुसऱ्या दिवशी चित्रकार आणखी एक चित्र बनवून आणतो जो हुबेहूब व्यापाऱ्याच्या चेहऱ्याशी मिळतो, जो पहिल्या दिवशी व्यापाऱ्याने बनविला होता. हया वेळेला पुन्हा व्यापाराने आपला चेहरा बदलला व चित्रकाराच्या चित्रामध्ये चुका काढू लागला. चित्रकार खूप अपमानित झाला त्याला हे समजत नव्हते की या प्रकारच्या चुका त्याच्या चित्रात का होत आहेत?

दुसऱ्या दिवशी तो आणखी एक चित्र बनवून घेवून आला, त्याच्याबरोबर पुन्हा तेच घडले. आता त्याला व्यापाऱ्याचा दुष्टपणा समजला होता. त्याला माहिती होते की व्यापारी कंजूस आहे, तो आपल्याला पैसे देणारी नाही. परंतु, चित्रकार आपल्या इतक्या दिवसांची मेहनत पण वाया जाऊ देणार नव्हता. खूप विचार केल्यानंतर चित्रकार तेनालीरामकडे गेला आणि त्याला आपली समस्या सांगितली.

काही वेळ विचार केल्यानंतर तेनालीराम बोलला, ‘उदया तू त्या व्यापाऱ्याकडे एक आरसा घेऊन जा, आणि त्याला सांग की तुझा खरा चेहरा घेऊन आलो आहे. चांगल्या प्रकारे मिळतो का बघून घे. थोडा पण फरक जाणवणार नाही. बस, मग काय तुझे काम झाले म्हणून समज.’ दुसऱ्या दिवशी चित्रकाराने तसेच केले.

तो आरसा घेऊन व्यापाऱ्याकडे पोहोचला आणि त्याच्या समोर आरसा ठेवला. ‘हे घ्या शेठजी तुमचे योग्य चित्र बनवून आणले आहे, यात जरापण चूक होणे शक्य नाही.’ चित्रकार आपले हसू सावरत बोलला.

‘परंतु हा तर आरसा आहे.’ व्यापारी गोंधळून बोलला.

‘तुमचा खरा चेहरा आरशा व्यतिरिक्त कोणीच बनवू शकत नाही. लवकरात लवकर माझ्या चित्रांचे मूल्य मला दया.’ चित्रकार बोलला.

व्यापाऱ्याला समजले की, हे सर्व तेनालीरामच्या हुशारीचा परिणाम आहे. त्याने लगेचच एक हजार सुवर्णमुद्रा चित्रकाराला दिल्या.

Read: Sanskar Katha in Marathi | संस्कार कथा मराठीत

4. तेनालीरामचे चातुर्य

stories of tenali rama in marathi

एक दिवस राजा कृष्णदेवराय कोणत्या एका कारणामुळे तेनालीरामवर नाराज झाले होते व रागात येऊन त्यांनी भरलेल्या दरबारात तेनालीरामला सांगितले उदयापासून मला दरबारात तुझे तोंड दाखवू नको. त्यावेळी तेनालीराम दरबारातून बाहेर निघून गेला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा महाराज दरबाराजवळ येत होते तेव्हा एका चुगलीखोराने त्यांना हे सांगून भडकविले की, तेनालीराम तुमच्या आदेशाचे पालन न करता दरबारात उपस्थित आहेत. हे ऐकून महाराज भयंकर चिडले. तो चुगलखोर दरबारी पुढे बोलला - तुम्ही स्पष्ट सांगितले होते की दरबारात आल्यानंतर चाबकाचे फटके मिळतील याची पण त्यांनी पर्वा केली नाही. आता तर तेनालीराम आपल्या आदेशाचे पालन करणे शक्यच नाही.

राजा दरबारात आला. त्यांनी बघितले की डोक्यात मातीचा एक माठ घालून तेनालीराम काहीतरी विचित्र हावभाव करत आहे. त्या माठाचा चारी बाजूला प्राण्यांच्या तोंडाचे चित्र बनलेले होते.

‘तेनालीराम हा काय मुर्खपणा चालविला आहे, तू माझ्या आज्ञेचे पालन केलेले नाही. महाराज पुढे बोलले की, शिक्षा म्हणून चाबकाचे फटके खायला तयार रहा.’

‘मी कोणत्या आज्ञेचे पालन केले नाही महाराज?’ माठात तोंड लपवून तेनालीराम बोलला - ‘तुम्ही बोलला होतात की, उदया मला दरबारात तुझे तोंड दाखवू नकोस, तुम्हाला माझे तोंड दिसते आहे का?’

हे देवा! कुभांराने मला फुटलेला माठ तर नाही ना दिला. 

हे ऐकताच महाराजांना हसू आले व ते बोलले - तुझ्यासारख्या बुध्दिमान आणि हजरजबाबी बरोबर कोणी नाराज होऊच शकत नाही. आता हा मातीचा माठ डोक्यावरून काढ व आपल्या जागेवर आसनस्थ हो.

Read: अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

5. जादूची विहीर

tenali raman tales in marathi

Tenali Raman Marathi Goshta: एकदा राजा कृष्णदेवरायने गृहमंत्र्यानां राज्यात खूप विहीरी बनविण्याचा आदेश दिला. उन्हाळा जवळ येत होता त्यामुळे राजाची अशी इच्छा होती की विहीरी लवकरात लवकर खोदल्या जाव्यात त्यामुळे राज्यातील लोकांना उन्हाळयात आराम मिळू शकतो.

