वाक्य व त्याचे प्रकार आणि उदाहरण | Vakyache Prakar In Marathi With Example

तुम्हा सर्वां साठी सादर करीत आहे मराठी व्याकरण मदले वाक्य आणि त्यांचे प्रकार उदाहरण सोबत.  

Vakyache Prakar In Marathi

तर हे आहे वाक्य व त्याचे प्रकार आणि उदाहरण.




1. वाक्यांचे त्यांच्या अर्थानुसार प्रकार

(1) विधानार्थी वाक्य (2) प्रश्नार्थी वाक्य (3) उद्गारार्थी वाक्य (4) होकारार्थी वाक्य (5) नकारार्थी वाक्य

1.1 विधानार्थी वाक्य | Vidhanarthi Vakya 

ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरण:

(1) पाखऱ्या झुंज खेळणारा बैल होता. 

(2) तुमचे उपकार मी मुळीच विसरणार नाही.

(3) सिद्‌धीविनायकाच्या दर्शनास अतोनात गर्दी होती.

(4) आपल्या आरोग्याची आपण जरुर काळजी घ्यायला हवी.

1.2 प्रशश्‍नार्थी वाक्य | Prashnarthi Vakya 

ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्‍नार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरण:

(1) तुझ्या यशाचे गमक काय ? 

(2) तुम्ही माझ्या घरी केव्हा याल ?

(3) तुमचे उपकार मी कसे विसरेन ?

(4) आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला नको का ?

1.3 उद्‌गारार्थी वाक्य | Udgararthi Vakya 

ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरण: 

(1) अबब! केवढा मोठा साप हा! 

(2) बापरे ! रस्त्यावर काय गर्दी होती !

(3) अहाहा! किती सुंदर देखावा आहे हा !

(4) अरे! इकडे कसा तू ?

(5) चूप ! एक शब्द बोल नको.



1.4 होकारार्थी वाक्य | Hokararthi Vakya

ज्या वाक्यात होकार असतो, त्यास होकारार्थी किंवा करणरुपी वाक्‍य म्हणतात.

उदाहरण: 

(1) तो नेहमी खरे बोलतो. 

(2) थोरांचा आदर करावा.

(3) गुणी व्यक्‍तींची प्रशंसा करा. 

(4) इमारतीचा पाया भक्‍कम होता.

1.5 नकारार्थी वाक्य | Nakararthi Vakya 

ज्या वाक्यात नकार व्यक्‍त केलेला असतो, त्यास नकारार्थी किंवा अकरणरूपी वाक्य म्हणतात.

उदाहरण: 

(1) तो कधीच खोटे बोलत नाही. 

(2) थोरांचा अनादर करु नये.

(3) गुणी व्यक्तींची निंदा करु नका.

(4) इमारतीचा पाया कमकुवत नव्हता.

Read मराठी वाक्प्रचार व अर्थ | Vakprachar In Marathi

2. वाक्यातील विधानांवरून वाक्यांचे प्रकार

(1) केवल वाक्य (2) संयुक्त वाक्य (3) मिश्र वाक्य

2.1 केवल वाक्य | Keval Vakya 

ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते, त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात. 

उदाहरण: 

(1) श्रीमंत व्यक्तिला गरीबांची पर्वा नसते.

(2) वि. वा. शिरवाडकर हे नाशिकात राहायचे.

(3) प्रयत्नवादी माणसेच जगात नाव कमवतात.

(4) पाऊस पडल्यावर हवेत गावा आला. 

(5) शरीर सुदृढ राहण्यासाठी आपण व्यायाम करतो.



2.2 संयुक्‍त वाक्य | Sanyukt Vakya 

दोन किंवा अधिक केवल वाक्ये जेव्हा प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्‍य तयार होते, त्यास 'संयुक्‍त वाक्य' म्हणंतात.

उदाहरण:

(1) विजा चमकू लागल्या आणि पावसास सुरूवात झाली.

(2) मरावे परी कीर्तिरूपी उरावे.

(3) लोक आपली स्तुती करोत वा निंदा करोत.

