100+ नवरीचे उखाणे | Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane for Bride
खाली नवरी साठी १०० पेक्ष्या जास्त मराठी उखाणे (marathi ukhane for female) लिहिले आहे जे तुम्हाला नक्की आवडणार, हे सर्व उखाणे एकदम नवीन आहे आणि नवरी साठी खास बनवले गेले आहेत. जर तुम्हाला यांच्यात कोणते उखाणे ऍड करायचे असेल तर तुम्ही खाली कंमेंट करू शकता. हे महिलांसाठी उखाणे तुम्हाला नक्की आवडेल.
100+ नवरीचे उखाणे | Marathi Ukhane for Female
मेंदी रंगते हाती, वीडा रंगतो ओठी,.......... रावांच नाव घेते तुमच्यासाठी
आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद , .........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!
...... लेक, झाले ....सुन् .......चे नाव घेते ग्रुह्प्रवेश करुन्.......
......-- रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन
अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले,
.... सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).
अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा
........--रावांच्या नावावर भरते लग्नचुडा
अजिंठा-वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी,
..... नी आणलीये सुगंधी वेणी.
अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
..........-- रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली
अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला अनमोल ग्रंथ गीता ,
..चे नाव घेऊन येते मी आता
अस्सल सोने चोविस कँरेट
.............- अन माझे झाले आज मँरेज
आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
..........-- रावांना घास देते गोड जिलेबीचा
आई वडील सोडताना, पाउल होतात कष्टी
.... रावांच्या संसारात करीन मे सुखाची सृष्टी
आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
..........-- रावांचा सहवास जन्मभर लाभावा
आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
..........--राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस
आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
..........-- राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा
आज आहे श्रावणी पोळा,
..... च्या जीवावर शृंगार केले सोळा.
आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,
....ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी
आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण
..... रावांचे नाव घेऊन बांधते मी कांकन
आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती,
....नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती
आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन ..........-- रावांच्या बरोबर
आम्र व्रीक्ष मोहर्ल्याने लागते घ्रीश्माची चाहूल
.......... रावांच नाव घेवून टाकते पुढच पौउल
आशीवार्दाची फुले वेचते वाकून
...चे नाव घेते तुमचा मान राखून
आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद
..........-- चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद
इंग्लीश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर
...... नाव घेते .... ची सिस्टर
उन्हाळ्या चे दिवस आले झाली लग्ने सुरु..
...रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु..!
उभी होते मळ्यात , नझर गेली ख्ळ्यात,
हजाराची कंठी ..........रावांच्या गळ्यात
एक दिवा दोन वाती
एक शिंपला दोन मोती
अशीच राहु दे माझी व सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,.......रावांची प्रेम
ज्योतीसौभाग्याचे काळे मणी घातले गळा,......
ओssम या शब्दात आहे दिव्य शक्ती ,
...रावांवर करते मी अमर प्रीती
कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!
कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद
कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
..........-- रावांचे नाव घेते माझ्या मनात
काचेच्या बशित बदामचा हलवा
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा
काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन
..........-रावान्च नाव घेते सर्वान्चा मान राखुन
कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित
कुरुंदाची सहन चंदनाचे खोड
..........रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड .
केले देते सोलून पेरू देते चोरून ,
..........रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विज्ञानचे धागेदोरे,
...........सह घेतले मी सप्तपदीचे फेरे
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखद चा घास
गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
..........-- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि
सुखि थेवा गजानना -- चि जोडि
गणेशा च्या पूजनाने उद्याची होईल सुरुवात..
गणेशाला स्मरून करू विघ्नावर मात .........._ रावांची साथ लाभली ... सून बनून आले
मी ह्या घरात …
गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,
..........चे नाव माझ्या ओठी यावे .
गिरजा शंकर सीता राम यांना गुरु करू ,
..........राव आपण दोघे संसारसागर तारू
गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास
गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज
..........-- रावांच्या बाळाची आज आहे मौंज
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
..........-- नाव घेते सोडा माझी वाट
ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
..........- नाव घेते सौभाग्य माझे
गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर
गृहिणी सजीव सखी प्रिय शिष्या मी होईन,
xxxchya मानस सरोवरी सहस्त्र कमळे फुलवीन
घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून ...च्या घराची बेल
चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा
... आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा
चंदनी पानात मुग्ध कळी हसली
..........रावांच्या प्रेमात मी नकळत फसली
चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल, ..........रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.
चांदीच्या ताटात पक्वानांची रास
..........-- रावांना देते लाडूचा घास
चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती
...रावाच नाव घेते ...च्या राती
चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,
..... च्या बरोबर केली सप्तपदी
चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
.......... रावां समवेत ओलांडते माप
जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
.... रावांच्या नावाकरिता एवढे का अडविले
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
......रावाच नाव घेते पत्नि या नात्याने.
जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने
..........- चे नाव घेते पत्नि या नात्याने.
