marathi laghu katha

खाली तुमच्या साठी मराठी लघु कथा (marathi laghu katha) लिहिल्या आहे. तुम्हाला ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या लघु कथा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल.


मराठी लघु कथा - Marathi Laghu Katha

1. राजू आणि राक्षस

एक राक्षस होता. तो गावकर्यांना फार त्रास देत होता. राजू नावाचा एक पोरसवदा मेंढपाळ त्या गावात आपल्या नातलगांना भेटायला गेला. त्याला त्या राक्षसा बद्दल कळले. त्याने विचारले “तुम्ही त्या राक्षसाला मारत का नाही, त्याचा सामना का नाही करत? घाबरलेल्या गावकर्यांनी उत्तर दिले “या अजस्र दानवाचा वाढ कोण आणि कसा करणार, त्याच्याशी सामना म्हणजे प्रत्यक्ष मृत्युलाच आव्हान. 

तेव्हा राजू म्हणाला त्याच्या प्रचंड आकारामुळे त्याचा सामना अशक्य असे मानणे चुकीचे आहे उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची शक्यता कमी. पुढे राजूने पुढाकार घेऊन त्या राक्षसाचा वध आपल्या गोफणीच्या सहाय्याने केला. मित्रांनो संकट मोठी असोत वा छोटी त्याच्या कडे बघण्याचा आणि सामना करण्याचा आपला दृष्टीकोन हा सकारात्मक हवा.

संस्कार कथा मराठीत  | Sanskar Katha in Marathi

2. चिंच

एके दिवशी एका कावळा चिंचेच्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याने टाकलेल्या विष्टेतून बाभळीच्या बिया चिंचेच्या झाडाखाली पडल्या. त्यातील एक बी उगवून बाभळीचे एक झाड हळूहळू वाढू लागले. त्याने त्या चिंचेच्या झाडाशी दोस्ती केली. त्या दोस्तीचा गैरफायदा घेवून ते चिंचेच्या झाडाचे मन इतरांच्या विषयी कलुषित करू लागले. ते म्हणायचे, ' अरे काय तू, कोणीही येते आणि तुझ्या सावलीत विसावा घेते. 

 तुझ्या चिंचा तुला न विचारता घेवून जाते. त्या माणसांची पोरे तर तुला दगडे मारतात.' 'मग काय बिघडले?' चिंचेचे झाड म्हणाले, 'माझ्या सावलीत जे विसावा घेतात, बसतात, त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात. त्यातील चिंचोके कुठे तरी उगवतात आणि माझा वंश वाढतो. आता माणसांची पोरे मला दगडे मारतात, पण त्यांचा हेतू मला दगडे मारणे हा नसून चिंचा पाडणे हा असतो. त्यांनी चिंचा नेल्या तर पुढे माझाच वंश वाढणार असतो. शिवाय त्यांनी मारलेली दगडे मला फुलासारखी वाटतात'.

इसापनीती कथा | Isapniti Stories in Marathi

3. भस्मासुर

एका धिप्पाड व शक्तीमान राक्षसानं भगवान शंकराची तपश्चर्या सुरु केली. खडतर तपश्चर्येनंतर शंकर त्या राक्षसासमोर प्रकट झाले व म्हणाले, “हे राक्षसा ! तू केलेल्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे तेव्हा तू कोणताही एक वर माग. मी तो वर तुला देइन.” यावर तो दुष्ट वृत्तीचा राक्षस म्हणाला, “हे शंकरा ! मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन, तो भस्म होऊन जाईल, अशी सिध्दी तू मला दे. मला दुसरे काही नको.” या राक्षसाला आपण हा वर दिला, तर तो काय अनर्थ करील, या गोष्टीचा विचार न करता शंकरांनी 'तथाऽस्तु' म्हणून त्याला तो वर दिला. परंतु त्या वरामुळं तो राक्षस अधिक उन्मत्त आणि क्रूर बनला, जो दिसेल त्याला जो नको असेल, त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचे भस्म करु लागला. 

