लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी निबंध | Population Essay in Marathi 

जगाची जनसंख्या मागच्या १० वर्षा पासून खूप वाढली आहे आणि दिवसां दिवस वाढत आहे. हि वाढती जनसंख्या जगासाठी श्राप आहे कि वरदान ते ह्या लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी निबंध (Population Essay in Marathi) मध्ये सांगितले आहे.  

Population Essay in Marathi

लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी निबंध 

कसंख्यावाढीचा प्रश्‍न ही आजच्या भारताची एक प्रमुख व जटिल समस्या आहे. किंबहुना 'लोकसंख्यावाढ' हेच आजच्या सर्व समस्यांचे मूळ आहे. विसाव्या शतकात मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने अनेक रोगांवर मात केली. त्यामुळे माणसांची आयुर्मर्यादा वाढली. स्वाभाविकच लोकसंख्येत सतत वाढ झाली आणि मृत्युसंख्येत मात्र झपाट्याने घट झाली आहे. लोकसंख्यावाढीच्या या महापुरात संपूर्ण मानवजात लवकरच नष्ट होणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे माणसाला जमीन व पाणी पुरेनासे झाले आहे. एवढ्या प्रचंड लोकसंख्येला अन्न पुरवणे कठीण असल्यामुळे उपासमार घडते. निकृष्ट अन्न, आजारपण, रोगराई यांमुळे मानबी जीवन कष्टमय व दुःखी बनते.

लोकसंख्यावाढीचा हा प्रश्‍न साऱ्या जगाला भेडसावत असला, तरी भारतासारख्या विकसनशील देशांत या समस्ये गंभीर स्वरूप धारण केले आहे. जागतिक लोकसंख्येत दर दहा माणसांमागे एक भारतीय माणूस एवढी भारताची लोकसंख्या आहे. स्वातंत्र्योत्तर काळात, भारतात हरित क्रांती झाली. औद्योगिक क्षेत्रातही लक्षणीय प्रगती झाली. तरीपण अजूनही आमच्या देशातील सामान्य माणूस अप्रगत राहिला आहे. जनसामान्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन प्राथमिक गरजा देखील भागत नाहीत. वाढती लोकसंख्या हे दारिद्र्याला आमंत्रण असते. मग पोटार्थी माणसे शहराकडे धाव घेतात. खेडी ओस पडतात आणि शहरांत माणसांचा महापूर लोटतो. त्याचा परिणाम म्हणजे रोगराई वाढते. 

वाढती लोकसंख्या 'टंचाई'ला आपल्या सोबत घेऊन येते. आज शहरांतून शाळा, महाविद्यालये यांची संख्या वाढूनही शाळा-महाविद्यालयोत प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. शिकलेल्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. बेकारीचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. परिणामी गुन्हेगारी, व्यसनाधीनता यांना आमंत्रण मिळते.

या लोकसंख्यावाढीच्या समस्येवर प्रभावी उपाय तरी कोणता? केवळ कायद्याने लोकसंख्यावाढ थोपवता येणार नाही. त्यासाठी समाजप्रबोधनातून समाजपरिवर्तन होणे अगत्याचे आहे. लहान कुटुंबाचे महत्त्व सर्वांना उमगले पाहिजे. ' कुटुंब लहान, सुख महान' हे प्रत्येकाला मनोमनी उमगले की, सर्व समस्यांचे मूळ असलेला हा लोकसंख्यावाढीचा प्रश्‍न सुलभपणे सुटेल.

तुम्हाला हा लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी निबंध (Population Essay in Marathi) कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रां सोबत हा आर्टिकल share करा धन्यवाद.

Read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

अंधश्रद्धा मराठी निबंध

Save Water Essay in Marathi

शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध

My Mother Essay in Marathi

Post a Comment

Previous Post Next Post