गृहमंत्रींनी हया कामासाठी राज्याच्या तिजोरीतून खूप सारे धन घेतले, लवकरच राजाचा आदेशाप्रमाणे राज्यात विहीरी खोदल्या गेल्या. यानंतर राजाने एक दिवस राज्यात फेरफटका मारला व स्वतः काही विहीरीचे निरीक्षण केले व आपल्या आदेशाचे पालन पूर्ण झालेले बघून ते समाधानी झाले. 

उन्हाळयाच्या एक दिवशी राज्याच्या बाहेर गावातील काही लोक तेनालीरामाकडे गेले, व ते सर्व गृहमंत्र्यांविरूध्द तक्रार घेऊन आलेले होते. तेनालीरामने त्या सर्वांची तक्रार ऐकून घेतली व त्यांना न्याय मिळविण्याचा मार्ग सांगितला. 

दुसऱ्या दिवशी तेनालीराम राजाला भेटला व बोलला, ‘महाराज मला राज्यात काही चोर असल्याची माहिती मिळाली आहे, व ते आपल्या विहीरी चोरत आहेत.’

यावर राजा बोलला, ‘काय बोलत आहेस, तेनाली! कोणी चोर विहीर कसे काय चोरू शकतो?

‘महाराज हि गोष्ट आश्चर्यकारक जरूर आहे पण खरी आहे त्या चोरांनी आत्तापर्यंत बऱ्याच विहीरी चोरल्या आहेत.’ तेनालीराम शात स्वरात बोलला.

तेनालीरामचे हे बोलणे ऐकून दरबारातील सर्व उपस्थित दरबारी हसायला लागले.

महाराज बोलले ‘तेनालीराम तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तू आज असे काहीपण काय बोलत आहेस? तुझ्या बोलण्यावर कोणीच व्यक्ती विश्वास ठेवू शकणार नाही.’ 

‘महाराज मला माहिती आहे की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार, त्यामुळे काही गावकऱ्यांना माझ्या सोबत घेऊन आलो आहे. ते सर्व बाहेरच उभे आहेत. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना दरबारात बोलवून विचारू शकता, ते तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगतील.’

राजाने बाहेर उभ्या असलेल्या सर्व गावकऱ्यांना दरबारात बोलविले. त्यातला एक जण बोलला ‘महाराज गृहमंत्र्यांव्दारा बनविल्या गेलेल्या सर्व विहीरी गायब होत आहेत, तुम्ही प्रत्यक्ष बघु शकता.’

राजाने त्यांचे बोलणे ऐकले व लगेचच गृहमंत्री, तेनालीराम व काही गावकऱ्यांना बरोबर घेऊन विहीरीचे निरिक्षण करायला गेले. पूर्ण राज्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याला असे जाणवले की राज्याच्या आसपास, गावातील अन्य ठिकाणी एकही विहीर नाही. राजाला हे समजल्याचे बघून गृहमंत्री घाबरला. सत्य स्थितीत त्याने फक्त काही विहीरी बनविण्याचे आदेश दिले होते व उरलेला सर्व पैसा त्याने आपल्या सुख सुविधासाठी ठेवून घेतला. 

आत्तापर्यंत राजाला तेनालीरामाच्या बोलण्याचा अर्थ समजलेला होता. ते गृहमंत्र्यांवर रागवायला लागले, तेव्हा तेनालीराम मध्येच बोलला ‘महाराज, या सर्वामध्ये याची काहीही चूक नाही. वास्तवमध्ये सर्व विहीरी या जादूच्या होत्या ज्या बनल्यानंतर काही दिवसातच गायब झाल्या.’

आपले बोलणे संपवल्यानंतर तेनालीरामने गृहमंत्र्यांकडे बघितले, गृहमंत्र्याला आपण केलल्या कृत्याची लाज वाटली व त्याने आपली मान शरमेने खाली घातली.

त्यानंतर राजाने गृहमंत्र्याला फटकारले व नव्याने विहीरी बनविण्याचा आदेश दिला. हया कार्याची सर्व जबाबदारी तेनालीरामवर सोपविण्यात आली.

Read: Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत 

6. सोन्याचे आंबे

tenali raman stories in marathi read online

राजा कृष्णदेवराय यांची आई गंभीरपणे आजारी पडली. 

वृध्दापकाळामुळे आणि शारीरीक व्याधीमुळे राज्यात उपलब्ध असलेल्या चांगल्यात चांगल्या औषधांना ती प्रतिसाद देत नव्हती. जेव्हा ती मृत्यूशय्येवर होती तेव्हा तिने, ‘ब्राम्हणांना आंबे दान करावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.’ ती असे समजत होती की, अशा प्रकारचे दान केल्याने तिला स्वर्ग प्राप्त होईल पण काही दिवसातच आपली इच्छा पूर्ण न करता तिचा मृत्यू झाला. तिची इच्छा अपूर्ण राहण्या मागचे कारण म्हणजे तो आंब्याचा हंगाम नव्हता. संपूर्ण राज्य महाराजांच्या आईच्या मृत्यूमुळे दुःखात बुडाले होते.

राजाला अत्यंत वाईट वाटत होते, की तो आपल्या आईची इतकी साधी आणि शेवटची इच्छा पण पूर्ण करू शकला नाही. त्याला काळजी वाटत होती की जो पर्यंत आपल्या आईची शेवटची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. 

त्यानंतर राजाने राज्यातील सर्व विद्वान ब्राम्हणांना बोलविले आणि आपल्या आईच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले.

त्यावर काही वेळ शांत राहून ब्राम्हण बोलले, ‘महाराज! हे तर खूपच वाईट झाले. शेवटची इच्छा पूर्ण नाही झाली तर त्यांना मुक्ती मिळणार नाही व त्यांचा आत्मा भटकत राहील. महाराज तुम्हाला त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपाय करावा लागेल.’

तेव्हा महाराजांनी आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा उपाय विचारला. 

