जाहिरातीचे सामर्थ्य मराठी निबंध | Jahirati Che Samarthya Essay In Marathi

तुम्हा सर्वान साठी जाहिरातीचे सामर्थ्य मराठी निबंध लिहिला आहे (Jahirati Che Samarthya Essay In Marathi). या निबंध मध्ये जाहिराती चे सामर्थ्य व्यक्त केले आहे. तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.

jahiratiche samarthya marathi nibandh

जाहिरातीचे सामर्थ्य मराठी निबंध 

सध्या जाहिरातींनी हे जग झपाटलेले आहे. वर्तमानपत्रात जाहिरात, रस्त्यात जाहिरात, टी. व्ही.वर जाहिरात, बातम्यांत जाहिरात... किती विविध प्रकारे जाहिराती आपल्या कानांवर व डोळ्यांवर आदळत असतात. मानवी गरजांची व मानवी स्वभावाची मर्मस्थाने अचूक हेरून या विविध जाहिराती तयार केल्या जातात.

जाहिरात ही आता आपल्या नित्याच्या परिचयाची झाली आहे. नभोवाणी, दूरचित्रवाणी इत्यादी प्रसारमाध्यमातून ती घराघरांतून आपणाला सोबत करीत असते. आता अशी एकही जागा दाखवता येणार नाही, जिथे जाहिरातीने शिरकाव केलेला नाही ! ऑलिम्पिकचे मैदान असो, विशाल आकाशाचे प्रांगण असो वा गर्दीने गजबजलेला रहदारीचा रस्ता असो, सर्वत्र हिचे लक्षवेधी अस्तित्व आहेच जाहिरातीचे कार्यक्षेत्र जसे अफाट आहे, तशी तिची रूपेही अनंत आहेत. तिला दृक-श्राव्य शक्तीची जोड मिळाल्याने ती अधिक प्रभावी ठरली आहे. या जाहिरातीचेही एक शास्त्र आहे. अनेकविध शास्त्रांच्या माध्यमांतून ही कला विकसित होते.

जाहिरातीच्या कलेला भक्‍कम आधार आहे तो मानसशास्त्राचा. एखादी गोष्ट पुनःपुन्हा ऐकवली की ती माणसाला खरी वाटू लागते, हे जाणून विविध प्रसारमाध्यमांतून तीच तीच जाहिरात सतत झळकते आणि मग सर्वसामान्य ग्राहकाला भुरळ पडते. मानवी जीवनातील प्रत्येक कार्यक्षेत्र जाहिरातीने व्यापले आहे. विविध भेटवस्तूंचे प्रलोभन, आवडत्या अभिनेत्यांच्य नावांचा उपयोग आणि जीवनातील अवघड क्षण यांच्या मनोज्ञ मिलाफातून जाहिरात अवतरते आणि ग्राहकाचे मन जिंकते.

जाहिरात ही अनेक 'कलांची कला' आहे. आजच्या या जाहिरातीच्या कलेत चित्रकला, अभिनयकला, लेखनकला, ॥याचित्रकला यांबरोबरच संगीतकलेलाही स्थान लाभले आहे. दूरचित्रवाणी व नभोवाणी यांदूवारा या जाहिराती गाण्यांसह अवतरतात. जाहिरातीत स्वतःला 'मॉडेल' म्हणून सादर करण्याचा व्यवसाय आज पैसा व प्रतिष्ठा दोन्हीही मिळवून देतो. सरस्वती आणि लक्ष्मी या दोघींचा समन्वय जाहिरातीत साधला जातो.

आज जाहिरातीचा प्रभाव एवढा वाढला आहे कौ, जाहिरात नसेल, तर आपले एक पानही हलणार नाही. जाहिरात नसेल, तर आपल्याला वस्तूंची माहिती कशी मिळेल ? कोणती वस्तू कुठे मिळते, हे कसे कळेल? जाहिरातीविना वस्तूंची खरेदीविक्रीच अशक्य होईल. जाहिरात नसेल, तर मनोरंजनाचे कोणकोणते कार्यक्रम कठे चालू आहेत, हे कळणार नाही. कलावंत, निवडणूक लढवणारे नेते इत्यादींनाही स्वतःची जाहिरात करावी लागते. खरे सांगायचे तर, जाहिरातीविना आज जागतिक व्यवहारही अशक्य होऊन बसले आहेत 

Read

माझी सहल मराठी निबंध

भ्रष्टाचार वर मराठी निबंध

भ्रष्टाचार वर मराठी निबंध

मी मुलगी बोलतेय मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post