मानव व वैज्ञानिक प्रगती मराठी निबंध | Manav Ani Vaigyanik Pragati Nibandh

तुम्हा सर्वान मानव व वैज्ञानिक प्रगती मराठी निबंध लिहिला (Manav Ani Vaigyanik Pragati Marathi Nibandh) आहे. या निबंध मध्ये बिज्ञानामुळे झालेली प्रगती या विषय वर चर्चा केली आहे.

Manav Ani Vaigyanik Pragati Nibandh

या निबंध चे शीर्षक "बिज्ञानामुळे झालेली प्रगती" किंवा "मानव व वैज्ञानिक प्रगती" पण असू शकते हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. 

मानव व वैज्ञानिक प्रगती मराठी निबंध

बिज्ञानामुळे झालेली प्रगती किंवा मानव व वैज्ञानिक प्रगती

विज्ञानाने केलेले चमत्कार किती विलक्षण व अद्भुतरम्य आहेत ! आपल्या भोवतालचा अज्ञानाचा अंधार विज्ञानाच्या प्रकाशाने दूर झाला आहे. विजेच्या साहाय्याने माणसाने आपले मर्यादित सामर्थ्य अनेक पटींनी वाढवले आहे. आजच्या गृहिणीजवळ स्वयंपाकघरात विजेवर चालणारी अनेक उपकरणे आहेत. ही उपकरणे. गृहिणींची अनेक कामे त्वरित आणि तत्परतेने करतात. विजेच्या साहाय्याने चालणारा पंखा आणि कूलर उन्हाळा सुसह्य करतात; तर विजेच्या शेगडीमुळे थंडीचा कडाकाही सुखावह होतो. भ्रमणध्वनीमुळे तर आता जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी कधीही कोणीही संपर्क साधू शकतो !

माणसांच्या व्यक्‍तिगत जीवनाप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातही विज्ञानाने फार मोठी क्रांती केली आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे अत्याधुनिक छपाई यंत्रांवर दैनिक वृत्तपत्रांच्या लाखो प्रती काही तासांतच छापून वितरणासाठी तयार होतात. असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टी विज्ञानाने माणसाला सहजसाध्य करून दिल्या आहेत. आज माणसाने विज्ञानाच्या साहाय्याने भूमीप्रमाणेच सागरावर आणि अंतरिक्षावरही स्वामित्व मिळवले आहे. तो आता सागराच्या उदरातही प्रवेश करू शकतो. अंतराळयानांच्या साहाय्याने माणसाने वसुधेची परिक्रमा केली आहे, चंद्रावर पाऊल टाकले आहे आणि आता तो अन्य ग्रहांवरही पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात आहे.

विज्ञानाच्या साहाय्याने वैद्यकीय क्षेत्रातही मानवाने फार मोठी झेप घेतली आहे. मानवाचे निरुपयोगी झालेले अवयव शस्त्रक्रिया करून बदलता येतात. कुरूप व्यक्‍तीला सुंदर बनवले जाते, तर अपंगाचे व्यंग घालवून त्याला जीवनात यशस्वी वाटचाल करण्याची प्रेरणा दिली जाते. ही सारी विज्ञानाची किमया आहे. रक्‍तदानाच्या व नेत्रदानाच्या पुढे जाऊन गात्रदानही करता येते. तसेच, दुर्बिणीतून शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत.

विज्ञानाच्या मदतीने माणसाने भूगोलावरही मात केली आहे. एके काळी वाळवंटी, ओसाड असलेल्या प्रदेशांत आता फुलबागा बहरत आहेत. वसुंधरेची उत्पादनक्षमता वाढवून हरित क्रांती साधली जात आहे. माणसाने विज्ञानाच्या मदतीने आपल्या मनोरंजनाच्या साधनांतही भर टाकली आहे. संगणकाच्या शोधाने तर माणसाने फार मोठे प्रभावी सामर्थ्य संपादन केले आहे; अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्‍य केल्या आहेत. क्लोनच्या प्रयोगातून माणूस जणू विश्‍वनिर्मितीलाच आव्हान देत आहे.

मोबाईलमुळे तर माणसाने कल्पनाही केली नसेल, इतक्या सुविधा मिळवल्या आहेत. विज्ञानाचे हे चमत्कार जेवढे सुखद आहेत, तितकेच विज्ञानाने माणसाच्या विनाशक सामर्थ्यात केलेली वाढ भयावह आहे. एका अपणुबॉम्बने हिरोशिमातील हजारोंचे जीवन उद्‌ध्वस्त केले. 

असे आहेत हे विज्ञानाचे चमत्कार - अंगावर आनंदाचे रोमांच फुलवणारे तसेच भीतीचा काटा उभा करणारे!

तर हा होता मानव व वैज्ञानिक प्रगती मराठी निबंध (Manav Ani Vaigyanik Pragati Nibandh) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

मी मुलगी बोलतेय मराठी निबंध

संगणक चे महत्त्व मराठी निबंध

विज्ञान आणि मानव मराठी निबंध

दूरदर्शन शाप की बरदान मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post