तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध (autobiography of statue essay in marathi), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.

eka putlyache manogat nibandh

या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "एका पुतळ्याचे गाऱ्हाणे" किंवा "एका पुतळ्या ची कैफियत" किंवा "एका पुतळ्याचे आत्मवृत्त" मराठी निबंध.


एका पुतळयाचे मनोगत निबंध

राजू बागेत गेला. बसण्यासाठी जागा शोधत तो एका पुतळ्याजवळ आला. त्याच्या 'चौथऱ्याला टेकून बसला आणि पुस्तक काढून वाचू लागला. तेवढ्यात त्याला उसासे टाकत बोलणारा आवाज ऐकू आला. तो लक्षपूर्वक ऐकू लागला, तेव्हा त्याच्या लक्षात आले कौ, तो पुतळाच बोलत होता...

राजू, मला खरोखर खूप दु:ख झाले रे ! इथे इतकेजण येतात, हसतात, खेळतात, बागडतात, गप्पाटप्पा करतात; पण कोणीही माझ्याकडे लक्ष देत नाही. तू आलास. मला वाटले... तू विद्यार्थी आहेस, अभ्यासू आहेत. निदान कुतूहलाने तरी माझ्याकडे बघशील. 'पण काय... तूसुद्धा दुंकून पाहिले नाहीस ! मला किती वेदना झाल्या म्हणून सांगू !

राजू, अरे, कशाला हे पुतळे उभारता तुम्ही मानव ? तुम्हांला आमची जरासुद॒धा फिकौर नसते. इथे बागेत येणारा प्रत्येकजण बसण्यापूर्वी रुमालाने बाक स्वच्छ करतो आणि मगच बसतो. परंतु माझ्या स्वच्छतेकडे कोणाचेही लक्ष नसते. पाहा बरं, माझ्या अंगावर किती धूळ आहे ! कावळ्या-चिमण्यांनी किती घाण केली आहे ! काय ही माझी अवस्था ! मी हलू शकत नाही, बोलू शकत नाही, म्हणून का हे असं?

खरं सांगायचं तर ही विटंबना माझी नव्हेच. ज्याच्या स्मरणार्थ हा पुतळा तुम्ही उभारला आहे ना, त्या थोर मानवाची ही विटंबना आहे. हा पुतळा उभारला, तेव्हा केवढा जंगी सोहळा पार पडला ! मोठमोठ्या नेत्यांनी तोंड भरून त्या महापुरुषाची स्तुती गायली ! किती हार ! किती तुरे ! तेव्हा तर माझा ऊर भरून आला होता ! मला घडवणाऱ्या त्या शिल्पकाराने महिनोन्‌महिने कष्ट घेतले. आपले सर्व कलासामर्थ्य त्याने पणाला लावले आणि मला घडवले. त्या महापुरुषाच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याची कल्पना निघाली तेव्हापासून ते अनावरणाचा सोहळा पार पडेपर्यंत किती उत्साह होता प्रत्येकात ! मला तर धन्य धन्य वाटत होते !

पण... पण... जसजसे दिवस जाऊ लागले, तसतशी मला निराशा येऊ लागली. लोक मला विसरलेच; पण ज्या महापुरुषाच्या स्मरणार्थ मला उभारले त्यालाही विसरले ! त्या महापुरुषाने या समाजासाठी किती खस्ता खाल्ल्या ! आपल्या वैयवितक, कौटुंबिक सुखावर निखारा ठेवून त्याने आपले जीवन सर्वस्वाने समाजाला अर्पण केले. पण तुम्ही किती कृतघ्न ! त्याचे कार्य तुम्ही विसरलात. अवतीभोवती पाहा. स्त्रियांवर, गोरगरिबांवर अत्याचार चालूच आहेत; किंबहुना वाढले आहेत. 

जातिधर्मांमध्ये विद्वेष पसरला आहे. काही समाजकंटक तर माझी मुदूदाम विटंबना करतात आणि समाजासमाजात दवेषाचा आगडोंब उसळवतात; त्यामुळे मग रक्ताचे सडे पडतात ! म्हणजे त्या महापुरुषाच्या शिकवणीविरुद्‌ध तुम्ही वागता आहात. हा त्याचा पराभवच आहे. मग कशाला हवेत हे पुतळे ? खरं तर त्याने केलेल्या कार्याचा एक-सहस्रांश भाग जरी तुम्ही आचरणात आणलात, तरी त्याचे जीवित सफल झाले, असे होईल. तेव्हाच माझ्या इथे उभे राहण्याला अर्थ येईल. पण छे... !

म्हणून सांगतो, राजू, तुम्ही हे पुतळे उभारू नका. ज्यांच्या स्मरणार्थ हे पुतळे उभारले जातात, त्या महापुरुषांच्या शिकवणीतील एक अल्पसा भाग जरी आचरणात आणलात, तरी पुरेसे आहे. तेच त्यांचे स्मारक होईल.


एका पुतळयाचे मनोगत निबंध PDF

एका पुतळ्याचे मनोगत निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download

Read

महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत

वारकऱ्याचे मनोगत

युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकाचे मनोगत

खुर्ची ची आत्मकथा

एका जीर्ण पुस्तकाची कैफियत

Post a Comment

Previous Post Next Post