मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण निबंध मराठी  | Women Education Essay in Marathi

तुम्हा सर्वान साठी मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मराठी निबंध लिहिला आहे (Women Education Essay in Marathi). या निबंध मध्ये मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व व्यक्त केली आहे. 

women education essay in marathi

तुम्हाला हा (mulinche shikshan pragati che lakshan) निबंध नक्की आवडेल.

मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण निबंध मराठी

'एक सुशिक्षित आई ही शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे, ' हा आपल्या राष्ट्रपित्याचा संदेश अनमोल आहे. कारण ज्य घरातील स्त्री शिकलेली आहे, ते घर कधीच अशिक्षित राहणार नाही. तरीपण आजही आपल्या देशातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण हे पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 

खरं पाहता, आज महाराष्ट्र शासनाने मुलींना पहिलीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली आहे. त्याशिवाय ' सावित्रीबाई दत्तक बालक ' योजनेतून तिला शिक्षणासाठी येणाऱ्या इतर खर्चासाठी मदत मिळू शकते. त्यामुळे आज शहरातून मुली, स्त्रिया शिक्षण घेताना आढळतात. आज कित्येक कर्तबगार स्त्रिया जबाबदारीची पदे सांभाळत आहेत. कर्तृत्वाचे कोणतेही क्षेत्र आज स्त्री हुशारीने सांभाळू शकते, हे स्त्रीने सिद्ध केले आहे. तरीही आपल्या देशातील स्त्रीशिक्षणाची समस्या कठीण का झाली आहे ?

' किशोरी प्रशिक्षण ' या प्रकल्पामुळे आता स्पष्ट झाले आहे को, स्त्रीशिक्षणात अनेक अडथळे आजही उभे आहेत. वर्षानुवर्षे आपल्या समाजात स्त्रीला शिक्षणासाठी विरोधच होता. चूल आणि मूल सांभाळायला शाळेत कशाला जायला हवे, अशी मनोधारणा होती. स्त्रीवर अनेक बंधने होती. आजचा समाज या समजुतीतून थोडा थोडा बाहेर पडला आहे. तरीपण ग्रामीण भागात स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत अद्यापिही उदासीनता दिसून येते.

स्त्रीशिक्षणातील मुख्य अडचण आहे गरिबी. गरिबीमुळे शासनाने दिलेल्या अनेक सोयीसवलती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीत. गरिबीने ग्रासलेला माणूस मुलांच्या शिक्षणाचा विचार करू शकत नाही. त्यांत भर असते ती पालकांच्या अज्ञानाची. आपल्या बाळांना शिकवले तर आपले व त्यांचे भवितव्य बदलेल, ही जाणीवच या पालकांना नसते.

काही पालकांना जाणीव झाली, तरी परिस्थिती त्यांना अगतिक करते. उदरनिर्वाहासाठी त्यांना दिवसरात्र राबावे लाम्रतें. आईबाबा कामावर गेल्यावर लहान भावंडांना सांभाळायची जबाबदारी मोठ्या भावंडांवर - विशेषत: मोठ्या मुलींवर येते. काही ठिकाणी घरातील खर्च भागवण्यासाठी मुलींनाही कामावर जावे लागते. घरकाम, शेतकाम अशा विविध कामांत गुंतलेली मुले शिक्षणापासून वंचित राहतात. आता ' बालकामगार विरोधी ' कायदाही झाला आहे. पण तेवढ्याने प्रश्‍न सुटेल का ?

मुलांना शिकवण्याचा मुद्दा आला को, मुलीपेक्षा मुलाला शाळेत पाठवण्याला प्राधान्य मिळते. कारण तो वंशाचा दिवा असतो ना ! याशिवाय शाळेत जाणाऱ्या मुलींना समाजकंटकांपासून होणारा त्रास, शाळा दूर असणे याही गोष्टी स्त्रीशिक्षणाच्या आड येतात. काही कुटुंबे पोटासाठी गावोगाव हिंडत असतात. मग त्यांच्या मुलांना शिक्षण कोठून ब कसे मिळणार ? शाळातुमच्या दारी ' फिरत्या शाळा ' अशा काही योजनांनी या समस्या सोडवण्याचा यत्न काही सामाजिक संस्था करीत आहेत, पण ते प्रयत्न अपुरेच पडतात. 

जोवर स्त्रिया साक्षर, सुशिक्षित होत नाहीत, तोपर्यंत समाज निकोप होणार नाही. कारण अज्ञानातून अंधश्रद्धा, अविवेक या गोष्टी येतात. म्हणूनच जोतीराव फुले सांगतात की, ' विद्येविना सर्व काही व्यर्थ आहे. '


Read

विज्ञान आणि मानव मराठी निबंध

मी मुलगी बोलतेय मराठी निबंध

भ्रष्टाचार वर मराठी निबंध

पृथ्वी चे मनोगत मराठी निबंध

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post