निरोप समारंभ साठी  मराठी भाषण | Send Off Speech in Marathi

आज मी तुमच्या करीत सम्पुर्ण निरोप समारंभ मराठी भाषण (nirop samarambh bhashan in marathi)  तयार केला आहे. आशा करतो Send Off Speech in Marathi तुम्हाला नक्की आवडेल.

Send Off Speech in Marathi

निरोप समारंभ मराठी भाषण 

सन्माननीय, आदरणीय आणि प्रिय गुरुजनांना माझा सविनय नमस्कार !... दोस्तांनो, बालपणापासूनचे आपंण सवंगडी... याच शाळेच्या प्रांगणात आपली पहिली भेट झाली... त्यावेळी काही नीटसं समजत देखील नव्हतं आपल्याला ! बालवाडीत तर होतो आपण त्यावेळी ! शाळेत यायचं पूजा करायची, डबा -दप्तर जागेवर रांगेत ठेवायचं ( आल्या-आल्या चप्पल- बूट सुद्धा जागेबर ठेवायचे !) नि प्रार्थनेला येऊन रांगेत उभं रहायचं. पाठ होत गेल्या तशा प्रार्थना - क्लोक-राष्ट्रगीतं-गाणी म्हणू लागलो. मग मुळाक्षर काढायची; अंक काढायचे; नंतर कधी पाढे म्हणायचे; गोष्टी ऐकायच्या बाईंकडून; डबा खायचा; खेळ खेळायचे. 

आपल्यापैकी कितीतरी जण शाळेत येताना ' रडायचे. ' मग आपल्या ताई-बाई त्या मुलांना आंजारुन- गोंजारुन मायेनं शाळेची आवड निर्माण करायच्या आणि आता या गेल्या दहा वर्षात निर्माण झालेला स्नेह, जिव्हाळा, प्रेम, सर्व सर्व मनात ठेवायचा; नि जिच्या अंगाखांद्यावर खेळत-बागडत सर्वार्थानं मोठे झालो ; लहानाचे मोठे झालो त्या शालामातेपासून दूर जायचं ! या विचारानंच कंठ दाटून येतोय ! उर भरुन येतोय... अश्रू डोळ्यातून बाहेर येऊ पहातायत !

किती कठीण प्रसंग आहे हा. “ शाळा ' हे दुसरं  घरच 'आहे तुमचं... ही सगळी मुलं-मुली म्हणजे तुमची बहीण- भावंड ! नि आम्हीच तुमचे पालक ! हे मनात रुजवणारा माया करणारा ! प्रत्येक विषय आत्मसात व्हावा म्हणून आपल्यासाठी राबणारा हा गुरुजन वर्ग ! या पुढे आमच्यासमोर शिकवायला यांच्यापैकी कुणीच नसणार !

आपल्या शेवटच्या तासाला मराठीच्या सानेबाई म्हणाल्या, ' अरे, आता तर तुम्ही ला पाहिजे. ' युनिफॉर्म 'च जग सोडून तुम्ही आता कॉलेजच्या रंगीबेरंगी विश्वात जाणार ! नवे मित्र-नवे शिक्षक नवे अनुभव घेणार खूप मोठ्ठे होणार ! ' पण बाई खरं सांगू ' युनिफॉर्म 'च्या शिस्तिचं जगच खूप चांगलं आहे. हा हां ! आता कधी कधी आम्ही शर्ट ' इन ' करायला कटाळा केला असेल किं ' शूज ' देखील वेगळे घातले पण त्याची शिक्षा ..

देखील भोगली ना वी . या आमच्या वर्गातल्या मुली... त्यांना रिबीनी ' नकोत बांधायला केसांना ' पांढरा पट्टा ' सुद्धा (हेअर बँड) नाही लावायच्या नाही लावायच्या तुम्हाला आम्ही खूप त्रास द्लि ; तो काही मुद्दाम नाही. शि क्षकांचं शि क्षा करण्यासाठी तरी लक्ष जाव आपल्याकडं म्हणून ! कारण वर्गात ही ५ एबढी नव्वद मुलं. ३५ मिनिटाच्या तासात किती म्हणून लक्ष देणार तुम्ही प्रत्येकाकड ? पण तेव्हा ते कुठं लक्षात येत होतं.

तीच गत गृहपाठाची ! पण मराठेबाईंना कसं काय ओळखता यायच! आज कुणी कुणी अभ्यास केला नाही ते ! याचं कोडं आम्हाला आजवर नाही उलगडलं. रोज कोणत्याही पाच-सहा जणांना त्या ' बही पाहू म्हणून उठवायच्या त्यात किमान चौघांचा तरी गृहपाठ नसायचाच ! पण बाईंची शिक्षा मात्र छान होती. मोठ्या अक्षरात वर लिहायला सांगायच्या गृहपाठ न आणल्याची शिक्षा ' मग त्या शौर्षकाखाली गृहपाठ दोनवेळा लिहून त्यावर आईची सही आणायची; नि शनिवारी आईनं बाईंना भेटून जायचं ! त्यामुळ आमच्या आयांचं नि बाईचं खूपच छान नातं निर्माण झालयं. याचा फायदा आमचे कच्चे दुवे पक्के करण्यासाठी चांगलाच झालायं. “ बाई मी जर शिक्षिका झाले ना, तर मी नक्की तुमच्यासारखचं वागेन. किमान तसा प्रयत्न करेन.

