२६ जानेवारी साठी मराठी भाषण | 26 January Speech in Marathi

आज मी तुमच्या करीत सम्पुर्ण २६ जानेवारी मराठी भाषण (26 January Speech in Marathi) तयार केला आहे. आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल. (republic day speech in marathi)

26 january speech in marathi

२६ जानेवारी मराठी भाषण

सन्माननीय गुरुजनांना माझं सादर वंदन !

मंडळी,

' आओ वच्चो तुर्म्हे दिखाँ झाँकी हिंदुस्थानकी, इस मिठ्टी से तिलक करो ये धरती हे बलिदान की '... असं गौरवानं आपल्या माता-पित्यानं, गुरुजनांनी सांगावं असा आपला ' भारत देश. '

अतिशय शालीन आणि उच्च संस्कृती; परंपरा लाभलेला आपला भारत देश. आचार्य विनोबा भावेंनी भारतीय संस्कृतीचं सुरेख वर्णन केलंय. ' भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती, भूक नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यातला घास दुसऱ्यास देणं ही ' संस्कृती. '

अशा आपल्या संस्कृतीत... दानशूर संस्कृतीत अनेक दानशूर राजे होऊन गेले. राजा हरिश्चंद्र ' कर्ण, पुरु... किती किती नाव घ्यावीत ? उत्तम न्याय आणि योग्य न्याय करण्याची ख्याती असलेले राजा विक्रम आणि शिवाजी महाराजष्टी होऊन गेले. शिवाजीप्रमाणे राणा प्रताप, झाशीची राणी-लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, राणी पदिनी; किती किती राजे राण्या भारताची आन-बाण-शान टिकवण्यासाठी जिवाचं रानं करुन गेले. पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी; आपल्यासाठी गौरवशाली परंपरा आणि आदर्श ठेवून गेले. जिजाबाईसारखी ' राजा ' घडविणारी * माता ' ही आपल्याच देशात जन्माला आली आणि सत्तेचा मोह झुगारुन वडिलांच्या वचनाचा मान राखून बनवासी होणारा राजा प्रभूरामचंद्रही ' आपल्याच देशात जन्मला.

' मस्तकपर हिमराज विराजे, उन्नत माथा माता का। ।
चरण धो रहा विशाला सागर, देश यही सुंदरता का ।
हरियाली साडी पहने माँ, गीत तुम्हारे गाये हम ॥
वंदे मातरम्‌... '

गंगा, यमुना, गोदावरी, पूर्णा, कृष्णा आदि नद्यांनी पावन झालेला आपला देश ' सुजलाम्‌, सुफलाम्‌, ' असा देश. या देशाचं संरक्षण व्हावं असं निसर्गालाही वाटलं म्हणून सर्वत्र डोंगरराज दिसतात. उत्तरेकडे . हिमालयासारखा विराट पर्वत आहे. याच माझ्या; आपल्या देशाच्या मातीत स्वामी विवेकानंदांसारखे विचारवंत जन्माला आले. रविंद्रनाथांसारखे कवी लेखक जन्माला आले.

गोतम बुद्ध, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आदि संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी देखील माझा भारतच आहे. म्हणूनच कदाचित भारताचे चरण धुण्यासाठी निसर्गानं दक्षिणेकडे सागराची निर्मिती केली असावी,

प्रतीकांची पूजा करणाऱ्या आमच्या या भारतात दसरा-दिवाळी- होळी साजरी होते. तसंच बैसाखी सुद्धा... नि ओणम्‌-पोंगल सुद्धा साजरे होतात. त्याचबरोबर साजरी होते * ईद ' आणि ' ख्रिसमस * सुद्धा ! वेगवेगळ्या भाषा बोलणारे, विविध धर्मांचे; जातींचे लोक आपापल्या परीनं संस्कृती-सण-उत्सव यांचं जतन करत असतात. यामुळेच तर संत तुकडोजी महाराजांनी देवाकडं मागणं मागितलं होतं.

' या भारतात बंधुभाव नित्य बसू दे
दे बरचि असा देः
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेदनसूदे '
त्याप्रमाण घडलं देखील. ब्रिटिश सरकारला हटवण्यासाठी सावरकर, भगतसिंग, टिळक, गांधी, नेहरु, मौलाना आझाद, म. फुले, डॉ. अँनी बेझंट यांच्या हाकेला सर्वच भारतीय बंधु-भगिनींनी साद दिली.

 देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून, मंगलमय पूजा असं म्हणत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्यामुळेच तर आज आपण अभिमानानं सांगू शकतो. भारत माझा देश आहे !

मंडळी, पण आज भारत माझा देश आहे याची जाणीव ठेवण्यासाठी आपल्याला शाळेत रोज प्रतिज्ञा म्हणावी लागते ! प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे एकदा आपल्या व्याख्यानात म्हणाले होते.

“मारत माझा देश आहे. अशी प्रतिज्ञा भारतातील विद्यार्थ्याला रोज घ्यावी
लागते; या सारखा दुसरा विनोद नाही."

खरंच आहे ते ! स्वातंत्र्यबीरांनी केलेले कष्ट, त्यांचे होतात्म्य, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सोसावे लागलेला अपमान- अवहेलना; त्यांनी केलेले यत्न, त्याग आम्ही जाणतो का ?... आम्ही फक्त गरम-गरम चर्चा करतो; परकीय आक्रमणांवर ! ते सैनिक बिचारे आपल्यासाठी आपलं घरदार सोडून सीमेवर प्राणपणानं लढत असतात. आजही ! आम्ही फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी साजरे करायचे, नि जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या. ध्वजदिनाच्या दिवशी निधी गोळा करायचा. हेच काय ते आमचं राष्ट्रप्रेम ! म्हणून तर प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते लिहून गेले ' भारत कधी कधी माझा देश आहे.'

सध्या आपण स्वातंत्र्य मिळून खूप वर्षे लोटल्यानं सुस्तावलोत; सुखावलोत. माझं ठीक चाललंय ना मग मला काय फिकीर कुणाची ? ही वृत्ती बळावतेयं. हो ! पण जेव्हा क्रिकेटची मॅच सुरु होते. तेव्हा मात्र आमचं देशप्रेम उफाळून वरं येतं. शाळा-कॉलेज - ऑफिस बुडवून आम्ही टी.व्ही. समोर बसतो. ( तुम्ही मंच पाहिली म्हणून काय भारत जिंकणार आहे? ) अरे, ' तिकडे काश्मीरची चालली विकेट, नि तुम्ही काय पाहून राहिले क्रिकेट ?' तुमच्यातले कितीजण देशासाठी लढणार ?

बरं आपला बहुपक्षीय भारतदेश. सगळं खुचीचं राजकारण. मतांचे मागितले जातात जोगवे, नि दिली जातात आश्वासनं. पण घडतातच आहेत दंगली नि बॉम्बस्फोट. हजारो निरपराध जीव जातात. तरीही खुर्च्यांची भांडणं चालूच.

धन्यवाद

तुम्हाला २६ जानेवारी मराठी भाषण (26 january marathi bhashan) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा. 

Read

लोकमान्य टिळक मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण

बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण

Post a Comment

Previous Post Next Post