ब्राम्हण बोलले ‘त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही त्यांच्या पुण्यतीथीला सोन्याचे आंबे ब्राम्हणांना दान करा.’

राजा या गोष्टीला सहजपणे तयार झाला. व आईच्या पुण्यतिथीला काही ब्राम्हणांना भोजनासाठी बोलविले आणि प्रत्येकाला एक सोन्याचा आंबा दान म्हणून दिला. जेव्हा हे तेनालीरामला समजले तेव्हा त्याच्या लगेच लक्षात आले की, ब्राम्हण लोक हे राजाच्या भोळेपणा व साधेपणाचा फायदा घेत आहेत. त्यामुळे त्याने ब्राम्हणांना धडा शिकवण्यासाठी योजना तयार केली. 

काही काळानंतर तेनालीरामने ब्राम्हणांना निमंत्रण पाठविले, त्यात लिहिले होते की तेनालीराम पण आपल्या आईच्या पुण्यतिथिला दान करू इच्छित आहे कारण त्यांच्या आईची पण मृत्यूआधी एक अपूर्ण इच्छा राहिली होती. जेव्हापासून त्याला माहिती पडले आहे की आपल्या आईची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्या आईचा आत्मा भटकत असेल त्यामुळे तो खूप दुःखी होता व लवकरात लवकर आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी असे त्याला वाटत होते. ब्राम्हणाने विचार केला की तेनालीरामच्या घरीपण आपल्याला खूप जास्त दान मिळेल कारण तो एक राजदरबारातील श्रीमंत माणूस आहे. 

सर्व ब्राम्हण ठरलेल्या दिवशी तेनालीरामच्या घरी पोहोचले. तेव्हा तेनालीराम त्यांची वाटच बघत होता. ते ब्राम्हण आसनस्थ झाल्यावर तेनालीरामने सर्व दारे व खिडक्या बंद केल्या.

‘कृपया, थोडा वेळ प्रतिक्षा करा. मी काही तयारी करत आहे.’ असे बोलत तेनालीरामने काही लोखंडाच्या सळया आगीत ठेवल्या आणि त्यांना गरम करण्यास सुरूवात केली.

पुरोहित व ब्राम्हण काकुळतीने बघत होते. त्यांना काही तरी विचित्र वाटत होते. त्यांना अशी अपेक्षा होती की तेनालीराम आपल्याला स्वादिष्ट भोजन आणि योग्य ते मानधन देईल. पण, तिथे असे काहीही चिन्ह दिसत नव्हते. खूप वेळ वाट बघितल्यानंतर त्यांचा धीर सुटत चालला होता. त्यांच्यातील एक ब्राम्हण बोलला ‘तेनालीराम, तुझा उद्देश समजून घेण्यासाठी आम्ही अपयशी ठरलो आहोत तू आम्हाला तुझ्या आईच्या पुण्यतिथिला संस्कार करण्यासाठी बोलविले आहे. आम्ही कधीचे निष्क्रिय बसलेलो आहोत, आणि तू लोखंडी सळया गरम करीत आहेस. याचे आणि संस्काराचे काही संबध नाही.’ 

‘नाही, याचा संबंध आहे.’ तेनालीराम बोलला माझी आई संधिवाताच्या आजाराने त्रस्त होती जेव्हा ती मृत्यूशय्येवर होती. ती खूप दुःख सहन करत होती. ती मला म्हणायची ‘की लोखंडी सळई गरम करून दुखण्याच्या जागेवर लाव.’ त्यामुळे तिला खरोखरच आराम वाटायचा. एक दिवस, तिच्या शेवटच्या दिवशी तिला संधीवाताचे बरेच झटके आले आणि तिने मला लोखंडी सळई गरम करून देण्यास सांगितली. मी सळई गरम करायला ठेवली आणि गरम सळई तिला देण्याच्या आधी तिने प्राण सोडले. मला अतिशय वाईट वाटले की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, तिचा आत्मा पृथ्वीवर नेहमी भटकत राहिल. तो मुक्त करणे आवश्यक आहे. मला खात्री आहे, की या गरम सळया तुमच्या सर्वांच्या शरीरावर लावल्यानंतर नक्कीच तिला आराम मिळेल व तिचा आत्मा मुक्त होईल.

सर्व ब्राम्हण खूप नाराज झाले व मृत्यूला घाबरायला लागले.

शेवटी ब्राम्हण बोलले ‘तेनालीराम तू एक अतिशय हुशार व्यक्ती आहेस. तू अशी अपेक्षा कशी करू शकतोस की आमच्या शरीरावर गरम केलल्या लोखंडी सळया लावल्याने तुझ्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळेल? या सिध्दांताला काही आधार नाही.’

या सिध्दांताला आधार कसा नाही? तेनालीराम थोडया रागात बोलला. ‘जर राजाच्या आईच्या आत्म्याला तुम्ही सर्वांनी सोन्याचे आंबे घेवून मुक्ती मिळू शकते, तर माझ्या आईच्या आत्म्याला तुम्ही गरम केलेल्या सळयांचे डाग लावून घेतल्याने मुक्ती का मिळू शकत नाही?’

आंब्याचे दान देणे ही राजाच्या आईची शेवटची इच्छा होती, तसेच लोखंडाच्या सळयांचे डाग घेणे ही माझ्या आईची शेवटची इच्छा होती. हाच तो फरक. पण दोघांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे आत्म्याची मुक्तता.

हे ऐकून ब्राम्हण खूप नाराज झाले.

तेनालीराम ब्राम्हणांना बोलला ‘यावरून तुम्हाला धडा मिळालाच असेल. जर तुम्हाला तुमच्या कृतीची जाणीव झाली असेल तर, तुम्ही राजांकडे जावे व त्यांच्याकडून घेतलेले सोन्याचे आंबे त्यांना परत करावे व त्यांची माफी मागावी.’