(4) तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला.

चार प्रकारची प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये वापरून तयार झालेली संयुक्‍त वाक्ये अभ्यासा.

2.2.1 समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये ( आणि, व) :- 

उदाहरण:

(1) सोसाट्याचा वारा सुटला आणि ढग आकाशात जमू लागले.

(2) मी रोज पहाटे उठतो व तासभर व्यायाम करतो.

(3) वारा आला आणि पाऊस गेला.



2.2.2 विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांनी तयार झालेली संयुक्‍त वाक्ये (अथवा, किंवा, की) :- 

उदाहरण:

(1) देह जावो अथवा राहो.

(2) सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा फिरायला जातो.

(3) तुला पैसा हवा की प्रसिद्धी हवी ?


2.2.3 न्यूनत्व (विरोध) बोधक उभयान्वयी अव्ययांनी तयार झालेली (पण, परंतु, परी) :- 

उदाहरण:

(1) मरावे परी कीर्तिरूपे उरावे.

(2) हू आला पण सिंहगेला.

(3) त्याने परग्रतल्न केला परंतु त्याला यश आले नाही. 


2.2.4 परिणामबोधंक उभयान्वयी अव्ययांनी तयार झालेली संयुक्‍त वाक्ये (म्हणून, सबब) :- 

उदाहरण: 

(1) मी आजारी आहे सबब मी उपस्थित राहू शकत नाही. .

(2) आंज संपं आहे म्हणून सर्व दुकाने बंद आहेत.

(3) मोटार वाटेत बिघडली संबबवेळेवर पोहोचलो नाही. 



2.3 मिश्र वाक्य | Mishra Vakya

जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वबोधक उभयान्वंयी अव्ययांनी जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्रवाक्य म्हणतात.

उदाहरण:

(1) गुरूजी. म्हणाले,की पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

(2) जे चकाकते ते सारे सोने नसते.

(3) जसा संयम हवा तशी मनाची एकाग्रता हवी.

(4) तुला जसेवाटेलतसेतूवाग.

(5) मित्राने जे निमंत्रण दिले, ते मी लगेच स्वाकारले. 

(6) मी जेव्हा अबूला गेलो होतो तेव्हा तेथे खूप थंडी होती.

चार प्रकारच्या गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार झालेली खालील मिश्रवाक्‍्ये अभ्यासा.

2.3.1 स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययांनी तयार झालेली मिश्रवाक्ये (की, म्हणून, म्हणजे) :-

उदाहरण:

(1) गुरूजी म्हणाले, की नेहमी खरे बोलावे.

(2) व्याख्यान एकदा रंगू लागले.म्हणजे फारचरंगते.

(3) थोर संत म्हणतात, की सत्य हे शाश्वत आहे.

(4) एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर.



2.3.2 कारणबोधक उभयान्वयी अव्ययांनी तयार झालेली मिश्रवाक्ये. (कारण, का, की, कारण की) :-

उदाहरण:

(1) त्याने स्पर्धा जिंकली कारण त्याने खूप मेत घेतली होतो.

(2) तो धावू शकला नाही कारण की त्याचा पाय दुखत होता.

(3) आम्ही डॉक्टर देशपांडे यांच्याकडे जातो का की त्यांच्या उपचाराने आम्ही लवकर बरे होतो.



2.3.3 उद्देशयोधक उभयान्वयी अव्ययांनी तयार झालेली मिश्रवाक्ये (म्हणून, सबंब,यास्तव) :- 

उदाहरण:

(1) देव प्रसन्न व्हावा म्हणूनं त्याने तपश्चर्या केली 

(2) ऑलिंपिकमध्ये पदक मिळावे यास्तव ते परिश्रम करतात.

(3) त्याला नोकरी मिळावी म्हणून तो मुंबईस आला.

2.3.4 संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांनी तयार झालेली मिश्रवाक्ये (जर-तर, जरी-तरी, जेव्हा-तेव्हा) :-

उदाहरण:

(1) शक्य झाले तर मी तुला उदया भेटेन.
(2) प्रयत्न केलास तर यश मिळेल.
(3) मी गुणवत्ता योंदीत आलो की मी पेढे वाटी.
(4) आईची आठवण येते तेव्हा त्याचे डोळे पाणवतात.

