सावित्रीबाई फुले मराठी भाषण - Savitribai Phule Speech in Marathi

आज मी तुमच्या करीता सम्पुर्ण सावित्रीबाई फुले मराठी भाषण (savitribai phule speech in marathi) तयार केला आहे. आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.

Savitribai Phule Speech in Marathi

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

सन्माननीय गरुजन व मान्यवरांना माझा सादर प्रणाम ! इथे जमलेल्या माझ्या सवंगड्यांनो; आपल्याला सर्वानाच ठाऊक असलेला सुविचार...

जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्‌धारी.
हे सार्थ पटवून दिलं... ' सावित्रीबाई फुले यांनी !

थोर समाजसेवक महात्मा जोतिराव फुले यांची पत्नी सावित्रीबाई. नावाप्रमाणं पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी स्त्री ! आपल्या देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातले हे एक आगळ वेगळं जोडपं वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा जोतीराबांशी विवाह झाला.

जोतिराव त्यावेळी होते अवघे १३ वर्षाचे. साल १८४०, स्रियांनी शाळेत जाण मान्य नव्हत; कर्मठ समाजाला. अशात जोतिराबांनी धारिष्टकेलं. सावित्रीबाईंना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाईंची देखील त्याना उत्तम साथ लाभली. एका ठिकाणी तर मी असं देखील बाचलंय जोतिरावांनी घरीच शिक्षण दिल्याचे , तसंच अहमदनगर येथील फरार बाईंच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचं प्रशिक्षण घेतलं होतं. असं शासकीय कागदपत्रांवरुन दिसून येतं. तसंच तत्कालीन दस्ताऐवजावरुनही असच स्पष्ट होतं की सावित्रीबाई याच भारतीय आद्यशिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत ! मंडळी, म्हणजे त्यांनी "टाकलेलं पाऊल ' हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सामाजिक जीवनाची' खरी खुरी सुरुवात म्हणायची !

जोतिराव आणि.सावित्रीबाई हे सर्वार्थांनं एकरुप असं जोडपं होतं. सावित्रीबाईंच्या जीवनातल्या काही गोष्टी मी वाचल्यात ! त्यापैकीच काही गोष्टी मला वाटतं तुम्हांलाही ठाऊक असतीलच ! तरी देखील मी त्या" पुनःस्मरण करुन देण्यासाठी सांगतेय...

जोतिराव नि सावित्रीबाईंच घरं होतं गरीब-दलित-कष्टकरी यांच्या वस्तीत. त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात राहिलेल्या एका व्यक्तीनं.तर त्यांच्याविषयीचं पूर्ण चित्रचं आपल्या वर्णनातून उभं केलंय. ते म्हणतात, रोज सकाळी सावित्रीबाई लवकर उठत, सडासंमार्जन व स्नान हे सूर्योदयापूर्वीच होत असे. घर नेहमीच स्वच्छ असायचं. त्यांना दिवाण-खान्यात थोडादेखील केर किंबा धूळ खपत नसे. घरातील भांडी व इतर सामान देखील स्वच्छ व टापटीपीनं ठेवलेलं असायचं, स्वत: स्वयंपाक करायच्या. जोतिरावांच्या प्रकतीची नीट काळजी घ्यायच्या. ' सावित्री- बाईंचा पोषाख सुद्धा जोतिरावांसारखा अगदी साधा. गळ्यात एक पोत मंगळसूत्र, कपाळावर कुंकू. अगदी साधी साडी. अन्य कोणताही अलंकार अंगावर नसायचा. '

“साधी राहणी नि उच्च विचारसरणी ' असावी हे या फुले दांपत्यान. जणू आपल्या वर्तनातून समाजाला सिद्धू क्ररुन दाखवलं !

जोतिराव नि सावित्रीबाई यांचा स्नेह लाभलेल्या एका व्यक्ती त्यांचं केलेलं वर्णन; त्यांच्या शैक्षणिक-सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकणारं आहे. बोलकं आहे ! सन १८४८ च्या ऑगस्टमध्ये त्यांनी सर्वप्रथम पुण्यात दलितमुस्लिमांसाठी शाळा काढली. समाजाकडून त्यावेळी कडबा ' विरोध झाला. तो पत्करुन सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात होत्या. कुणीही कितीही शिव्याशाप दिले तरीही जरासुद्धा न ढळता शांतपणे नि धैर्याने काम करत होत्या. कांही वेळा तर त्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर काही टोळभैरव मुद्दामच उभे राहत. आचकट-विचकट बोलत; कधी दगड मारत. तर कधी अंगावर चिखल किंवा शेण टाकत! मग त्या शाळेत जाताना दोन साड्या सोबत नेऊ लागल्या. रस्त्यानं जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्यावर बदलावी लागे. परत फिरताना देखील एक साडी खराब होई. त्यांचा हा छळ असाच चालू राहिल्यामुळं संस्थेत शिपायाची नियुक्ती लहान मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीनं केली. 