जग त्याला 'भस्मासूर' या नावानं ओळखू लागलं व त्याचं नुसतं नाव निघालं तरी चळचळा कापू लागलं. कहर म्हणजे एकदा भस्मासूर प्रत्यक्ष वर देणाऱ्या शंकरांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचं भस्म करण्य़ासाठी त्यांचा पाठलाग करु लागला, तेव्हा शंकर मदत मागण्यासाठी विष्णूंकडे गेले. सरळ द्वंद्वयुध्दात या भस्मासुरांपुढं आपला निभाव लागेलच अशी खात्री न वाटल्यानं भगवान विष्णूंनी अत्यंत सुंदर अशा मोहिनी अप्सरेचं रुप घेतलं आणि भस्मासूरासमोर सुंदर अंगविक्षेपांसह नृत्य करायला सुरुवात केली. मोहिनींच ते अलौकिक रुप पाहून बेभान झालेला भस्मासूर, ती नाचेल तसा नाचू लागला व ती हातवारे करी तसे हातवारे करु लागला. 

आपल्यावर मोहित झालेला भस्मासूर आता पूर्णपणे देहभान हरपून गेला असल्याचे पाहून, मोहिनीचं रुप घेतलेल्या विष्णूंनी आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला; त्याबरोबर भस्मासुरानेही मोहिनीचे अनुकरण केले. आणि आपला हात आपल्या मस्तकावर ठेवून, स्वत:च स्वत:चे भस्म करुन घेतले.

महाभारत कथा मराठीत | Mahabharat Stories in Marathi

4. टीप

एकदा एक १० वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला. तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं, "आईस्क्रीम कोन केवढ्याला आहे?"" वेटर म्हणाला, ""५ रुपये"". तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला. नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला, असं विचारलं. वेटरने ञासिकपणे उत्तर दिलं, ""४ रूपये."" तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या. 

त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिलं आणि तो गेला. वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं. कपाजवळ १रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता. आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता. त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती. स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता. आपण हि असा विचार करतो का? 

लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids

5. गुंता

एका प्रवासी बोटीला समुद्रात अपघात होतो. त्यामध्ये एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात. त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो!पत्नी बुडत्या बोटी वर थांबते! बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते! शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, ""पत्नी पतीला काय म्हणाली असेल? बहुतेक विद्यार्थी म्हणतात, मला तुम्ही धोका दिलात! मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली!!"" एक मुलगा मात्र गप्पच असतो. 

शिक्षक त्याला विचारतात, ""अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"" तो मुलगा म्हणतो, ""गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल,मुलांना सांभाळा!"" शिक्षक चकित होउन विचारतात, ""तुला ही गोष्ट माहीत आहे का?"" तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो,"" नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"" ""तुझे उत्तर बरोबर आहे!"" शिक्षक हलकेच म्हणाले. बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले. बऱ्याच वर्षानंतर, वार्धक्याने त्या इसमाला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते. 

 त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते! त्या मुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्यावाचून दूसरा पर्यायच नसतो! त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, ""तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती! पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"" ही गोष्ट आपल्याला सांगते की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही!

अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

6. व्यसन

एका इसमाला सिगारेटचे भयंकर व्यसन होते. दिवसातून कमीतकमी १०-१२ सिगारेटी तो पीत असे. त्याचे लग्न झाले होते मुल बाळ घरात होती. अनेकदा त्याच्या बायकोने त्याचे व्यसन सोडवण्याचे प्रयत्न केले पण निरर्थक ठरले. त्याला स्वतःला सुधा सोडायची इच्छा अनेकदा होई पण तो हतबल आणि निराश होई. 

एकदा एक जुना मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी आला. त्याला पाहून तो खूप आनंदित झाला. दोघे गप्पा मारीत बसले. मित्राने विचारले “तुझे सिगारेट चे व्यसन बंद झाले असेल आता?” पण त्याने पाकीट बाहेर काढून एक सिगारेट समोर नाचवत म्हणाला, “मी माप सोडायला तयार आहे मित्रा, पण हि मला सोडतच नाही ना...” असे म्हणून निराश हसू लागला. 