Read मराठी विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd In Marathi

3. वाक्‍यपरिवर्तन (वाक्यांचे रूपांतर)

वाक्‍्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर अथवा वाक्‍य परीवर्तन होय.

उदाहरण: 

(अ) 'तेथे जाणे अगदी गैरसोईचे आहे'. हे वाक्य 'तेथे जाणे अगदी गैरसोईचे नाही' असे करून चालणार नाही कारण त्या वाक्याचा अर्थ बदलतो या ऐवजी “तेथे जाणे मुळीच सोईचे नाही" हे अर्थ न बदलता केलेले वाक्‍य परीवर्तन होय.

वाक्य परिवर्तनाचे खालील प्रकार अभ्यासा :-

(अ) प्रश्‍नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर.

उदाहरण:

1) मुलांनी आपला अभ्यास करायला नको का ? (प्रश्‍नार्थी)
मुलांनी आपला अभ्यास जरूर करायला हवा. (विधानार्थी)

2) एवढ्या गोंगाटात तुम्हाला झोप कशी येईल ? (प्रश्‍नार्थी)
एवढ्या गोंगाटात तुम्हाला मुळीच झोप येणार नाही. (विधानार्थी)



नियम :-

प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना प्रश्न होकारार्थी असल्यास विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे व प्रश्न नकारार्थी असल्यास विधानार्थी वाक्य होकाराशीं करावे.

खालील वाक्ये अभ्यासा

प्रश्नार्थी विधानार्थी
भर सभेत झालेला माझा अपमान मी कसा विसरेन ? भर सभेत झालेला माझा अपमान मी मळीच मुळीच विसरणार नाही.
देशासाठी त्याग करायला नको का ? देशासाठी अवश्य त्याग करायला हवा.
कुणी गुपित माझे सांगेल का ? माझे गुपित कुणी सांगणार नाही.
जगी सर्व 'सुखी असा कोण आहे ? जगी सर्व सुखी असा कोणी नाही.
मी परत आल्या खेरीज राहिन का ? मी अवश्य परत येईन. मी परत येणारच.



(ब) उदगारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर :-

भावना अथवा तीव्र इच्छा व्यक्‍त करण्यासाठी 'उदगारार्थी वाक्ये वापरतात. त्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्‍त करायची आहे ते स्पष्ट करावे.

खालील उदाहरणे अभ्यासा :

(उद्गारारथी) (विधानार्थी)
केवढा उंच वृक्ष हा ! हा वृक्ष खूप उंच आहे.
आज जत्रेत कोण गर्दी ! आज जत्रेत अतोनात गर्दी होती.
काय आवाज आहे तिचा ! तिचा आवाज अतिशय सुरेल आहे.
काय कोसळला हो काल रात्री पाऊस ! जलम कण्यनस्यते तबक रात्री पाऊस अतिशय कोसळला.
मी देशाचा पंतप्रधान झालो तर ! मला देशाचा पंतप्रधान होण्याची तीव्र इच्छा आहे.
काय वैतागलो मी त्याच्या बोलण्याने ! त्याच्या बोलण्याने मी मनस्वी वैतागलो.

Read अलंकार व त्याचे प्रकार आणि उदाहरण | Alankar In Marathi With Examples

(क) होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर 

होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना विरूद्धार्थी शब्दाच्या पुढे नकारदर्शक शब्द ठेवला तर मूळच्या होकारर्थी विधानाचा अर्थ कायम राहतो.