जेव्हा ते ब्राम्हण राजाकडे आंबे घेवून गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार राजाला सांगितला व माफी मागितली. राजाने तात्काळ तेनालीरामला बोलविणे पाठविले.

‘तू असे का केले?’ राजाने विचारले.

महाराज, हे ब्राम्हण तुमच्याविषयी निष्ठावंत नाही त्यांनी तुमची फसगत केली आहे. जेव्हा ते राजाची फसवणूक करू शकतात, तेव्हा ते तुमच्या राज्यातील सर्वसामान्य व्यक्तींचीपण फसवणूक करू शकतात. मी हे असे फक्त त्यांना धडा शिकविण्यासाठी केले. मला फक्त त्यांचे हृदय परिवर्तन करायचे होते. 

राजा म्हणाला, ‘तेनालीराम जे बोलला ते योग्य आहे. मी त्याच्याशी सहमत आहे.’ 

त्यानंतर राजाने ब्राम्हणांना सोन्याचे आंबे परत केले. राजा एकदा दिलेल्या वस्तु परत घेत नाही. परंतु भविष्यात कोणाचीही फसगत करू नका व लोभी बनू नका अशी सुचना ब्राम्हणांना केली. 

राजाने तेनालीरामला त्यांचे डोळे उघडल्याबद्दल बक्षिस दिले.

Read: भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi | Ghost Stories in Marathi

7. सगळयात जास्त चतुर कोण?

sagdyat jast chatur kon

Tenali Raman Stories in Marathi: एक दिवस, बोलता बोलता राजा कृष्णदेव रायने तेनालीरामला विचारले ‘कोणत्या प्रकारचे लोक सगळयात जास्त मुर्ख असतात आणि कोणत्या प्रकारचे लोक अधिक चतुर असतात?’

तेनालीरामने त्वरीत उत्तर दिले ‘ब्राम्हण हे सगळयात जास्त मुर्ख असतात व व्यापारी हे सगळयात जास्त चतुर असतात.’

‘हे तू काय बोलत आहेस, तेनालीराम? ब्राम्हण हे उच्चशिक्षित व ज्ञानी असतात. तू व्यापाऱ्यांची ब्राम्हणांबरोबर तुलना कशी करू शकतो?’ राजा बोलला.

‘महाराज! मी माझा मुद्दा पटवून देऊ शकतो.’ तेनालीराम बोलला. 

‘कसे?’ राजाने विचारले.

‘मी उदया राजदरबारात सर्वांसमक्ष पटवून देईल.’ 

दुसऱ्या दिवशी जेव्हा राजदरबार पूर्ण भरलेला होता, तेव्हा तेनालीराम बोलला आपल्या अध्यात्मिक गुरूंना बोलवावे. राजगुरू आल्यावर तेनालीराम बोलला ‘मी हे आत्ता सिध्द करून दाखवेल महाराज, परंतु तुम्ही या कामात लक्ष देणार नाही असे मला वचन दया तेव्हा मी कामास सुरूवात करेन.’

राजाने तेनालीरामचे म्हणणे मान्य केले. तेनालीरामने आदरपूर्वक गुरूंना विचारले ‘राजगुरू, महाराजांना तुमच्या शेंडीची आवश्यकता आहे, याबद्दल तुम्हाला तुम्ही मागाल ते बक्षिस मिळेल.’

राजगुरूंनी विचार केला की इतक्या वर्षापासून जपलेली शेंडी कशी कापून दयावी? परंतु राजाची आज्ञा कशी टाळू शकतो. त्यांनी सांगितले ‘तेनालीरामजी, मी शेंडी कशी देऊ शकतो.’ 

तेनालीराम बोलला ‘राजगुरूजी, आपण आजन्म महाराजांचे मीठ खात आहात. शेंडी अशी वस्तु तर नाही ना, जी परत येऊ शकत नाही, आणि महाराज आपण मागाल ते बक्षिस दयायला पण तयार आहेत.’ राजगुरूंना मनातल्या मनात समजले की हा तेनालीरामचा काही तरी डाव आहे.

तेनालीरामने विचारले ‘राजगुरूजी, आपल्याला शेंडीच्या बदल्यात काय बक्षिस पाहिजे?’

राजगुरूंने सांगितले की ‘पाच सुवर्ण मुद्रा खूप होतील.’

पाच सुवर्णमुद्रा राजगुरूंना दिल्या गेल्या आणि केशकर्तन करणाऱ्याला बोलवून राजगुरूंची शेंडी कापण्यात आली. 

आता तेनालीरामने राज्यातील सर्वात प्रसिध्द व्यापाराला बोलविले.

तेनालीरामने व्यापाराला सांगितले ‘महाराजांना तुमच्या शेंडीची गरज आहे.’

‘सर्व काही महाराजांचेच आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी एक गरीब माणूस आहे.’ व्यापारी बोलला.

‘तुम्हाला तुमच्या शेंडीची मागाल ती किंमत दिली जाईल.’ तेनालीराम बोलला. 

‘सर्वकाही तुमची कृपा आहे परंतु....’ व्यापारी बोलला.

‘तू काय बोलू इच्छितो?’ तेनालीरामने विचारले.

‘खरे तर, या शेंडीमुळे मी सर्व काही व्यवस्थापित करू शकतो. माझ्या मुलीचा विवाह केला होता तेव्हा मी माझ्या शेंडीची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी पूर्ण पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हापण याच कारणामुळे पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. माझ्या या गोंडस शेंडीमुळे बाजारात जेव्हा मला गरज पडेल तेव्हा कमीत कमी दहा ते बारा हजार सुवर्ण मुद्रा उधार मिळतात.’ आपल्या शेंडीवर हात फिरवत व्यापारी बोलला. 