आपल्या मित्राची निराशा पाहून त्याने काही विचार केला आणि त्याच्या कडून एक वही आणि पेन मागवला. मी तुला काही सल्ला किव्वा उपदेश असे काहीच देणार नाही फक्त आपण आज इथे तुज्या व्यसनाची गोळाबेरीज करून पाहूया. सरासरी दिवसाला लागणाऱ्या सिगारेटी – ६ सरासरी सिगारेट ची किंमत – ७ ६ x ७ = ४२ वर्ष भरात सिगारेटवर होणारा खर्च ४२ x ३६५ = १५,३३० गेली पंधरा वर्ष झालेला खर्च १५,३३० x १५ = २,२९,९५० रुपये समोर झालेली आकडेवारी बघून तो थक्क झाला. त्याने या गोष्टीचा विचार कधी केलाच नव्हता. 

“तू लाखो रुपये तुझ्या निरर्थक व्यसनावर उडविलेस कदाचित पुढेही असाच उडवीत राहशील. पण कधी विचार केलास का या लाखो रुपया मधील छोटासा वाटा जर तू एखाद्या गरिबाला दिला असता तर त्या सिगारेट पेक्षा कैक अधिक समाधान तुला मिळाले असते. पोटात भुकेची आग असूनही अन्नाचा कण ना मिळणार्याला जर कधी मदत केली असतीस तर... कधी अनाथांश्रमात मायेने मुलांना खाऊ दिला असतास तर.... वृद्धाश्रमात घटिका मोजत बसलेल्या गरीब लाचार वृद्धांना भेट म्हणून शाल दिली असतीस तर... या आणि अशा कित्येक ‘तर’ ने जर तुज्या मनाला टोचणी लावत असतील तर...” तुम्हालाही असे कोणते व्यसन आहे तर... उचला क्याल्कूलेटर.

तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi

7. फुगा

एक फुगेवाला होता. तो जत्रेत, शाळेच्या आणि मैदानाच्या आवारात फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्या कडे लाल, पिवळे, हिरवे, निळे अशे विविध प्रकारचे फुगे असायचे. विक्री कमी होते असे दिसले कि तो फुग्यात हेलियम वायू भरून हवेत सोडून देई. उंच हवेत उडणारा फुगा पाहून मुले फुगे घ्यायला त्याच्याकडे गर्दी करत आणि भरपूर फुग्यांचा खप होत असे. 

एकदा असेच फुगे विकत असताना एक छोटी मुलगी त्याच्या जवळ आली आणि तिने विचारले, “काका, हा गुलाबी रंगाचा फुगाहि असाच आकाशात उडेल का?” तिच्या जिद्नासेच त्याला कौतुक वाटल आणि प्रेमाने त्याने उत्तर दिले, “बेटा, फुगा त्याच्या रंगामुळे उंच आकाशात उडत नाही तर त्याच्या आत जे आहे त्यामुळे तो उडतो.” हीच गोष्ट आपल्या प्रत्याकाला लागू होते. आपल्या अंतरंगातील गुणधर्मामुळे माणूस यश समृद्धी प्राप्त करून इच्छित उंचीवर जाऊ शकतो. आपला दृष्टीकोन आणि मनोवृत्ती याला आपण आपले अंतरंग म्हणू शकतो.

मराठी प्रेम कथा | Love Stories in Marathi

8. डोंगर

तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने.... रात्रीच गावाची सीमा ओलांडली. 

अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. 

 बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला.... इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. 'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. 

त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.'' म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?'' ''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' 

तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.'' म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

भुतांच्या गोष्टी  | Horror Stories in Marathi

9. आई

कोल्हापूर गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे रंगराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले, 

 रंगराव :- तू का रडत आहेस बाळ ? 

मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत. 

रंगराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो  ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो. 

मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ). 

रंगराव :- कुठे सोडू तुला ? मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे. 

 रंगराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे !!! 

मुलगी :- काका, "" जिथे आई तोच स्वर्ग "" ......... नव्हे का ?? 

रंगरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला  पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी रंगराव स्वताहा कोल्हापूरला आपल्या आईला भेटावयास गेले !!! तात्पर्य :- हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जिने स्पर्श केला ती भावनाच तात्पर्य होय.

छान छान गोष्टी मराठीत | Chan Chan Goshti Marathi with Morals

10. मरण

मरण :- चल .... आज तुझा नंबर आहे !! 

मुलगा :- काय ?? ... पण... पण मी अजून तयार नाही मरायला. 

मरण :- लिस्ट मध्ये पुढचे नाव तुझेच आहे, त्याला मी काही नाही करू शकत !! 

मुलगा :- ओके .... आता तू आलास तर येणा घरात, बस, मी तुला खायला आणतो काहीतरी. ( असे म्हणून मुलाने झोपेचे औषध घातलेल अन्न त्याला खायला दिले .... त्यावर मरण झोपून गेल. पुढे मुलाने हळूच त्या लिस्ट मधील आपले पहिले नाव काढले व शेवटी लिहिले. त्यावर मरण जागे झाल.) 

मरण :- तू माझ्याशी चांगला वागलास म्हणून मी आता लिस्टच्या शेवटापासून सुरुवात करतो ........ असे म्हणून मरण त्या मुलाला घेऊन गेलंच !!!!!! 

तात्पर्य :- मरण कधीच कोणाला चुकत नाही आणि कोणीच ते लांबवू सुद्धा शकत नाही, म्हणून वरती गेल्यावर देवाला लागणारी फक्त आणि फक्त "" प्रेमाची शिदोरी "" आधीच भरभरून ठेवूयात.

बोध कथा मराठीत | Bodh Katha Marathi

11. आठ दिवस

एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, ""तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."" तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.

जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, ""तुमच्या कृपेने वाचलो."" एकनाथ मान डोलवित म्हणाले, ""आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, ""कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. 

घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."" एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, ""हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो.

12. भीम चातुर्य

एकदा धर्मराज दरबारात बसले असता, त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण मदत मागायला आला. धर्मराज त्याला म्हणाले, तु उद्या ये, मी तुला दान देऊन संतुष्ट करीन. 'धर्मराजांचं ते अश्वासन ऎकुन तो ब्राह्मण बाहेर पडला. त्याच वेळी धर्मराजांचं ते बोलणं ऎकलेला भीमही त्या ब्राम्हणापाठोपाठ दरबारातून बाहेर गेला. दरबारातून बाहेर पड्ताच भिमानं त्या ब्राह्मणाला जरा एका बाजुला बसायला सांगितलं आणि स्वतः तो नगारखान्याकडे गेला.नगारखान्यात दोन प्रकारचे नगारे होते. 

एक नगारा कुठ्ल्याही तर्हेचं संकट आलं असता वाजवायचा होता, आणि त्याचा आवाज अंगावर काटा उभा करणारा होता. दुसरा नगारा काहीतरी आनंदाची वा आश्चर्यांची गोष्ट घडून आली असता वाजवायचा होता आणि त्याचा ध्वनी गोड होता. नगारखान्यात जाऊन भिमानं आनंदाचा नगारा वाजवायला सूरुवात केली. 

तो आवाज ऎकुन ‘काय आनंददायी घडले?’ हे पहाण्यासाठी प्रत्यक्ष धर्मराज तिथे आले. स्वतः भीम तो नगारा बडवीत असल्याचं पाहुन त्यांनी विचारलं, भिमा ! असं काय आनंददायी घडलं, म्हणुन तु हा नगारा वाजवु लागलास ?' भीम म्हणाला, 'दादा, आजपर्यंत शास्त्रे व आपला अनुभव आपल्याला असं सांगत आला की, जन्माला आलेल्या कुणाही जिवाला आपल्या आयुष्याचा भरंवसा देता येत नाही. 

