प्रदूषण या जगातील एक वाढती समस्या आहे प्रदूषण एक समस्या निबंध आणि या विषया वर हा निबंध लिहला आहे. हा प्रदूषण वर  मराठी निबंध (Pollution Essay in Marathi) तुम्हाला नक्की पसंद पडेल.

Pollution Essay in Marathi

सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.


प्रदूषण निबंध

भारतीय माणूस व्यक्तिगत स्वच्छतेचा जेवढा विचार करतो, त्याच्या शतांशाने देखील तो सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. स्वतःच्या घरातील कचरा तो रस्त्यावर टाकतो. पानाच्या पिचकाऱ्या टाकतो वा निरुपयोगी कागदांचे कपटे कोठेही फेकून देतो. आपल्याकडील भाजीविक्रीच्या मंडया या कचऱ्याच्या ढिगांनी भरलेल्या दिसतात. हे सारे हवेच्या प्रदूषणाला आमंत्रण ठरते. त्यामुळे निसर्गाचा समतोल आपण बिघडवत आहोत , याची आम्हांला जाणीवच नसते.

कारखान्यांमुळे वायुप्रदूषण होते. तसेच, कारखान्यातील दूषित, मलीन पाण्यामुळे नद्या व समुद्र यांचे पाणी दूषित होते. समुद्रातील या दूषित पाण्यामुळे त्यातील मासे प्रचंड प्रमाणात मरतात. नद्यांतील पाणी दूषित झाल्यामुळे पिण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी ते निरुपयोगी ठरत आहे. पाणी दूषित झाल्यावर ते स्वच्छ करण्याचा आटापिटा करण्याऐवजी ते दूषित न होण्याची काळजी आपण घ्यायला नको का?

हवा, पाणी यांबरोबर ' ध्वनिप्रदूषण ' ही आज एक मोठी ज्वलंत समस्या ठरली आहे. विशेषत: शहरांतील गर्दी, गोंगाट यांमुळे ध्वनिप्रदूषण वाढत आहे. आपली उत्सवप्रियता फार अजब आहे. हे सारे उत्सव ध्वनिवर्धकांबाचून साजरे होत नाहीत. मोठमोठ्या आवाजात गाणी लावणे, बँड वाजवणे, अँटमबॉम्बसारखे मोठ्या आवाजाचे फटाके लावणे व शहरांतील वाहनांची वाढती संख्या यांमुळे ध्वनिप्रदूषण व हवेचे प्रदूषण होते. प्लास्टिकच्या पिशव्या व शहरात तयार होणारा घनकचरा ही एक वेगळीच डोकेदुखी झाली आहे.

पृथ्वीच्या भोवती असलेल्या वायूंच्या आवरणात ओझोन वायूचा एक थर आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी हा वायू आवश्यक आहे. पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. हा वायु ओझोनवर अतिक्रमण करीत आहे आणि या हल्ल्यात ओझोन नष्ट झाला, तर सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर येतील ब येथील जीवसृष्टी पार नष्ट होईल, अशी भीती वाटते.

या प्रदूषणांवर उपाय म्हणून समाजाने म्हणजेच सरकारने काही ठाम निर्णय घेतले पाहिजेत आणि व्यक्‍तिगत पातळीवर आपण प्रत्येक नागरिकाने आपल्या काही सवयी बदलल्या पाहिजेत. झाडे तोडणे हा सरकारने मनुष्यबधाइतकाच गंभीर गुन्हा मानला पाहिजे. कारखान्यांतून व वस्त्यांतून वाहून येणाऱ्या सांडपाण्यावर सक्तीने प्रक्रिया करायला लावले पाहिज. अशा तर्‍हेने प्राप्त झालेले पाणी बागेसाठी, शेतीसाठी वा गाड्या धुण्यासाठी वापरता येऊ शकते. प्लास्टिकच्या वापरावर कठोर बंधने आणली पाहिजेत. आपणही प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरण्याची सवय लावून घतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक वापरण्यास बंदीच घातली पाहिजे. आनंद व्यक्‍त करण्याच्या आपल्या पद्धतीतही आपण बदल केला पाहिजे.

ध्वनिवर्धकावर गाणी वाजवणे वा फटाके वाजवणे या प्रकारांनीच आनंद व्यक्‍त होता, हे आपण विसरले पाहिजे. शाळा-महाविद्यालयंनी जवळपासच्या उघड्याबोडक्या डोंगरांवर, मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे उपक्रम : राबवले पाहिजेत. हे सर्ब कठीण वाटले तरी आपण केले पाहिजे; कारण आता आपल्या अस्तित्वाचाच प्रश्‍न उभा राहिला आहे.


प्रदूषण निबंध PDF

प्रदूषण मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download




तुम्हाला प्रदूषण वर मराठी निबंध (Pollution Essay in Marathi) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

Read

पाणी वाचवा मराठी निबंध

झाडाचे महत्त्व मराठी निबंध 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

अंधश्रद्धा मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post