‘या प्रकारे तुमच्या शेंडीची किंमत पंधरा हजार सुवर्ण मुद्रा झाली आहे. ठिक आहे! तुला तुझी ही किंमत दिली जाईल.’

पंधरा हजार सुवर्णमुद्रा व्यापाराला दिल्या गेल्या व व्यापारी शेंडी कापण्यासाठी बसला. जसे न्हाव्याने शेंडीजवळ वस्तारा नेला, व्यापारी जोरात बोलला ‘सांभाळून न्हाव्या, तुला माहित नाही का ही महाराज कृष्णदेवराय यांची शेंडी आहे ते.’

हे ऐकून राज चिडला व बोलला, ‘या व्यापाऱ्याची इतकी हिंमत की तो माझा अपमान करतो? त्याला धक्के मारून दरबारातून काढून टाका.’

व्यापारी पंधरा हजार सुवर्ण मुद्रांची थैली घेऊन तिथून निघून गेला.

काही वेळानंतर तेनालीराम बोलला, ‘आपण बघतले का महाराज, राजगुरूंनी पाच सुवर्णमुद्रा घेवून आपली शेंडी कापून दिली व व्यापारी पंधरा हजार सुवर्णमुद्रा घेवून गेला त्याचबरोबर आपली शेंडीही वाचवून घेऊन गेला. तुम्हीच सांगा, ब्राम्हण चतुर की व्यापारी?’

राजा बोलला ‘तू योग्य सांगितले होते, की व्यापारी चतुर असतात.’ 

Read: Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये 

8. कावळे किती?

kavde kiti tenali raman story

एक दिवस कृष्णदेव राय राजाने तेनालीरामला विचारले ‘तेनालीराम तू सांगू शकतो का? आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते?’ 

‘हो, मी सांगू शकतो, महाराज.’ तेनालीराम तात्काळ बोलला.

‘पण मला अचूक नंबर पाहिजे.’ राजा बोलला.

‘हो महाराज, मी अचूक नंबरच सांगेन’ तेनालीराम ने उत्तर दिले.

‘जर तू मला अचूक नंबर सागण्यास नापास झाला, तर तुला फाशीची शिक्षा दिली जाईल.’ राजा हसत बोलला. 

‘मी तुमचे आव्हान स्वीकारतो, महाराज.’ तेनालीराम निर्भयपणे बोलला. 

दरबारी कल्पना करत होते की तेनालीराम आता मोठया संकटात सापडणार आहे, त्यांना खात्री होती की पक्षी मोजणे हि अशक्य गोष्ट आहे. 

‘ठिक आहे! मी तुला दोन दिवसांचा वेळ देत आहे. तिसऱ्या दिवशी तुला सांगावे लागेल कि आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत?’ राजा बोलला. 

तिसऱ्या दिवशी तेनालीराम दरबारात आला. राजाने त्याच्याकडे बघितले आणि विचारले, ‘आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते तू मोजले का?’ 

तेनालीराम आपल्या जागेवरून उठला आणि बोलला, ‘महाराज! आपल्या राज्यात एकूण एक लाख पन्नास हजार नऊशे नव्यान्नव कावळे आहेत.’

‘हे खरे आहे का?’ राजाने विचारले. 

‘महाराज शंका असल्यास मोजून घ्या.’ तेनालीराम बोलला. 

‘पुर्नमोजणी केल्यानंतर संख्या कमी - जास्त असली तर’? राजा बोलला. 

‘महाराज! मी सांगितलेल्या संख्येमध्ये फरक आढळल्यास त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असेल.’ तेनालीराम बोलला. 

राजाने विचारले, ‘काय कारण असू शकते?’ 

तेनालीरामने उत्तर दिले, ‘जर राज्यातील कावळयांची संख्या वाढली तर त्यामागील कारण आहे की कावळयांचे काही नातेवाईक व मित्रमंडळी त्यांना भेटायला आले आहेत. पण जर राज्यातील कावळयांची संख्या कमी झाली तर आपल्या राज्यातील काही कावळे हे त्यांच्या नातेवाईकांकडे व मित्रांना भेटायला गेले आहेत. अन्यथा मी सांगितलेली कावळयांची संख्या पूर्णपणे बरोबर आहे.’ 

राजाकडे काही उत्तर नव्हते. 

तेनालीरामवर जळणारे बाकीचे दरबारी मनातल्या मनात विचार करत होते की नेहमीप्रमाणे तेनालीराम हा आपल्या चातुर्याने अवघड परिस्थितीतून बाहेर निघाला.

राजाने तेनालीरामला त्याच्या व्यवहार चातुर्याबद्दल बक्षिस दिले.

Read: Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा

9. विकटकवी

vikatkavi tenali raman story in marathi

पाचशे वर्षांपूर्वीची गोष्ट!

पंधराव्या शतकात बिरबलाचाच माऊबंद शोभेल अशी एक व्यक्‍ती होऊन गेली. बिरबल होता अकबर बादशहाच्या दरबारात. त्याच्या नवरलांपैकी एक. चातुर्यशिरोमणी म्हणून. तशीच ही व्यक्‍ती होती क्जियनगरच्या कृष्णदेवरायच्या दरबारात. घोट, चतुर, विनोदी, हजरजबाबी, आणि पंडित, कवी देखील असणाऱ्या या बहुगुणी व्यक्तीचं नाव होतं तेनालीराम! 