कुणाला केव्हा 'वरचं आमंत्रण ' येईल याची शाश्वती नाही. म्हणून कुठलीही आज करता येण्यासारखी चांगली गोष्ट उद्यावर ढ्कलु नये. पण नूकत्याच मदत मागायला आलेल्या ब्राह्मणाला ज्या अर्थी तुम्ही उद्या यायला सागिंतले आहे, त्या अर्थी तुम्ही व तो ब्राह्मण किती जगणार आहात, हे तुम्हाला निश्चीतपणे समजलं आहे. ही नवलाची व आनंदाची गोष्ट मला कळली, म्हणून मी हा नगारा वाजवीत आहे.'या भीमटोल्यानं धर्मराजांचे डोळे उघडले. त्यांनी तिथल्या तिथे त्या ब्राम्हणाला मदत केली आणि भीमाच्या चातुर्याची प्रसंशा केली.

13. बाळाची वाटणी

एकदा एका मूल होत नसलेल्या एका बाईने दुसर्यात एका बाईचे दोन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या आईला त्या चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल परत मागू लागली; पण ती चोरटी बाई ते मूल आपलेच असल्याचा दावा करु लागली. 

अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुर्तींही या दोघींतली खरी आई कोण? ह्या संभ्रमात पडले. अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेनं मुद्दाम म्हणाले, 'ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्यामुळे मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकिला देण्याचा निर्णय देत आहे.' 

न्यायमुर्तींचा हा कठोर निर्णय ऎकून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई रडू लागली. कळवळून व हात जोडून न्यायमुर्तींना म्हणाली, 'न्यायाधीश साहेब, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणाकडे का असेना, माझं बाळ सुखरुप असलं की झालं!' त्या बाईच ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लबाड बाईला म्हणाले, 'हे बालक या बाईचंच आहे. 'त्याला कापण्यात यावं, 'असं मी खोट बोललो. पण त्यामुळे तुझा फसवा डाव उघड झाला. 

तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.' अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमुर्तींनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

14. चातुर्य

मित्रांनो आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे आणि यात लबाडी आणि कुकर्म करून काम साधणारेही बरेच आहेत. या परिस्थितीवर आणि वृत्तीवत मात करून यश मिळवायचे असेल तर अंगी चातुर्य असायला हवे. चातुर्य म्हणजे काय? चातुर्य म्हणजे हजारजबाबी वृत्ती, धोरणीपणा, प्रसंगावधान, दूरदर्शीपणा या आणि अशा गुणांचे एकत्रीत मिश्रण म्हणजे चातुर्य. 

ज्याच्या अंगी हे चातुर्य तो खरा यशस्वी मनुष्य. भरमसाठ पुस्तके वाचून आणि ज्ञान संपादन करून कोणी चतुर होत नाही. चातुर्य नसलेला मनुष्य एखाद्या संकटात सापडला तर तो या संकटात का सापडला याची मीमांसा करीत फिरतो. पण चतुर मनुष्य आपल्या चातुर्याने संकटांवर मात करतो. विद्वत्ता ही ग्रंथालयांतून झोपा काढत व घोरत असते, तर चातुर्य हे संभाव्य प्रसंगाला तोंड देण्यासाठी अगदी जागरुकतेनं एका पायावर उभे असते.

15. विलक्षण कुत्रा

एक शिकारी होता. त्याने एक शिकारी कुत्रा विकत घेतला. तो कुत्रा विलक्षण होता कारण त्याला पाण्यावर चालण्याची पळण्याची कला अवगत होती. आपल्या या कुत्र्याच्या विलक्षण गोष्टीमुळे आपल्या मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने तो आनंदित झाला. 

एकदा त्याने त्याच्या एका मित्राला शिकारीचे आमंत्रण दिले. कुत्र्यासोबत दोघे जंगलात शिकारीला गेले तेथे एका तळ्यात त्यांनी बदके मारली. शिकार्याने कुत्र्याला बदके आणण्यास सांगितले तसे तो कुत्रा पाण्यावर पळत जाऊन बदके आणू लागला. बराच वेळ हा प्रकार चालू राहिला पण शिकार्याचा मित्र कुत्र्याबद्दल काहीच बोलत नव्हता. आपल्या कुत्र्या बद्दल मित्र आश्चर्य व्यक्त करेल असे त्याला वाटले होते पण त्याने काहीच प्रतिक्रिया नी दिली. 