खालील उदाहरणे अभ्यासा :

होकारार्थी वाक्य नकारारथीवाक्य
दोघा भावांत मी कनिष्ठ आहे. दोघाभावांतमीज्येष्ठ नाही.
ते आम्हाला गैरसोयीचे आहे. ते आम्हाला सोयीचे नाही.
मला सारे भाऊच आहेत. मला एकही बहीण नाही.
सर्वांनी खाली बसावे. कुणीही जागेवरून उठू नये.
हमी उपस्थित असतो. तो कधीही अनुपस्थित नसतो.
आरोपीची विनंती फेटाळण्यात आली. आरोपीची विनंती मान्य केली गेली नाही.
तो अस्खलित बोलला. तो कोठेही न थांबता बोलला.
धुम्रपान टाळावे. धुम्रपान करू नये.

Read विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Viram Chinh In Marathi

(ड) खालील केवल वाक्य, सयुक्‍त वाक्य आणि मिश्र वाक्य या वाक्यांचे परस्पर रूपांतर लक्षात घ्या :

(1) आकाशात ढग जमले. मोर नाचू लागला.

या दोन वाक्याचे वाक्यांच्या तिन्ही प्रकारात रूपांतर.
आकाशात ढग जमताच मोर नाचू लागला. (केवल वाक्य)
आकाशात ढग जमले आणि मोर नाचू लागला. (संयुक्‍त वाक्य )
आकाशात ढग जमले तेव्हा मोर नाचू लागला. (मिश्र वाक्य) 



(2) गुरूजींनी जीवनाचा मार्ग दाखविला. तो जीवनाचा मार्ग मी स्वीकारला.
गुरूजींनी दाखविलेला जीवनाचा मार्ग मी स्वीकारला (केवल)
गुरूजींनी जीवनाचा मार्ग दाखवला आणि मी तो स्वीकारला. (संयुक्‍त)
गुरूजींनी जो जीवनाचा मार्ग.दाखविला तो मी स्वीकारला. (मिश्र)

(3) मी रोज पहाटे उठतो. मी रोज तासभर व्यायाम करतो.
मी रोज पहाटे उठून तासभर व्यायाम करतो. (केवल)
मी रोज पहाटे उठतो आणि तासभर व्यायाम करतो. (संयुक्‍त)
मी रोज पंहाटे उठतो तेव्हा तासभर व्यायाम करतो. (मिश्र)

Read १४० मराठी म्हणी व अर्थ | Marathi Mhani

(4) संध्याकाळ झाली, पाखरे कोठरांकडे परतली.
संध्याकाळ होताच पाखरे कोठरांकडे परतली. (केवल)
संध्याकाळ झाली व पाखरे कोठरांकडे परतली. (संयुक्‍त)
संध्याकाळ झाली तेव्हा पाखरे कोठरांकडे परतली. (मिश्र वाक्य)

(5) आत यायचे आहे ? परवानगी घ्यावी लागते.
परवानगी शिवाय आत येऊ नये. (केवल वाक्य)
परवानगी घ्या आणि आत या. (संयुक्‍त वाक्य)
आत यायचं असेल तर परवानगी घ्या. (मिश्र वाक्य)



(6) त्याने बरेच काम केले. त्याला थकवा आला नाही.
बरेच काम करूनही त्याला थकवा आला नाही. (केवल)
त्याने बरेच काम केले परंतु त्याला थकवा आला नाही. (संयुक्‍त)
जरी त्याने बरेच काम केले तरी त्याला थकवा आला नाही. (मिश्र वाक्य)

(7) शाळेची घंटा झाली. आम्ही फाटकातून आत शिरलो.
शाळेची घंटा होताच आम्ही फाटकातून आत शिरलो. (केवल वाक्य)
शाळेची घंटा झाली आणि आम्ही फाटकातून आत शिरलो. (संयुक्त)
शाळेची घंटा झाली तेव्हाच आम्ही फाटकातून आत शिरलो. (मिश्र वाक्य)

vakyache prakar in marathi with example

Read

मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi

मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing

बारा राशी नावे | Zodiac Signs In Marathi

मराठी मुळाक्षरे | Marathi Varnamala

1 Comments

  1. नमस्कार मी इयत्ता 8वी शिकत आहे. आपण या लेखात vakya prakar in marathi बद्दल दिलेली माहिती आम्हाला खूप उपयुक्त पडत आहे. आपले खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post