तेनालीराम हे आपलं तसं प्रचारातलं, बोलण्या-वागण्यातलं नाव. तेनालीरामचं मूळ नाव होत रामलिंग. आंध्र राज्यातल्या कृष्णा नामक जिल्ह्यातला हा तेलगू ब्राह्मण. तेनाली किंवा तेआली हे त्याचं गाव. तेनालीचा रामलिंग म्हणजेच तेनालीराम. नावागावासहित प्रसिडध पावलेला. रामय्या आणि लक्ष्मम्मा ह्या गरिब पित्याच्या व मातेच्या पोटी तेनालीरामचा जन्म झाला होता. त्यामुळे त्याचे लाडप्यार तर तसे झालेच नाहोत, पण व्हावे तेव्हा धड, व्यवस्थित शिक्षणही झाले नाहो.

मग सोबत्यांबरोबर खुशाल गावभर भटकावे, खोड्या कराव्यात, थट्टा-मस्करी करावी, यातच बालपणातला बराच केळ गेला. पण तेनालीरामाला मूळचेच शहाणपण लाभलेले होते. त्याच्या खोड्यात आणि थट्टामस्करीतदेखील एक प्रकारची हुशारी असे. बुद्धिची चमक दिसे. असे म्हणतात प्रत्यक्ष कालिंकादेवीलाही स्वारीने आपल्या बुद्धिचातुर्याने प्रसन्न केले होते.

त्याचो कथा अशो सांगतात की, एकदा एका संन्याशाने तेनालीरामाला रस्ताने वांडपणा करीत चाललेला असताना पाहिले. त्याच्या बोलण्या-चालण्यावरुन त्याची अक्कलहुशारीहो त्या चाणाक्ष संन्याशाच्या लक्षात आली. संन्याशाला त्याचे कौतुकही वाटले. वाईट अशासाठी वाटले की, एवढ्या तरुण, चुणचुणीत, हुशार मुलाची बुद्धिमत्ता आणि केळ व्यर्थवाया चाललेला आहे. त्याची निगा होत नाहो. संन्याशाला राहवले नाही. या मुलाच्या गुणाचे चोज करायचे या बुद्धीने तो तेनालीरामजवळ गेला आणि मोठ्या ममतेने त्याची क्चिरपूस केली. नाव-गाव विचारले, शिक्षण-धंद्याची चौकशी केली. नाव-गाव कळाले, पण शिक्षण-धंद्याच्या दृष्टीने आनंद होता!

संन्याशी म्हणाला, 'तेनालीरामा, माझं ऐकशील ?'

'काय सांगणार आहात?

'मंत्र!'

'मंत्र?'

'हं. एक मंत्र. '

'काय कह त्याचं?"

'हा मंत्र जपायचा. कालिकादेवीपुढे बसून. एका राओोत, तोन कोटी जप जपला पाहिजेस.'

'अशानं काय होईल?

'कालिकादेवी प्रसन्न होईल! '

'देवी काय देईल?"

'हवा तो वर देईल. तुझी इच्छा पूर्ण करील. '

तेनालीरामला आनंद झाला. घरच्या गरिबीला तो नाही तरी कंटाळलेलाच घेता!

'जपशोल मंत्र?' संन्याशाने विचारले.

'हो हो. अवश्य जपीन. सांगा सांगा तो मंत्र. ' तेनालीराम उतावीळपणाने म्हणाला.

'सांगतो हं. पण तेनालीरामा, एक गोष्ट मात्र विसरु नकोस बरं का!'

'कोणती गुरुमहाराज?'

'देवी दर्शन देईल त्यावेळी तिचे उप्र, भयंकर रूप पाहून घाबरून जाऊ नकोस. धीटपणाने निर्भय राहा.'

'नाही मिणार. नाही घाबरणार. ' तेनालीराम छातीवर हात ठेवीत म्हणाला.

मग संन्याशाने त्याला मंत्र सांगितला. तेनालीरामने तो मनोभावे ऐकला, आणि निष्ठेने त्या रात्री देवीपुढे बसून जपला. त्याची निष्ठा, भक्तिभाव पाहून देवी प्रसन्न झाली. सहस्त्रशोर्ष नि दोनच हस्त. त्यात खडण्‌ ही आयुधं परिधान केलेली, कराल दृष्टीची आणि उप्र भयंकर पूर्ती प्रकट झाली! ते अद्भुत रुप पाहून कुणाचीही गाळणच उडाली असती. पण गुरुदेवांचा उपदेश आठवून तेनालीराम निर्भय राहिला. त्याने देवीला साष्टांग नमस्कार केला. तो देवीच्या कराल रूपाकडे पाहून याला, घाबरला तर नाहीच, पण 'खो खो खो' करुन हसायला लागला! काहो केल्या त्याला हसे आवरेना. तशी देवीच गोंधळून गेली आणि तिने त्याला क्तचिरले, 'बाळ, हसायला काय झालं?'

"मातुःश्री, आपण जगज्जननी आहात.' कसेबसे हसे आवरीत तेनालीराम म्हणाला, 'माझ्या हसण्याचं कारण ऐकून रागवाल

आपण, देवी बालकाला क्षमा करा. अभय द्या.'

'तेनालीरामा, तुला मी अभय देत आहे. सांग हसण्याचं कारण. घाबरू नकोस. ' देवी म्हणाली.

'मातुःश्री, आपल्याला पाहिलं. आपली हो हजार मुखं पाहिलो, आणि मनात विचार आला-'

'काय विचार आला? सांग. मिऊ नकोस.'

विचार असा आला, देवो; की आपल्याला- म्हणजे मला एक मुख आहे. म्हणजे एकच नाक आहे. पण तेवढे एकुलते एक नाकसुडा सर्दी झालो असता पुसण्यात, स्वच्छ ठेवण्यात किती तारांबळ उडते दोन हातांचो. आणि, देवी! तुला तर हजार नाकं आणि दोनच हात. तेहो हत्यारात गुंतलेले. मग हजार नाकांना पडसे झाले तर कसं काय करशील तू?'