शेवटी घरी जाता जाता शिकार्यानेच विचारले “तुला माझ्या कुत्र्यामध्ये काही वेगळे नाही जाणवले का?” तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, “हो, तुझ्या कुत्र्याला पाण्यात पोहता येत नाही.”

16. सल्ला

एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा तो लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारतो. 

मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, "" निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल"". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. 

आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, ""पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."" उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या...

17. बाह्य आवरण

एका माणसाने आपला नेहमीचा वेष बदलला, ......... दाढी वाढविली, गळ्यात सोन्याची जाड चेन, हातात ३ जाडजूड अंगठ्या घातल्या व भारतातील सर्वात मोठ्या महाविद्यालयातील मुख्यधापकाकडे नोकरी मागण्यासाठी गेला, 

माणूस :- नमस्कार, मी विद्यार्थाना अतिशय चांगल शिक्षण देईन, चांगले संस्कार लावेन असे मी आश्वासन देतो ... मला नोकरी द्या. 

मुख्यधापक :- इथे अतिशय उच्चशिक्षित लोकांना सुद्धा नोकरी मिळणे अवघड आहे, तसेच तुम्ही तर एका गुंडा सारखे दिसता, तुम्ही आमच्या विद्यार्थांचे आणि ह्या महाविद्यालयाचे भवितव्य काय घडविणार ? 

माणूस :- ठीक आहे तर मग मी ह्या महाविद्यालयाचे विश्वस्त जे भारताचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो. 

मंत्री :- मुख्यधापक जे म्हणत आहेत ते बरोबर आहे ......... महाविद्यालयात सुशिक्षित शिक्षकाची गरज आहे, तुमच्या सारखे लोक विद्यार्थांचे व ह्या महाविद्यालयाचे भवितव्य कसे घडवू शकणार ? (हे ऐकून तो माणूस हसू लागतो ........आपला खराखुरा वेष समोर आणून म्हणतो....) माननीय मुख्यधापक व मंत्री साहेब ......... जर एका महाविद्यालयाचे व विद्यार्थांचे भवितव्य घडविण्यासाठी अतिशय उच्चशिक्षित शिक्षकाची जरुरी आहे, तर आपल्या ह्या मोठ्या भारत देशाचे व भारत वासियांचे भवितव्य घडविण्यासाठी सुद्धा नगरसेवकापासून ते पंतप्रधानांपर्यंत उच्चशिक्षित लोकांची गरज आहे. 

मी माझी वेशभूषा बदलून तुमच्यापर्यंत तुम्हाला हीच गोष्ट पटवून देण्यासाठी आलो होतो ....... कृपया भारत देशाला महाविद्यालया एवढेच महत्व देऊन उच्चशिक्षित लोकांची भरती आपल्या सरकार मध्ये करावी.

18. पूर्व तयारी

फार पूर्वीची गोष्ट आहे. आइसलँडच्या उत्तरेकडील भागात एक शेतकरी राहत होता. त्याला त्यांच्या शेतात काम करण्यासाठी Worker पाहिजे होता. परंतु अश्या धोकादायक ठिकाणी जेथे नेहमी वादळे आणि जोरदार हवा सुटते. अश्या ठिकाणी कोणी मजूर काम करण्यास तयार होत नव्हते. 

शेतकऱ्याला मजुराची अत्यंत गरज असल्यामुळे त्याने शहरातील Newspaper मध्ये Advertisement दिली. यामध्ये शेतकऱ्याने लिहले एक शेत मजूर पाहिजे आहे. नोकरीची जाहिरात पाहून अनेक लोक मुलाखत देण्यासाठी आले परंतु प्रत्येक व्यक्ती कोठे काम करायचे आहे हे ऐकून काम करण्यासाठी नकार देत असे. अखेरीस एक सडपातळ आणि अशक्त व्यक्ती शेतकऱ्याकडे आला.