त्यानं लिहून ठेवलेल्या या संबंधींच्या आठवणी तर अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. तो लिहितो. ' आपल्या अंगावर दगड किंबा चिखल फेकणाऱ्या टवाळांना त्या शांतपणे म्हणत, ' मी माझ्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करत असतां; तुम्ही माझ्या अंगावर फेकलेले दगड किंवा शेण ही मला फुलंच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो ! ' असं म्हणून त्या पुढे चालू लागत.

त्यांच्या धेर्यकथा किती सांगाव्यात. त्यावेळी बिधवा स्त्रियांचे समाजात फार हाल होत असत. त्यांचे केशवपन केले जाई. या ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध दीनबंधू ' चे संपादक व त्या वेळचे कामगार नेते नारायण मेघजी लोखंडे यांनी सावित्रीबा्डच्या प्रेणेनंच नाभिकांचा संघटित संप घडवून आणला. हा एक ऐतिहासिक प्रसंग होता. असं म्हणतात की त्यावेळी इंग्लंडमधल्या स्त्रियांनी ' दि टाईम्स ' मधील हे वृत्त वाचून सावित्रीबाईंना अभिनंदनाचं पत्र देखील पाठवलं होतं.

जोतिराव-सावित्रीबाईंनी स्वत:च्याच घरात एक वसतिगृह देखील चालवलं होतं. लाबूंन-लांबून विद्यार्थी येऊन तिथं रहात. आई-बापाची माया या दांपत्याकडून अनुभवत लक्ष्मण कराडी जाया या तेथील एका विद्यार्थ्यांने आपल्या आठवणी स्गांगताना म्हटलयं.' सावित्रीबाई –सारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी आजवर कुठेही पाहिली नाही. ' तर अन्य एका विद्यार्थ्यांना सांगितलयं.' सुस्वरूप, मध्यम बांध्याच्या, शांत अशा सावित्रीबाई ' काकू ' कायम हसतमुख असायच्या. स्त्री उन्नतीची त्यांना फार कळकळ होती. कधी रागावत नसत; दोघा पति-पत्नींत विलक्षण प्रेम व आदर होता. जोतिराव तात्या ' त्यांना अहो-जाहो करत; तर काक्‌ जोतिरावांना ' शेठजी ! ' स्त्री शिक्षण सुरु केल्यावर पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे यासारख्या पुण्यातील मोठ मोठ्य़ा सुशिक्षित बायका सावित्रीबाईंच्या भेटीला येत असत.

पुढे २४ डिसेंबर १८७३ ला' सत्यशोधक समाजाची ' स्थापना झाली. सावित्रीबाई त्याच्या खंद्या कार्यकर्त्या होत्या. “ देशातल्या हजारो वर्षातल्या धार्मिक परंपरा नाकारुन त्या विरोधात विधायक विद्रोह करणारे समाजाने उचललेलं पहिलं क्रांतिकारी पाऊल सावित्रीबाईंच्याच पुढाकारान ! अशी नोंद समाजाच्या पहिल्या अहवालात देखील आढळते.

असे किती पैल्‌ सांगावे सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे ! जोतिरावांना पक्षाघात झाला. आर्थिक परिस्थिती बिकट झाली. सामाजिक कार्याचा व्याप वाढला होता. अशाही परिस्थितीत त्या धीरानं तोंड देत. पतीची सेवा करत राहिल्या ! पण काळ कुणासाठी कधी का थांबलाय ? त्यानं जोतिरावांना बोलावून घेतलं. आणि मग त्यांच्या पुतण्याचा वारसा हक्कासाठी झगडा सुरु झाला. ' यशवंत या त्यांच्या दत्तक पुत्राला ते डावलू लागले. अंत्ययात्रेला त्याला ' टिटवे ' धरु देईनात. सावित्रीबाईंनी दुःख . बाजूला सारलं. टिटवी ' हाती धरुन अंत्ययात्रेपुढे चालू लागल्या. अतिशयं धीरानं जोतीबांना ' अम्नी ' देखील दिला ! आपल्यापतीलाएका स्त्री नं अग्नी देण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रसंग असेल ! वाजत-गाजत आणलेल्या पतीच्या अस्थींवर तिनं एक तुळशीवंदावन बांधलं. पूजा सुरु केली. नंतरही तिनं पतीचं कार्य नेटानं पुढे नेण्यात यश संपादन केलं. पण प्लेगच्या साथीत लोकांना बाचवता-वाचवता प्लेगची लागण होऊन ही कर्तृत्ववान स्त्री जोतिरावांच्या भेटीला गेली... चिरंतर झाली.

धन्यवाद

तुम्हाला सावित्रीबाई फुले मराठी भाषण (savitribai phule bhashan marathi) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा. 

Read

महात्मा गांधी मराठी भाषण

लोकमान्य टिळक मराठी भाषण

बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण

२६ जानेवारी मराठी भाषण

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post