तेनालीरामाचा हा विनोदी विचार ऐकून देवीदेखील खुदकन्‌ हसली. खृष झाली. आणि प्रसन्नतेने तेनालीरामाच्या मस्तकावर वरदहस्त ठेऊन तो म्हणाली,

'तेनालीरामा, तुझ्या वाक्‍चातुर्यावर मी प्रसन्न आहे. तुझ्या अंगीच्या चातुर्यानं आणि क्निदशक्‍्तीनं तू सर्वाच्या आदराला व प्रेताला पात्र ठठशोल. तुला राजदरबारी मानमान्यता मिळेल. 'विकरकवी' म्हणून तू ओळखला जाशोल. तुला अक्षयकीर्तीचा लाम होईल! '

"क्किरकवी!' तेनालीराम उद्गारला, 'वा! सुंदरच आहे नाव! आणि गंमतशीर्देखील!'

'ग॑मन कसली त्यात?' देवीने विचारले.

'देवी, 'वकिटकवी' सरळ वाचलं काय किंवा उलटं वाचलं काय, उजवीकडून वाचलं काय नि डावीकडून वाचलं काय, फरक व्हायचा नाही. तीच अक्षरं नि तेच नाव! ' तेनालीराम म्हणाला. त्याची ही हुशारी पाहून कालिकादेवी अधिकच प्रसन्न झाली. ती म्हणाली, 'तेनालीरामा, तुझ्या ठायीच्या गुणांचे चीज करणारा एकच राजा आहे आणि तो प्हणजे क्जियनगरचा राजा कृष्णदेवराय. त्याच्याकडे जा. तुझे कल्याण होईल. !'

तेनालीरामाच्यासंखंधी आणखीही एक आख्यायिका सांगतात ती अशी की, हा जन्मजातच विद्येचे धन घेऊन आलेला होता. रूढ पद्धतीने त्याचे शिक्षण झाले नसले तरी, बाराव्या वर्षीच हा तेलगू या आपल्या मातृभाषेत व संस्कृत या तत्कालीन प्रतिष्ठित पंडितांच्या भाषेत काव्यरचना करू लागला होता. तेलगू आणि संस्कृत या भाषांवर तेनालीरामने प्रभुत्व संपादन केले होते. त्याची लहान वयातली ही नवलपूर्ण विद्त्ता पाहून तेआलीचे लोक त्याला शंकराचा अवतारच मानू लागले होते. त्याचे आईवडील शैव होते. तेनालीरामही शिंवपूजक होता.

तेनालीरामची हुशारी पाहून अगदी तरूण वयातच व्यंकटपतीराम नामक चंद्रगिरीच्या राजाने त्याला आश्रय दिला होता असे प्हणतात. व्यंकटपतीराम हा वैष्णव पंथाचा अभिमानी होता. प्हणून तेनालीरामही वैष्णव बनला. त्याने आपले मूळचे रामलिंग हे नाव बदलून रामकृष्ण हे नवीन नाव धारण केले. काही असो. तेनालीराम म्हणूनच तो विख्यात झाला आणि विजयनगरच्या कृष्णदेवराय राजाच्या दरबारातील अष्टदिणजांपैकी तो एक झाला. तेनालीरामने लिहिलेला 'पाण्डुरंगमाहात्मय' नावाचा प्रंथही प्रसिदध आहे. त्यावरूनच कृष्णदेवरायाची त्याच्यावर मर्जी बसली होती.

राजा कृष्णदेवराय हा कर्नाटकातील विजयनगरच्या साप्राज्यातील एक रसिक, विद्वान; उदार असा गुणवंत सप्राट होऊन गेला. क्जियनगरचे साम्राज्य श्रीलंकेपासून उडोसापर्यंत पसरलेले होते. कृष्णदेवरायाच्या दरबारात शास्त्री, पंडित, कवी, कलावंत आदी गुणवानांचा सदैव सत्कार होत असे. तेलगू व कन्नड भाषाभाषी अनेक विद्वान राजाच्या राजसभेत होते. याच्या कारकिदींत तेलगू आणि कन्नड साहित्याची बरीच उन्नती झाली. तेनालीरामाच्या बुदधिचातुर्याचीही कृष्णदेवरायांनी उत्तम कदर केली.

Read: Mahabharat Stories in Marathi | महाभारत कथा मराठीत

10. राजदरबारात प्रवेश

rajdarbarat pravesh

Tenali Raman Marathi katha: राजा कृष्णदेवरायांची कीर्ती ऐकून दूर देशचे पंडित, कवी, कलावंत त्याच्याकडे विजयनगरला येत असत. एकदा तेनालौरामही आला. पण व्जियनगरला आला तरी राजदरबारात प्रवेश कसा मिळणार! एकदोन दिवस अशा चिंतेत आणि शोध घेण्यातच गेले. तिसऱ्या दिवशी नदीवर स्नानास गेला असताना अशाच एका ब्राह्मणाची आणि तेनालीरामची गाठभेट झाली. बोलता बोलता तेनालीरामने राजदरबारात प्रवेश कसा मिळेल आणि राजा कृष्णदेवराय याची भेट कशी होईल हे वचारले. त्यावर त्या ब्राह्मणाने, 'राजगुरु ताताचार्य म्हणून आहेत. त्यांच्यामार्फत हे काम होईल. ' असे सांगितले.

तेनालीरामची स्वारी लगेच ताताचार्यांच्या दारात हजर! पण ताताचार्यांचे दर्शनही दुर्लभ! अनेक ठिकाणांहून अनेक कामांसाठी अनेक लोक त्यांच्याकडे येत-जात असत. दरवारचीही पुष्कळच कामे त्यांच्यामागे होतीच. तेव्हा एवढ्या गडबडीतून ताताचार्य तरी कसे भेटावेत?