सोमण सरांचं देखील असंच. पी. टी. शिकवायचे पण प्रत्येकाला नावानं हाक मारायचे ! त्यांचे जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येत त्यांना सुद्धा! कसं काय बाई त्यांच्या एवढं लक्षात राहतं ?

आमच्या बर्वे बाईनी सलग चार वर्ष आम्हाला इंग्रजी ' शिकवलं. त्या वर्गावर येईपर्यंत आज * कविता ' म्हणायची नि उद्या ' शुद्धलेखन ' लिहायचं या पद्धतीमुळं आमचे इंग्रजी उच्चार नि लेखनक्षमता-अक्षरं सुधारली हे ही तितकंच खरं !

खरा कंटाळा यायचा इतिहास भूगोलाचा. पण काही शिक्षकांनी काही वर्ष तेही फार सुकर केलं होतं. त्यात आवुर्जन नाव घ्यायचं ते ' राजा सरांच! त्यांना जुने-नवे सगळेच याच नावानं हाक मारतात... पण इतिहास ' गोष्टी ' सांगून शिकवून ते इतिहासाचे ' राजा ' आहेत हे आम्हाला पटलयं !

बालवाडी पासून ते थेट दहावीपर्यंत सर्वच शिक्षकांनी संगी ओरडले. खूप मेहनत घेतली. चांगले संस्कार व्हावे म्हणून ते झटले. प्रसंगी ओरडले सुद्धा ! आज या थोड्याशा वेळात सर्वांचेच गुण कसे सांगू ? पण तुमचं चांगलं ते आम्ही स्वीकारलंय-अंगीकारलंय नि तुमचा ' वसा घेतलाय, ऊतणार नाही की मातणार नाही ' कारण या मनाच्या घड्याला तुम्ही घडवलय !

आणि महत्त्वाचं राहिलंच की आपले खेळाचे सामने स्नेहसंम्मेलन विविध स्पर्धा याची रंगत तर काही निराळीच होती. आमच्याबरोबर तुम्हीदेखील सारेच जण जणू ' विद्यार्थी ' होऊन हे क्षण ' एन्जॉय ' करत होता ! त्यावेळी आपण एकमेकांचे सवंगडीच असायचो जणू. सहलीच्या वेळी तर काळजी घेणाऱ्या मातेपासून रिंगमास्टर पर्यंत; नि आमच्यात खेळ खेळून भेंड्यांत गाणी म्हणून दंगा करण्यापर्यंत. तुम्ही सगळीच नाती निभावायचेत ! हे असं भाग्य फारच थोड्या जणांना लाभत असेल; ते आम्हाला लाभल ! आम्ही धन्य झालो !

"छडी लागे छमछम विद्या येई घमघम"

याचं प्रत्यंतर तुम्ही कधीच येऊ दिलं नाही. उलट आपल्या सर्वांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं नि आम्ही मुलं आमच्या अडचणी दुःख तुमच्याजवळ बोलून दाखवू लागलो. तुम्ही देखील वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत आलात आमच्या अडचणी सोडवत आलात. जीवन'च्या घरी आलेली अडचण; त्याचं ते शाळा सोडणं मग आपण सर्वांनी त्याच्या वडिलांना समजावलं; ' जीवन 'ची जबाबदारी ' रास्ते गुरुजींनी ' घेतली जीवन पुन्हा शाळेत दाखल झाला; नि त्यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला आला. किती आनंदोत्सव साजरा केला होता सगळ्या शाळेनं त्यावेळी !

असे आनंदोत्सवाचे क्षणं आपल्याला बरेचदा साजरे करायला मिळतात. कुणी दहावीत बोर्डात आला म्हणून तर कुणी आंतरशालेय राज्य स्पर्धेत अव्वल ठरलं म्हणून ! यंदा तर उत्कृष्ट आणि सुंदर शाळेचं बक्षिस आपल्याला मिळालं नि आमच्या सकट सर्वांच्याच शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय ! आम्हाला जितका शाळेचा अभिमान वाटतोय ! तितकंच आदराने आमच्याकडे समाजात पाहिलं जातं. समाजाची हीच दृष्टी कायम ठेवण्याची नि शाळेची उज्वल परंपरा उज्वल करण्याचं वचन मी यावेळी आपणा सर्वांना देतो. आणि काय बोलू ? शब्दच संपले.

धन्यवाद

तुम्हाला निरोप समारंभ मराठी भाषण (nirop samarambh bhashan in marathi) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा. 

माझी शाळा मराठी भाषण

माझे आवडते शिक्षक मराठी भाषण

२६ जानेवारी मराठी भाषण

बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post