महात्मा गांधी मराठी भाषण - Mahatma Gandhi Speech in Marathi

आज मी तुमच्या करीत लिहले आहे महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi speech in marathi). आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.हे गांधी जयंती (gandhi jayanti speech in marathi) साठी सर्वोत्तम भाषण आहे.

mahatma gandhi speech in marathi

महात्मा गांधी मराठी भाषण

“ बेष्णव जन तो तेणे कहिए जो पीरपराई जाणेरे..."

महात्माजींच्या बाबतीत हे अगदी शंभर टक्के खरे आहे. म्हणून प्रथमच महात्माजींना; आपल्या * राष्ट्रपित्याला ' त्यांच्या जयंती निमित्त मी शतप्रणाम करुन... त्यांना आदरांजली वाहतो.

इथे उपस्थित माझ्या गुरुजनांना देखील माझे सादर वंदन. माझ्या दोस्तांनो, .

आपल्या हातून रोज नव्या-नव्या चुका होतच असतात. त्यासाठी आपले आई-बाबा, शाळेत शिक्षक आपल्याला वेळीच समज देतात. कधी कधी ( नव्हे बरेचदा ! ) आपल्याला त्यांचा रागही येतो. पण आपण तर सामान्य मुले आहोत. आपण त्यांचे ऐकलेच पाहिजे. कसे ? त्यासाठी महात्माजींच्या बालपणातील दोन घटना सांगतोय. त्यावेळी ते होते एक सामान्य विद्यार्थी, ' मोहनदास करमचंद गांधी. '

शाळेत जाणाऱ्या मोहनदासला शाळेत वाईट मित्रांची संगत लागली. अवघ्या सहाव्या वर्षी खोटे बोलणे, चोरी करणे, विडी ओढणे या वाईट गोष्टी. त्याच्या हातून घडल्या. वडिलांच्या हे लक्षात येताच त्यांनी मोहनला हटकले... खडसावले ! मोहनलाही आपली चूक ध्यानात आली. त्याने बडिलांजवळ झाल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. पुन्हा असे न करण्याचा “ खरे बोलण्याचा ' निश्चय केला. आणि अभ्यासात स्वत:ला गाढून घेतले.

मग इतके की स्वत:ला लिहिता न येणारा इंग्रजी शब्द ' शेजारच्या मित्राच्या वहीत बघून लिही. ' असे शिक्षकांनी सांगून सुद्धा त्या शब्दाची कॉपी केली नाही: चुकीचे लिहिले. नंतर तो शब्द. त्याचे स्पेलिंग प्रयत्नपूर्वक पाठ करुन मगच आपल्या वहीत उतरवले. ही घटना आहे राजकोट येथील शाळेत ते शिकत असतानाची... आणि ते स्पेलिंग होते ' केटल ' या शब्दाचे. याच निश्चयी व निग्रही स्वभावामुळेच केवळ “ सत्य ' ब ' अहिंसा, या दोन तत्त्वांच्या जोरावर गांधींजींनी अन्यायाविरुद्ध लढा दिला व जुलमी इंग्रज सत्तेला प्रतिकार केला.

वास्तविक पाहता गांधीजींचा जन्म गुजरातमधील * पोरबंदर ' या गावात झाला. वडिल पोरबंदरच्या महाराजांचे दिवाण होते. सारे काही व्यवस्थित होते. मॅट्रिक नंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले. नि बॅरिस्टर होऊनच भारतात परतले. हायकोर्टात ( मुंबईच्या ) वकिली करु लागले. एका. खटल्याच्या निमित्ताने त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. आणि ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांवर होणारे अत्याचार, अन्याय त्यांना पाहवले नाहीत. तिथेच त्यांनी यासाठी तेथील भारतीयांना एकत्र केले. त्यांना त्यांच्यावर होत न असलेल्या अन्यायाची जाणीव करुन दिली. त्यासाठी सत्याग्रह पुकारला आणि भारतीयांना देय असलेले न्याय्य हक्क व सवलती मिळवून देऊन मगच भारतात परतले.

भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही हे त्यांच्या लक्षात आले. ब्रिटिश सत्ता भारतातल्या भारतीयांच्या हक्कांवर, स्वातंत्र्यावर गदा आणत . होती. आपले भारतीय जात-पात, स्पृश्य-अस्पृश्य च्या विळख्यात अडकले होते. प्रथम सर्व भारतीयांना मनाने एकत्र आणण्यासाठी हे जाती भेद मिटविण्यासाठी गांधींजींनी प्रयत्न सुरु केले. अस्पृश्यांना ते हरिजन म्हणूनसंबोधत. त्यांना न्याय हक्क, योग्य सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

सर्व जनता एक करण्यासाठी गांधीजी पदयात्रा काढत. त्यात त्यांच्या पत्नी कस्तुरबाही असत. या दरम्यान गांधीजींच्या लक्षात आली ती भारतातील ठराविक स्तरावरील दारिक्र्यावस्था ! घालायला कपडे नाहीत म्हणून न येणारे उपाशी असलेले 'हे पीडित पाहून; या महात्म्याने प्रतिज्ञा केली “ जोवर देशातील प्रत्येकाला स्वतःच्या अगावर घालायला कपडा नसेल तो वर मी ही केवळ पंचा नेसेन '...' जोवर प्रत्येकाला दोन वेळची रोजी-रोटी मिळणार नाही तोवर मी देखील एकवेळ ( दिवसातून ) उपासच करेन. ' मग त्यांनी या वस्त्यांतून चरखे वाटले. स्वत: सूत कातून त्याचे वस्त्र गुंडाळण्याचा स्वावलंबनाचा आदर्श या लोकांपुढे... आपल्यापुढे ठेवला आणि याच घटनेने ते राष्ट्राचे कैवारी " राष्ट्रपिता ' बनले.

साबरमती नदीकाठी आश्रम बांधून गांधीजी साधेपणाने राहू लागले. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ' यंग इंडिया ' हे साप्ताहिक चालवीत होते. सत्य, अहिंसा आणि असहकार याच्या बळावरच स्वातंत्र्य मिळावे याचा आग्रह त्यांनी धरला होता.

भारतीय स्वातंत्र्याचा लढा दिवसेंदिवस ऊग्र बनत चालला होता. इंग्रज सरकार आता या लढ्याने त्रासले होते. हेराण झाले होते. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोलमेज परिषद इंग्लंड येथे भरविण्यात आली होती. गांधीजी त्या परिषदेस हजर होते. तेथेही कणखर आणि स्पष्टपणे त्यांनी भारताची बाजू मांडली. भारतात परत आल्यावर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबईला ब्रिटीश सरकारला “चले जाव “ चा आदेश गांधीजींनी दिला. आणि स्वातंत्र्यलढ्याने आपला अंतिम टप्पा गाठला. यश स्वातंत्र्य आता समोर दिसत होते. स्वातंत्र्य सूर्याची लख्ख किरणे आता भारतावर पडणार होते पण भारतातील हिंदू मुसलमानांचे तंटे काही केल्या मिटत नव्हते. गांधींजींनी हे तंटे मिटविण्यासाठी जिवाचे रान केले पण व्यर्थ.

ब्रिटिशांनी याच संधीचा फायदा घेतला. भारताला स्वातंत्र्य बहाल केले पण त्याची हिंदुस्थान - पाकिस्तान अशी फाळणी करुन. या फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंदु-मुसलमान सर्वांवरच अत्याचार झाले. सर्वांचेच खूप नुकसान झाले. गांधींजींचे स्वप्न होते... एकसंघ भारताचे... ते तुटले... गांधीजी व्यथित झाले. .. दुःखी झाले... नोखाली येथे त्यांनी एक शांतियात्रा देखील काढली. मनामनांतील दुवे साधणारा तो एक अखेरचा प्रयत्न होता. स्वातंत्र्यलढ्यात समर्पित जीवन जगणाऱ्या या सेनापतीने शेवट पर्यंत आपली तत्वे सोडली नाहीत. “ सत्याचे प्रयोग ' नावाचे आत्मकथन पुढील पिढीसाठी दिशादर्शक म्हणून त्यांनी लिहून ठेवले.

अशा-या महात्म्याला एका तरुणाने ३० जानेवारी १९४८ रोजीं सायंप्रार्थथेला जातेवेळी छातीवर गोळ्या घालून संपविले. जातेवेळी शांतपणे महात्म्याच्या तोंडून शब्द उमटले, हे राम! .

धन्यवाद!

तुम्हाला महात्मा गांधी मराठी भाषण (mahatma gandhi marathi bhashan) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

Post a Comment

Previous Post Next Post