जशी आकाशात चंद्राची कोर ..... पती मिळायला माझे नशीब थोर
जाईच्या वेलीला आलाय बहार,
..... ना घातला २७ फेब्रुवारीला हार
जाईजुईचा वेल पस्ररला दाट
...बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ
जागतिक शांतिचे प्रतिक आहे कबुतर,
.... च्या सह शांतीने संसार करण्या पुजिते मी गॉरीहर.
जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून नाव सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,............. चे घेते.
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.
जीवनात ही घडी अशीच राहू दे
..........-- रावांचे प्रीतफुल असेच हसु दे
जीवाभावाची ओवी आळवीन संसाराच्या प्रातःकाली,
....च्या नावावर ठरले मी आज भाग्यशाली
जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी
....रावाची आहे मी अर्धागीनी
जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास
..रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो .......... - .......... ची जोडी
तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले
आणि ...........नाथा मी तुज़ीच जाहले
तु्ळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद
माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवात
....रावान्चे नाव घेउन करते संसाराला सूरूवात
दान दागिन्यांनपेक्षा शब्द हवा गोड ,
..........रावांच्या संसाराला..........ची जोड .
दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
..........-- रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र
दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार
दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार ह्या सोहोळ्याला लागली तुम्हा सर्वांची
उपस्थिती …………….रावांच्या साथीने मानते तुम्हा सर्वांचे आभार
देवघ्ररात तेवतो नंदादिप समाधानाचा .......... च नाव घेते आशिर्वाद मागते अखंङ सौभाग्याचा
दैन्ंदिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्त्व
…..रावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्त्व
दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या रेशिमगाठी, ........ चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
दोन वाति एक ज्योति,दोन शिम्पले एक मोति ..........-रावाचि मि सौभाग्यवति.
दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात ....साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात्
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान ...चे नाव घेते राखते तुमचा मान
नजरेला नजर मिळवताना भाव प्रीतीचे उमगले,
…………..च्या दृष्टीने मी क्षणात मोहून गेले .
नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा
...रावांसह संसार करेन तुमच्या आशीर्वादाने सुखाचा
नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी
तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ...... च्या अंगणी
नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती,
...... ची झाले आज मी सॉभाग्यवती.
नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
..........-- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर
नान्दा सौख्य्भरे दिला सगल्यानि आशिरवाद्,
.....चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
..........तर आहेत माझ्या डाव्या खिशात
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
..........च नाव आहे लाख रुपये तोळा
नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू
निरभ्र आकाशात चंद्राचि कोर
.....च नाव घेते भाग्य माझे थोर्
निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी ..........-- स वाटे ..........-- रावांचे नाव घ्यावे
निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे;
सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,.............रावांच्या संगतिने उजलेल् माझे जिवन
सारे
नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
..........-- चे नाव घेण्यास आजच केली सुरवात.
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
..............................- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते
पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून
..........-- राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन
पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप
..........-- रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज
परसात अंगण अंगणात तुळस
..........-- नाव घ्यायचा मला नाही आळस
परस्परांचे झालो सोबती, सुख-दुःखाचे भागीदार
.... झालो जन्मोजन्मीचे जोडीदार
पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
मी पोरगी साजूक तुपातली
.........._ रावांचा लागलाय नाद।
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती
पायांतल्या जोडव्यात, माहेरची स्मृति
...... रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती
पित्याचे कर्तव्यसंपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
.... रावांचे सहकार्य लाभो, माझ्या भावी जीवनात
पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित
जलु नका लोकहो ... राव आहे आय़् टीत
प्रथमभेट ती नजरांची दोन ध्रुवांच्या मिलनाची,
...मुळे त्रुप्त (धुंद)जाहले,अंतरी फुले फुलली प्रीतीची
प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण
..........रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण
प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले ..........-- रावांच्या चरणी
फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
...सह चालले सातपावलांवरी
फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती,
..........ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती
फुलात फुल जाईचे फुल
..........-- रावांनी घातली मला भूल
फुलाला असावा सुगंध स्त्रीला असावा सदगुण.................--राव हेच माझे आभूषण
फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे.
बकुळीचा बकुलगंध , मृतात्कींचा मृदगंध ,
..........ची जीवनसाथ हा रेशमी ऋणानुबंध .
बन्सि कि धुन पे नाचती है गन्गन
.... नम से बनि मै सुहगन
बारिक मणी घरभर पसरले,.......... साठि माहेर विसरले
भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ
...रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ
भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर
रावांच्या मिठित विसरते मी माहेर
भाजीत भाजी मेथीची,
......माझ्या प्रितीची.
भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान,
...... चे ठेवीन सदोदित मान.
भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता
सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
.............चे नाव घेते तुमच्या
आघ्रहाकरिता
मंगल झाली प्रभात, विहंग उडाले गात
...रावांच्या हाती दिला हात करायला
जन्मोजन्मीची साथ
Post a Comment