एका निर्वासिताची कहाणी निबंध मराठी | Autobiography Of Refugee Essay in Marathi

तुम्हा सर्वान साठी एका निर्वासिताची कहाणी मराठी निबंध लिहिला आहे (Eka nirvasitachi kahani nibandh marathi). या निबंध मध्ये एका निर्वासित ने आपली आत्मकथा व्यक्त केली आहे.

autobiography of refugee essay in marathi

या निबंध चे शीर्षक "मी शरणार्थी बोलतोय" किंवा "एका निर्वासितांचे मनोगत" किंवा "एका शरणार्थी चे मनोगत" असे पण असू शकते. 

एका निर्वासिताची कहाणी निबंध मराठी 

"बंधूंनो , मी एक निर्वासित आहे. परंतु पाकिस्तानातून वा बांगला देशातून आलेला निर्वासित नाही. या स्वतंत्र भारताचा नागरिक असूनही मी निर्वासित बनलो आहे. या देशाचा अभिमान बाळगणारा हा नागरिक याच देशात निर्वासिताचे जीवन जगत आहे.

"खरे तर आम्ही साधे गरीब शेतकरी. या शेतात, या जमिनीत आमच्या सर्व पिढ्या जन्मल्या आणि येथेच, याच मातीत विलीन झाल्या. ही माती हेच आमचे सर्वस्व होते. गावातून वाहणार्‍या छोट्याशा नदीच्या आश्रयाने गावातील तीस-चाळीस कुटुंबे सुखाने राहत होती. या नदीच्या पाण्याने आमची शेती पिकवली. या नदीमुळे आमच्या बायांना पाण्याचे हंडे घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागली नाही. गरिबी होती; पण हलाखी नव्हती.

“ अशा परिस्थितीत एके दिवशी आमच्यावर आभाळच कोसळले. शेजारच्या गावातील नदीवर मोठे धरण बांधण्याचे निश्‍चित झाल्याची बातमी आली. आमचे गाव धरणाच्या पाण्याखाली जाणार होते. आम्ही हादरून गेलो ! आमचे काय ? आम्ही

"काय करायचे? कोठे जायचे ?... कोणाजवळ उत्तर नव्हते. आम्ही अनेकांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण गरिबाला वाली कोण ? दुसर्‍या गावात सरकार आम्हांला जमीन, घर देणार, असे सांगण्यात येऊ लागले. पण दुसरीकडे म्हणजे कुठे ? ती जमीन कशी असेल ? कोणती पिके येतील ? पाण्याची सोय असेल का ? शेजारीपाजारी कसे असतील ? मुलांच्या शाळेची सोय कशी होईल ? अशा शंकांनी मन व्याकूळ होत होते. मुळापासून उपटून फेकलेल्या झाडासारखी आमची अवस्था झाली होती.

"काही दिवसांतच तेथे राजकारणी , नेतेमंडळी, सरकारी अधिकारी वगैरेंची ये-जा सुरू झाली. आमच्या जीवाची घालमेल सुरू झाली. झेंडे घेऊन बाहेरचे काही लोक आले. त्यांनी आमच्या बाजूने सभा घ्यायला सुरुवात केली. लढा सुरू झाला. धरणाच्या विरोधात धरणे धरले गेले. खूप हाणामारी झाली. आम्ही हतबल झालो. सगळेजण येऊन आम्हांलाच समजावत होते... आम्हांला आश्वासन देत होते ... तुमचे पुनर्वसन होईल... तुम्हांला घर मिळेल... चिंता करू नका ! नंतर आम्हांला थोडे थोडे पैसे दिले. तात्पुरती सोय करायला सांगितले. धरण पूर्ण होताच सगळ्यांची सोय करण्याचे आश्‍वासन दिले गेले.

"बंधूंनो, धरण पूर्ण होऊन आज चार वर्षे पूर्ण झाली; पण आमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. आम्ही अनेकांपुढे हात जोडले; कित्येकांचे पाय धरले; रडलो; पण कोणाला दया आली नाही. मोठ्या कष्टाने जंमीन कसून पोट भरणारे आम्ही उकिरड्यावर फेकले गेलो आहोत. स्वत:च्या मालकीची जमीन होती; तरीही भूमिहीन झालो. आमचे फकत प्राण वाचले आहेत. घाण, गटार, दलदल, दुर्गंधी, गलिच्छ गदी अशा वातावरणात राहत आहोत. मुंबईतील एका गलिच्छ झोपडपट्टीत कसेबसे जगत आहोत. पण करणार काय ? आमच्याच देशात आम्ही निर्वासित बनलो आहोत !''

तर हा होता एका निर्वासिताची कहाणी मराठी निबंध (Autobiography Of Refugee Essay in Marathi) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रां सोबत share करा

Read

हमालाचे आत्मकथन मराठी निबंध

सागराचे मनोगत मराठी निबंध

वादळग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

भाजीविक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post