सकाळ-संध्याकाळ तेनालीराम मोठ्या आशेने ताताचार्यांच्या दारात येऊन उभा राहायचा. सात-आठ दिवस असेच गेले. एके दिक्शी मात्र ताताचार्य एका लग्नमंडपात जाताना तेनालीरामने पाहिले, आणि तोही त्यांच्या पाठेपाठ घुसला. संधी साधून ताताचार्यांपुढे जाऊत उभा राहिला आणि म्हणाला, 'मी एक कवी आहे, मला सप्रायांचे दर्शन घडवा.' त्यावर ताताचार्याने हुडत करून तेनालीरामला बाजूला सारले.

तेनालीरामला या अपमानाचा राग आला. पण करणार काय? ताताचार्य पडले राजगुरू!

'पण एके दिवशी ताताचार्यही तेनालीरामच्या तडाख्यात सापडले. त्या दिवशी जरा लौकरच तेनालीराम तुंगभद्रा नदीवर स्नान करायला गेला होता. स्नान उरकून निघाला, तो एका खडकावरही सगळे कपडे ठेवून ताताचार्यदेखील स्नान करताना दिसले. आणि ताताचार्यांनी त्या दिवशी साधी लंगोटीही लाक्लेली नव्हती. तेनालीरामचा खट्याळ स्वभाव जागृत झाला. त्याने हळूच, मांजराच्या पायाने जाऊन खडकावर ताताचार्यांचे धोतर, उपरणे आदि सगळे कपडे काखोटीला मारले आणि तसाच एका खडकाच्या आडोशाला लपून बसला. आंघोळ आयेपून ताताचार्य मंत्र पुटपुटत वर आले, पण पाहातात तर खडकावर घोतर-उपरणे काहीच नाहो! इकडे तिकडे जवळ पाहिले. लांब जाताही येईना की, कुणाला बोलावताही येईना तशा स्थितीत! काय

करावे? कते घरी जावे? ताताचार्य तर पार गोंधळून गेले! आणि भेदरूनही गेले! कारण अशा किनावस्त्र दिगंबर अवस्थेत स्नान करणे हे त्यांच्या वैष्णव धर्मांच्यादृष्टीने निषिद्ध होते. आणि ताताचार्य पडले राजगुरू!

तेनालीराम हे जाणून होता. त्याला ताताचार्यांची फजिती पाहून हसू येत होते. आणि त्याच्या दृष्टीने आपल्या अपमानाची भरपाई करुन घेण्याची व राजदर्शन कबूल करून घेण्याची होच संधी होती. म्हणून खडकाच्या आडूनच तेनालीराम म्हणाला, ताताचार्य, धर्म सोडून वागता हे आता गावात जाऊन लोकांना आणि महाराजांना सांगू का?' लज्जेने व भीतीने थरथरत ताताचार्य म्हणाले,

'नको, नको. कोण आहे ते? माझे धोतर दे लक्कर.'

'देतो. पण एका अटीवर! '

"कोणती अट?"

'मला तुम्ही तुमच्या खांद्यावर बसवून राजरस्त्याने घेऊन गेले पाहिजे आणि मी राहातो त्या धर्मशाळेत सोडले पाहिजे. '

तेनालीरामची अट भलतीच मानहानी करणारो होतो, पण तो अमान्य करुनही त्यावेळी भागणारे नव्हते. बरे, वेळ दवडूनही उपयोग नव्हता. कारण आता चांगले उजाडू लागले होते आणिं नदीवर गावातले लोक येऊ लागले होते. रस्त्यावरची वर्दळही वाढली होती आणिं घराघरापुढे सडासंपार्जन होऊन रांगोळ्याही घातल्या जात होत्या...

'ताताचार्य, कबूल करता माझी अट की-' तेनालीरामने विचारले.

'ठौक आहे! ठीक आहे! बैस बाबा माझ्या खांद्यावर. मान्य आहे तुझी अट. पण आधी घोतर दे माझे.' ताताचार्यांनी गडबड चालविली.

मग तेनालीरामने त्यांच्याकडे धोतर फेकले. उपरणे दिले. त्यांची शालजोडी स्वत:च्या अंगावर घेतली आणि ताताचार्यांच्या खांद्यावर वढून वसला.

बिचारे ताताचार्य! निमूटपणे निघाले. राजमार्गावरील लोक हे दृश्य पाहून चकीतच झाले! राजगुरू ताताचार्य कुणा एका तरुणाला स्वत:च्या खांद्यावर घेऊन चालले आहेत हे दृश्य तसे राजनगरीतल्या लोकांना अपूर्व असेच होते! ज्याचा मान दुसऱ्याच्या खांद्यांवर असलेल्या पालस्थीतून मिरविण्याचा, इतकेच नव्हे तर ज्या नगरीतला राजा -सप्राट- राजगुरु म्हणून 

ज्याच्याकडे पूज्यभाकनेने पाहातो, आदराने वंदन करतो, त्याच्या खांद्यावर कुणी एक तरुण बसाया! राजमार्गावरील लोकांची स्वाभाविक अशी समजूत झाली की, ज्या अर्थी राजगुरु ताताचार्यांनी एका तरुणाला आपल्या खांद्यावर घेतले आहे, त्या अथीं हा तरूण म्हणजे कुणी तरी श्रेष्ठ, अधिकारी, योगी, ज्ञानी पुरुष असावा!

Read: Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi

तर ह्या होत्या काही तेनालीराम च्या गोष्टी मराठीत (Tenali Raman Stories in Marathi) जर तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असेल तर आम्हाला कंमेंट मध्ये कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share जरूर करा.

Post a Comment

Previous Post Next Post