 शेतकऱ्याने त्याला विचारले, ""तू यापरिस्थितीत काम करू शकतोस का?"" ""ह्म्म्म, फक्त हवा वाहते तेव्हा मी झोपतो."" त्याव्यक्तीने उत्तर दिले. शेतकऱ्याला हे उत्तर थोडे उद्धट वाटले पण शेतकऱ्याला मजूर पाहिजे होता आणि त्याच्या कडे कोणीही काम करण्यास तयार होत नव्हता म्हणून शेतकऱ्याने त्याला कामावर ठेवले. Worker मेहनती निघाला. तो दिवसभर शेतात काम करत असे. 

शेतकरी त्याच्या कामावर अत्यंत खुष होता. काही दिवसांनी एक दिवस अचानक खूप जोरदार वारा सुटला. हे पाहून शेतकरी समजला थोडयाच वेळात वादळ येण्याची शक्यता आहे म्हणून तो शेतात मजुराच्या झोपडीत गेला. ""अरे लवकर उठ बघतो आहेस ना वारा सुटला आहे. लवकरच वादळ येईल. त्याआधी शेतात काढून ठेवलेले पिक बांधून ठेव गेट दोरखंडाने कसून बाधून ठेव....."" शेतकरी ओरडला. मजूर हळूच वळला आणि बोलला, ""मालक, मी तुम्हाला पहिलेच सांगितले होते की जेव्हा वारा वाहतो मी झोपतो..."" हे ऐकून शेतकरी अत्यंत रागावला. 

वादळ आले तर प्रचंड नुकसान होईल पाऊस पडून सर्व काढलेल पिक भिजेल फार मोठ नुकसान होईल. शेतात केलेली सर्व मेहनत वाया जाईल. अश्या मजुराला तर गोळी घातली पाहिजे असे त्याचं मन करत होते . परंतु वेळ कमी होता म्हणून शेतकरी स्वताच शेतात पिक झाकण्यासाठी गेला. तेथे त्याने पाहिले पिक व्यवस्थित बांधून झाकून ठेवले होते. शेताचे मेन गेट दोरखंडाने कसून बांधले होते. 

कोंबड्यांना झाकून ठेवले होते आणि सर्व कामे व्यवस्थित करून ठेवली होती. नुकसान होण्याचा काही प्रश्नच नव्हता. आता शेतकरी ही समजला की मजूर ""जेव्हा वारा वाहतो मी झोपतो."" का म्हणाला होता, आणि मग शेतकरी ही कोणतीही काळजी न करता झोपला. तात्पर्य : जीवनात सुध्दा अशी अनेक संकटे येतात. पण गरज आहे ती मजूरा प्रमाणे पहिलेच सर्व तयारी करून ठेवण्याची मग तुम्ही आम्ही पण संकट समयी आरामात झोपू शकतो.

19. पोपट

एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला . पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता . बादशाहाने पोपटा कडून पुराण कथा,उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. 

पोपट सोनेरी पिंजर्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई .त्याच्या तोडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता .पोपटला काही दुखले खुपलेले किवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे .लगेच तो सेवकाला दम भरीत असे . एका दिवसाची गोष्ट. सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो.

म्हणाला. "हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता काम नये. पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवू टाकेल ... ?समजल!". सेवक घाबरला .तो पोपटाची चांगली काळजी घेवू लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई . असेच दिवस जात, होते एक दिवस पोपट आजारी पडला, आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीर भोवती लपेटून घेतले त्याची चोच वाकडी केली. सेवक त्याला औषधे देत होता. तरी पोपट बरा होत नव्हता बादशाह आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नाही.

बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली .पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हगिगत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पहिली. सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहा कडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. 

पहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे. एकदा बादशहा बिरबला समोर पोपटा च्या पिंजर्य जवळ आला पाहतो तर काय पोपट मरून पडलेला तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे. नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून दह्याला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल बादशहा च्या लक्षात बिरबलाची युक्ती लक्षात आली पोपट मेला असे सांगायला आलास तर तुझ डोक उडवीन अस सेव्काजवळ बोलल्याच त्याला आठवलं बिरबलान युक्ती न सेवकाच प्राण वाचवला होता .बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला.

Post a Comment

Previous Post Next Post